Micro Nutrient : सूक्ष्म अन्नद्रव्ये कशी वापरावीत?

सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य अन्नद्रव्यांसोबतच द्यावीत. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य खते दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो.
Micro Nutrient
Micro NutrientAgrowon

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (Micro Nutrient) वापर करण्यापूर्वी माती परीक्षण (Soil Testing) करून घेणे आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे जमिनीत कमी प्रमाणात असलेल्या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा (Supply Of Micro Nutrients) करणे सोयीचे होते. सूक्ष्म अन्नद्रव्ये ही मुख्य अन्नद्रव्यांसोबतच द्यावीत. विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य खते दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो. त्यामुळे पिकास फारच कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ही चिलेटेड स्वरूपात किंवा फवारणीद्वारे द्यावीत.

Micro Nutrient
शेतकरी गट निर्मितीसाठी सुक्ष्म नियोजन करा : षण्मुगराजन एस

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध ः

अन्नद्रव्यांचे योग्य किंवा जास्त प्रमाण---अन्नद्रव्यांचा अनुकूल परिणाम---अन्नद्रव्यांचा प्रतिकूल परिणाम

लोह---नत्र, पालाश व गंधक यांचे प्रमाण सुधारते---जस्त, तांबे, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, स्फुरदची कमतरता जाणवते.

मँगनीज---पालाश या अन्नद्रव्याच्या शोषणात वाढ होते.---लोह, तांबे, जस्त, निकेल या अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते.

जस्त---स्फुरद, पालाश व गंधकच्या शोषणात वाढ होते.---स्फुरद, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, मंगल, बोरॉन, मोलाब्द, तांबे इत्यादी अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते.

बोरॉन---नत्र, स्फुरद, पालाश, मोलाब्द व नत्राचे शोषण सुधारते.---कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, तांबे यांची कमतरता जाणवते.

तांबे---नत्राच्या शोषणात वाढ होते.---जस्त व मोलाब्द यांची कमतरता जाणवते.

१) जमिनीद्वारे वापर ः

माती परीक्षणाद्वारे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाण निश्‍चित करून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा लागतो. कमी प्रमाणात असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा खताद्वारे दिली जाते.

Micro Nutrient
द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे ओळखून करा उपाययोजना

२) फवारणीद्वारे वापर ः

- फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पोषण पिकांस नियमित देणे आवश्यक आहे.

- फळ पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देणेच फायदेशीर ठरते.

- फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यासाठी द्रावणात चुना योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.

- फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरताना द्रावणाची तीव्रता पिकांच्या गरजेनुसार असणे आवश्यक आहे.

खालील तक्त्यानुसार तीव्रतेचे द्रावण १५ ते २१ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा फवारणी करावी.

३) बियाण्यांसोबत वापर (बियाण्यांवर लेप) ः

- सूक्ष्म अन्नद्रव्यांचे द्रावण तयार करून बियाण्यांवर लावून पेरणी करता येते. परंतु या पद्धतीत अन्नद्रव्यांचा पुरवठा फारच कमी प्रमाणात होतो. उदा. मोलाब्द सूक्ष्म अन्नद्रव्य संयुगांचे कडधान्य बियाणांवर जिवाणू संवर्धकासोबत लेप देणे.

- तांबे व जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये शक्यतो जमिनीतूनच द्यावीत. तर लोह, मंगल, बोरॉन, मोलाब्द यांचा पिकांवर शिफारशीनुसार फवारणीद्वारे द्यावीत. फवारणीमुळे खतांचा कार्यक्षम वापर होईल.

- चुनखडीयुक्त, विम्ल जमिनी, सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची जास्त गरज असते. हलक्या, वाळूयुक्त आणि उथळ जमिनीमध्ये जस्त, लोह व बोरॉन कमतरता अधिक भासते.

- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, ८८३०६९४१६३

(अखिल भारतीय संशोधन कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, परभणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com