Prawns Conservation : कोळंबी संवर्धनातील व्यवस्थापनाचे तंत्र

साधारणतः दर पंधरा दिवसांनी नियमितपणे, कोळंबीचे नमुने घेऊन त्याचे निरीक्षण करावे. कोळंबीची सरासरी लांबी व वजन किती आहे याची नोंद करावी. नियमितपणे कोळंबीच्या वाढीचे निरीक्षण केल्यामुळे वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही हे समजते.
Prawns Conservation
Prawns ConservationAgrowon

किरण वाघमारे, डॉ.शरद सुरनर

साधारणतः दर पंधरा दिवसांनी नियमितपणे, कोळंबीचे नमुने (Prawns Sample) घेऊन त्याचे निरीक्षण करावे. कोळंबीची (Prawns Conservation) सरासरी लांबी व वजन किती आहे याची नोंद करावी. नियमितपणे कोळंबीच्या वाढीचे (Prawns Market) निरीक्षण केल्यामुळे वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही हे समजते.

कोळंबी संवर्धन करताना पावसाळ्यापूर्वी तळ्याचे बांध दुरुस्त करून घ्यावेत. पाणी घेण्याच्या सोडण्याच्या मार्गावरील अडथळे दूर करावेत. गाळ खूप साचला असल्यास काढून टाकावा. पाणी घेण्याच्या आणि सोडण्याच्या मार्गावर तसेच पाईपला बसविलेला जाळ्या साफ कराव्यात. फाटल्या असल्यास बदलाव्यात.

Prawns Conservation
Fish Farming : माशांना होणाऱ्या आजारांवर उपचार

बीज संचयन पूर्वतयारी

तळ्यातील पाणी पूर्णत: काढून टाकावे. तळ्याचा तळ भेगा पडेपर्यंत सुकवावा, सपाट करावा.

तळ्यातील पाणी पूर्णपणे काढता येत नसेल, तर जलवनस्पती काढून टाकाव्यात. बारीक आसाची जाळी वारंवार फिरवून किंवा एक हेक्टर जलविस्तार क्षेत्राच्या एक मीटर खोलीस २५०० किलो मोहाच्या पेंडीची मात्रा देऊन अनावश्यक व मत्स्यभक्षक मासे काढून टाकावेत. मोहाची पेंड वापरल्यास १५ दिवसानंतर मत्स्यबीज सोडावे.

खत मात्रा

तळ्यात पाणी घेतल्यावर बीजसंचयनापूर्वी पाण्याचा आम्लता निर्देशांक तपासून १५ ते २० दिवस अगोदर प्रतिहेक्टरी २०० ते ५०० किलो या प्रमाणात चुन्याची मात्रा द्यावी.

तळ्यात माशांचे नैसर्गिक खाद्य (प्लवंग) तयार होण्यासाठी दिलेल्या सल्ल्यानुसार खत मात्रा द्यावी.

तळ्यात शेवाळ वाढू लागल्यास युरियाचा वापर थांबवावा. मत्स्य व्यवसाय विभागाचा सल्ला घ्यावा.

Prawns Conservation
Fish Farming : पालघर तालुक्यात बेकायदा मंगूर मासेपालन

बीज संचयन

कोळंबीचे संवर्धन आणि निव्वळ कोळंबीच्या संवर्धनासाठी कोळंबी बीज संचयनाने प्रमाण वेगवेगळे आहे. कोळंबी बीज लहान आकाराचे उपलब्ध झाल्यास त्यांचे संचयनापूर्वी एक महिना विशेष काळजी घेऊन संगोपन करणे आवश्यक असते.

शक्यतो उन्हात वाहतूक करू नये. पिशवीतील बीज तलावातील पाण्याच्या वातावरणाशी एकरूप करावे, आणि मगच ते तलावात सोडावे. तलावाच्या नैसर्गिक उत्पादकेनुसार बीजाचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

पूरक खाद्य प्रकार

कोळंबी तलावाच्या तळात राहाते. तळाशी असणारे छोटे किडे, खेकडे, मासे इत्यादी माशांची पिले, कुजलेले प्राणी व वनस्पती हे कोळंबीचे आवडते खाद्य आहे.

कोळंबीच्या वाढीसाठी केवळ तळ्याची नैसर्गिक आणि खत वापरामुळे वाढलेली उत्पादकता यावर अवलंबून न राहता, नैसर्गिक खाद्याच्या जोडीला पूरक खाद्य देणे अधिकतम मत्स्योत्पादन मिळविण्याच्यादृष्टीने आवश्यक असते.

Prawns Conservation
Fish Farming : गोड्या पाण्यातील व्यवसायासाठी ४३ लाखांच्या मत्स्यबीजाचा वापर

चांगल्या वाढीकरिता कोळंबीचे पूरक खाद्य, प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शिअमयुक्त असावे. कोळंबीला कोणते खाद्य द्यावे याच बरोबर किती खाद्य द्यावे हेही महत्त्वाचे असते.

आवश्यकतेपेक्षा कमी खाद्य दिले तर कोळंबी भुकेली राहून तिची वाढ नीट होणार नाही. जास्त खाद्य दिले तर ते उरेल आणि उरलेले खाद्य तलावात कुजून तलावाचे पाणी खराब होईल. कमी खाद्य मिळाल्यास कोळंबी एकमेकांना मारून खाते.

खाद्य मात्रेचे प्रमाण तलावातील कोळंबीची संख्या, आकार, वजन, तळ्याची उत्पादकता तसेच प्लवंग घनता, पूरक अन्नाचा प्रकार यावर अवलंबून असते.

