Grape Crop : द्राक्षातील साखर, आम्लता मोजण्याची पद्धत

सध्या वातावरणातील चढउतारामुळे मण्यामध्ये साखर उतरण्यास उशीर होत आहे.

Grape Sugar Machine
Grape Sugar MachineAgrowon

डॉ. निशांत देशमुख, डॉ. गणेश जाधव, डॉ. अजय कुमार शर्मा

सध्या वातावरणातील (Change Weather) चढउतारामुळे मण्यामध्ये साखर उतरण्यास उशीर होत आहे. त्यातच अनेक द्राक्ष बागायतदारांमध्ये निर्यातक्षम द्राक्ष मण्यांतील साखर (TSS) व आम्लता (Acidity) किती असावी व त्यांचे गुणोत्तर नेमके किती असावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. द्राक्ष मण्यांतील साखर व आम्लता यांचे प्रमाण नेमके कसे मोजावे, याविषयी माहिती घेऊ.

१. प्रथम द्राक्ष बागेत गेल्यानंतर कीड व रोगमुक्त घडांची निवड करून घ्यावी.

२. द्राक्ष बागेतील वेगवेगळ्या ठिकाणी निवडलेल्या घडांमधून वरच्या, मधल्या आणि खालच्या भागातून साधारणपणे २० ते २५ मणी घ्यावे.

३. निवडलेल्या मण्यांचा कुस्करून रस काढून घ्यावा.

४. हा द्राक्ष रस मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. त्यात मण्यांच्या साली व बिया येऊ नयेत.

५. नंतर हाच रस आपल्याला द्राक्षातील साखर आणि आम्लता मोजण्यासाठी वापरावा.


Grape Sugar Machine
Vineyard Management : द्राक्ष मण्यात कमी साखर येण्याची कारणे व उपाययोजना

द्राक्ष मण्यांतील साखर मोजण्याची पद्धत:

१. द्राक्ष मण्यांतील साखर मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रॅक्टोमीटर (Hand Refractometer) या साधनाचा वापर केला जातो. द्राक्षामधील साखर मोजमापाची स्केल ही ० ते ३२ डिग्री ब्रिक्स इतकी असावी.

२. हॅन्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या (Hand Refractometer) प्रीझमचा पृष्ठभाग शुद्ध पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. पेपर नॅपकिनने कोरडा करून घ्यावा.

३. नंतर हॅन्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या (Hand Refractometer) प्रीझमच्या पृष्ठभागावर शुद्ध पाण्याचे एक - दोन थेंब टाकून त्याची झडप बंद करावी.

४. आयपीसमधून निरीक्षण करावे. जर हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटरचे रीडिंग शून्यापेक्षा कमी किंवा जास्त दाखवत असेल, तर तो हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटर (Hand Refractometer) स्क्रूच्या साह्याने शून्यावर सेट करून घ्यावा. नंतर प्रीझमचा पृष्ठभाग कोरडा करून घ्यावा.

५. त्यानंतर आपण तयार केलेल्या द्राक्ष रसाचे एक-दोन थेंब हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या प्रीझमच्या पृष्ठभागावर टाकून झडप बंद करावी.

६. व्यवस्थित सूर्यप्रकाश येत असलेल्या ठिकाणी हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटर (Hand Refractometer) घ्यावा. त्याच्या आयपीसमधून आत बघून जिथे निळा व पांढरा रंग वेगवेगळा दिसतो, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. दिसणारे रीडिंग नोंदवहीत नोंदवा.

७. नंतर हॅण्ड रिफ्रॅक्टोमीटरच्या (Hand Refractometer) प्रीझमचा पृष्ठभाग शुद्ध पाण्याने स्वच्छ धुऊन पेपर नॅपकिनने कोरडा करून घ्यावा.

८. अशा प्रकारे साखरेचे प्रमाण मोजताना एकाच रसाच्या नमुन्याचे दोन ते तीन वेळा रीडिंग घ्यावे. निरीक्षणामध्ये अचूकता येईल.

९. अपेडाच्या (APEDA) मार्गदर्शक तत्त्वानुसार साधारणतः एक एकर क्षेत्रामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून १५ नमुने गोळा करावेत. त्यातील साखरेचे (TSS) प्रमाण वरील पद्धतीने पडताळून पाहावे.

द्राक्ष मण्यांतील आम्लता मोजण्याची पद्धत :

१. द्राक्ष मण्यांतील आम्लता मोजण्यासाठी टायट्रेशन पद्धतीचा वापर केला जातो.

२. द्राक्ष मण्यांतील साखर मोजताना जो रस तयार केलेला होता, तोच रस आपण आम्लता मोजण्यासाठी वापरू शकतो.

३. एका चंचूपात्रामध्ये साधारणतः १० मिलि किंवा २० मिलि द्राक्षाचा रस घ्यावा. त्यात फिनॉलफ्थेलिन इंडिकेटरचे (Phenolphthalein Indicator) दोन ते तीन थेंब टाकावेत. द्रावण ढवळून घ्यावे.

४. NaoH चे (सोडिअम हायड्रॉक्साइड) ०.१ N द्रावण तयार करावे. (हे द्रावण तयार करताना सोडिअम हायड्रॉक्साइड ४ ग्रॅम प्रति १००० मिलि पाण्यामध्ये टाकावे.) ब्युरेटमध्ये शून्याची मार्किंग आहे, तिथपर्यंत हे द्रावण भरून घ्यावे.


Grape Sugar Machine
Grape Export : सांगली जिल्ह्यातून २ हजार टन द्राक्ष निर्यात

५. द्राक्ष रसाचा नमुना असलेल्या चंचूपात्रात (Beaker) ब्युरेटमध्ये असलेले द्रावण तोटीच्या साह्याने थेंब थेंब सोडावे. त्याचबरोबर चंचूपात्रातील द्रावण ढवळत राहावे.

६. हळूहळू चंचूपात्रातील रसाचा रंग जाऊन रंगहीन होतो. नंतर तो हलकासा गुलाबी दिसू लागेल. त्या वेळी ब्युरेटची तोटी बंद करावी. ब्युरेटवरील रीडिंग नोंदवहीत लिहून घ्यावे. (गुलाबी रंग १५ सेकंद राहणे आवश्यक आहे.)

७. वरील प्रमाणे एकच नमुना वापरून दोन ते तीन वेळा रीडिंग घ्यावे. त्यामुळे अचूकता वाढते.

८. ब्युरेटवर आलेले रीडिंग पुढील सूत्रामध्ये वापरल्यास द्राक्ष मण्यांतील आम्लता टक्केवारीमध्ये (%) काढता येते.

डॉ. निशांत देशमुख, ८९७४०३६७४७ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com