Turmeric Diseases : हळदीवरील कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन

सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
Turmeric Crop
Turmeric CropAgrowon

सद्यपरिस्थितीत हळद वाढीच्या (Turmeric Crop) अवस्थेमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर कंदमाशीचा (Tuberfly) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, (Fungal Diseases) कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे नियंत्रण कसे करायचे याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने पुढील माहिती दिली आहे.    

Turmeric Crop
Turmeric Rate : सणासुदीतही हळद नरमली

कंदकुज नियंत्रण

- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

- जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

- कंदकूज झाली असल्यास जमिनीतून कार्बेन्डाझिम (५०%) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के) ३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड (५० टक्के) ५ ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून महिन्यातून एकदा आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीमध्ये वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.

Turmeric Crop
हळद, आले पिकातील कीड-रोग नियंत्रण

कंदमाशीचे नियंत्रण  

- प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५ % प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीडनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.

- उघडे पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे.

- जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस (५० टक्के) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीडनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.

- हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.

- एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

टीप : हळद पिकावर केंद्रीय कीडनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com