खाद्य मात्रा ठरविण्याकरिता मागणी तसा पुरवठा हे तत्त्व लक्षात ठेवावे. खाद्याची मागणी कितपत आहे हे करण्याकरिता तलावात फीडिंग ट्रेचा वापर करावा. खाद्याचे प्रमाण वजनाच्या ४ ते ५ टक्के असावे.

कोळंबी वाढीची पाहणी

तळ्यातील कोळंबीचा साठा आणि त्यांची वाढ यांचा अंदाज घेऊन खाद्यमात्रा कमी अधिक करावी.

कोळंबीला आजार झाला असल्यास उपाय योजना करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी.

साधारणतः दर पंधरा दिवसांनी नियमितपणे, कोळंबीचे नमुने घेऊन त्याचे निरीक्षण करावे.

कोळंबीची सरासरी लांबी व वजन किती आहे याची नोंद करावी. नियमितपणे कोळंबीच्या वाढीचे निरीक्षण केल्यामुळे वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही हे समजते. कोळंबी तलावाच्या तळाशी, अंधाराच्या ठिकाणी राहणे अधिक पसंत करतात. त्याकरिता जुने टायर किंवा लाकडी खोड इत्यादी तलावाच्या तळाशी त्यांना लपण्यासाठी ठेवावे.

कोळंबी पकडणे

पाणी कमी करून पाग जाळ्यांनी बरीचशी कोळंबी काढून विकावी. शेवटी तळ्यातील पाणी पूर्णत: काढून संपूर्ण कोळंबी वेचून काढावी.

१५० ते २५० ग्रॅम वजनाची कोळंबी विक्री योग्य असते. कोळंबी पकडण्यापूर्वी बाजाराचे सर्वेक्षण करावे, त्यामुळे चांगला दर मिळू शकतो.

मासे, कोळंबी वाहतूक आणि विक्री

पकडलेली कोळंबी स्वच्छ धुऊन वजनानुसार वेगळी काढावी. लगेच विकणे शक्य असल्यास विकावी किंवा बर्फामध्ये थर देऊन साठवून ठेवावी.

चांगला भाव मिळण्यासाठी विक्रेत्यांना अगर संस्करण उद्योजकांना मासे/ कोळंबी पकडण्याची वेळ तारीख अगोदर कळवावी.

 मासे / कोळंबी साठवण, वाहतुकीसाठी शीत पेट्यांचा वापर करावा. जलद विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करावी. फार दूरवर पाठविण्यासाठी रेफ्रिजरेटेड व्हॅनचा उपयोग करावा.

कोळंबी संवर्धनाची आर्थिक व्यवहार्यता

व्यावसायिकदृष्ट्या मत्स्यव्यवसायासाठी जलसाठ्याशिवाय इतर भांडवली खर्चाची उदा. विद्युत, बांधकाम, अवजारे व मनुष्यबळ यांची फारशी गरज नसते. एक हेक्टर जलक्षेत्रात किमान १.५ ते २ मिटर पाण्याची खोली असणाऱ्या जलसाठ्यात वर्षभरात मत्स्यशेतीसाठी येणारा खर्च आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील ठोबळ मानाने देण्यात आला आहे. यामध्ये दर्शविण्यात आलेल्या आर्थिक बाबी स्थळ कालानुरूप बदलू शकतात. प्रत्यक्ष मत्स्यशेतीसाठी निवडलेल्या जाती, खताचे नियोजन, दैनंदिन खाद्याचे प्रमाण, अपेक्षीत वाढ व पाण्याचे गुणधर्म इत्यादी बाबी तसेच मासेमारीकरिता किफायतशीर ठरू शकतात. मत्स्यशेतीच्या खर्च व उत्पन्नाचा तपशील देताना पुढील बाबी गृहीत धरण्यात आलेल्या आहेत.

१) तलावाचे (जलक्षेत्र) १ एकर

२) पाण्याची पातळी १.५ ते २ मीटर

३) संवर्धन कालावधी ७ ते ८ महिने

४) कोळंबी उत्पादन ६० टक्के

५) कोळंबी वाढ सरासरी वजन प्रतिनग २०० ग्रॅम

६) कोळंबी खाद्याचे वाढीत रूपांतराचे प्रमाण (FCR) १:१.५

७) कोळंबीचे विक्रीदर (प्रति किलो) ४०० रुपये

कोळंबी संवर्धनाचे अर्थकारण

७ ते ८ महिन्यांसाठी अंदाजित आवर्ती खर्च (क्षेत्र १ एकर)

अ.

क्र बाब परीमाण सरासरी दर रुपये आवश्यक प्रमाण किंमत रूपये

१ कोळंबी बीज (वाहतूक खर्चासह) १५ नग प्रति चौरस मीटर नग २.५ ६०,००० १,५०,०००

२ खाद्य किलो ९५ १०,८०० १,०२,६०००

३ खनिज घटक, औषधे -- -- -- ५०,०००

४ पाणी/ वीज खर्च ४०,०००

५ २ कामगार ८ महिन्यांसाठी (प्रति महिना १२,०००) -- -- -- १,९२,०००

६ पाणी गुणवत्ता तपासणी यंत्रे इतर बाबी -- -- -- २०,०००

७ इतर अनुषंगिक खर्च -- --- -- १,००,०००

एकूण १५,७८,०००/-

ब) उत्पन्न व उत्पादन

१ कोळंबी उत्पादन (संचयनाच्या ६० टक्के ) ६० टक्के =३६,००० नग, सरासरी वजन २०० ग्रॅम) ३६,००० X ०.२०० = ७२०० किलो ---

२ ७२०० किलो X ४०० रूपये होलसेल बाजार भाव

२८,८०,०००

१) निव्वळ नफा

३ निव्वळ नफा ब – अ ( २८,८०,००० – १५,७८,०००) १३,०२,०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com