Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

आधुनिक तंत्राच्या जोरावर जिल्ह्यातील वडजी या गावाची संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसोबत कृषी विज्ञान केंद्र करडाचे तांत्रिक पाठबळ व शेतकऱ्यांचे व्यवस्थापन याचे मोठे योगदान आहे.
Orange
OrangeAgrowon

वाशीम ः ‘‘संत्र्याचे भरघोस उत्पादनासाठी (Orange Production) किडरोगांच्या नियंत्रणासह (Orange Pest Control) सुक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन (Micro Nutrient Management) खूप महत्त्वाचे आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे फळबाग तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केले.

आधुनिक तंत्राच्या जोरावर जिल्ह्यातील वडजी या गावाची संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांसोबत कृषी विज्ञान केंद्र करडाचे तांत्रिक पाठबळ व शेतकऱ्यांचे व्यवस्थापन याचे मोठे योगदान आहे. केव्हीकेद्वारे सुरु करण्यात आलेल्या संत्रा गट शेती उपक्रमाअंतर्गत दरमहा चर्चासत्र व शिवारफेरी घेतली जाते.

Orange
Orange : शेतकरी पीक नियोजन : संत्रा

मृगबहार व्यवस्थापन व शिवारफेरीचे वडजी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील बोलत होते.

शिवारफेरीमध्ये ठरल्याप्रमाणे बागांचे व्यवस्थापन करण्यात येते. याचे फलित म्हणून चार ते २१ वर्षांपर्यंत असलेल्या या गावातील संपूर्ण बागांमध्ये मृग बहाराची फुले निघाली आहेत. हा बहार चांगल्या पद्धतीने कसा घेता येईल याबाबत या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विविध संत्रा बागांची पाहणी करून निरीक्षणांची नोंद घेण्यात आली.

यामध्ये सीट्रस सायला, फुलकिडे व थ्रीप्स या प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबद्दल पाटील यांनी माहिती दिली. उत्पादनासोबतच विक्री पद्धतीवर चर्चा करून सामूहिक पद्धतीने विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी बरेच संत्रा उत्पादक बागा फुलोरा अवस्थेत असताना व्यापाऱ्यांना गुत्त्याने विक्री करीत. अशावेळी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता आपल्या बागा गुत्त्याने न विकता क्रेट पद्धतीने विक्री करावी असा आग्रह करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंकुश बोरकर यांनी केले. आभार गोपाल बोरकर यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com