ऊस शेतीसाठी आधुनिक अवजारे, यंत्रे

ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक आहे
Sugarcane Tractor
Sugarcane TractorAgrowon

ऊस (Sugarcane) हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक (Cash crop) आहे. मात्र सतत घटत चाललेली ऊस उत्पादकता आणि वाढता असलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी (Farmer) मेटाकुटीला येत आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेली मजूर उपलब्धता, वाढलेली मजुरी यामुळे आधुनिक अवजारे व यंत्राचा वापर अपरिहार्य होत आहे. ऊस पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी मशागत, लागवड, आंतरमशागत आणि कापणी अशी सर्व कामे वेळेवर करण्याची आवश्यकता असते. या कामांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक यंत्रे व अवजारांची माहिती घेऊ.

ट्रॅक्टरचलित फुले मोल नांगर
-ऊस उत्पादक (Sugarcane Production) विभागामध्ये असलेल्या भारी काळ्या जमिनी असून, क्षारांची समस्या वाढत आहे. अशा वेळी भारी काळ्या, क्षारपड व पाणथळ जमिनीतील अधिक पाण्याचा क्षारांचा निचरा करण्यासाठी मोल नांगर उपयोगी ठरतो.
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.

ट्रॅक्टरचलित व्हायब्रेटिंग सब सॉयलर
-क्षारपड जमिनीतील पाण्याचा (Water) निचरा करून, पुन्हा वहिवाटीखाली आणण्यासाठी उपयोगी.
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.

Sugarcane Tractor
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा, हतनूरच्या पाण्याचा लाभ 

ट्रॅक्टरचलित रोटोरीजर
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे (Tractor) चालवता येते.
-एकाच वेळी जमीन भुसभुशीत करणे आणि सरी पाडणे अशा दोन प्रकारच्या मशागती करता येतात.
- वेळ, श्रम व आर्थिक बचत होते.

ट्रॅक्टरचलित ऊस लागवड यंत्र (Sugarcane planting machine)
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-या यंत्राने सपाट जमिनीमध्ये दोन रिजरच्या साह्याने सऱ्या पाडणे, अखंड उसाचे तुकडे करून बेणे सरीत पाडणे, बेण्यावर माती पसरणे, दाणेदार खते पेरून देणे, रोलरच्या मदतीने माती दाबणे इ. कामे एकाच वेळी केली जातात.
-यामुळे वेळेची, श्रमाची व आर्थिक बचत होते.
-या यंत्रामुळे एका दिवसात १.५ ते २ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करता येते.

विद्युत मोटारचलित फुले ऊस बेणे तोडणी यंत्र (Electric motorized cane weed harvester)
- एका तासात ६०००ते ६५०० ऊस बेणे तोडली जातात.
-सिंगल फेज, १ अश्‍वशक्तीच्या विद्यूत मोटारवर यंत्र चालविता येते.
-वेळेची, श्रमाची व आर्थिक बचत होते.

Sugarcane Tractor
ऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक ताकद

ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र (Tractor driven cane seedlings replanting machine)
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
- एका दिवसात २.७५ ते ३ हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुनर्लागवड करता येते.
- पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत होते.
-पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के वेळेची बचत शक्य.

स्वयंचलित रोटरी खुरपणी यंत्र
-एका दिवसात २ ते २.५ हेक्टर क्षेत्रावर तण काढणी करता येते.
-पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत.
-पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के बचत.

ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र (Tractor driven rotary weeding machine)
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-एका वेळेस तीन ओळींमधील तण काढता येते.
-यामुळे वेळ, श्रम व आर्थिक बचत होते.

ट्रॅक्टरचलित इंटर रो रोटाव्हेटर
-ऊस पिकाच्या आंतरमशागतीसाठी उपयुक्त.

-एकाच वेळी दोन ओळींतील आंतर मशागत व तण काढणी करता येते.
-हे यंत्र २.५ ते ३ फूट रुंद सरीत सहजपणे चालू शकते.

ट्रॅक्टरचलित फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर
-या यंत्राचा उपयोग प्रामुख्याने ऊस पिकामध्ये केला जातो.
-फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर फॉरवर्डमध्ये काम करताना आंतरमशागतीचे काम होते, तर रिव्हर्स रोटाव्हेटरने आतील बाजूस मातीची भर घालण्याचे काम केले जाते.

नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर
-टाकीची क्षमता ११.५ लिटर.
-फवारणीसाठी (Spray) लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत.
-मोटारचलित असल्यामुळे श्रमातही वाचतात.

स्वयंचलित एअर बूम फवारणी यंत्र (हाय ग्राउंड क्लिअरन्स)
-पिकांसाठी कीटकनाशक फवारणीसाठी उपयुक्त.
-केबिन असून, मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त.
-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत, श्रमात व खर्चात बचत.

ट्रॅक्टरचलित एअर बूम फवारणी यंत्र
- ४० एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे (Tractor) चालवता येते.
- एका वेळेस अनेक ओळींना फवारणी करता येते.
-फवारणीसाठी लागणाऱ्या वेळेत, श्रमात व खर्चात बचत.

ट्रॅक्टरचलित ऊस कापणी यंत्र (होलकेन)
- ५० एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-या यंत्राद्वारे पूर्ण उसाची कापणी (Sugarcane harvesting) करून, ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये टाकले जाते.
-वेळेत, श्रमात व खर्चात बचत

स्वयंचलित ऊस काढणी यंत्र (Cane harvester)
-या स्वयंचलित यंत्राद्वारे ऊस पिकाची कापणी करून, तुकडे करून ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये भरले जातात. हे काम एकत्रितपणे केले जाते.
-हे यंत्र १५० ते २०० अश्‍वशक्तीच्या इंजिनवर चालते.
-या यंत्राने एका तासात १२ ते १५ टन ऊसतोडणी करता येते.
-चार फूट रुंद उसामध्ये (Sugarcane) हे यंत्र व्यवस्थित चालविता येते.

ट्रॅक्टरचलित उभ्या उसाचा पाला काढण्याचे यंत्र (लिफ श्रेडर/डी-ट्रंशर)
- १८ ते २८ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-उभ्या उसाचा पाला सहजपणे काढता येतो.
- या कामामुळे ऊस पिकांमध्ये वाढीसाठी मोकळी हवा उपलब्ध होते. रोगांचे प्रमाण कमी राहते. परिणामी, उसाची वाढ चांगली होते.
-काढलेला पाला मल्चिंग म्हणून वापरल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पुढे कालांतराने पाला कुजल्यानंतर जमिनीसाठी उत्तम सेंद्रिय खत (Organic Fertilizer) तयार होते.

ट्रॅक्टरचलित ऊस खोडवा तासणी, खते देण्याचे व बगला फोडण्याचे अवजार (रटून मॅनेजर)
- ४० एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-एकाच वेळी उसाचा खोडवा तासणे, खत देणे व बगला फोडण्याचे काम करते.
-एका दिवसात १.२५ ते १.५० हेक्टर ऊस खोडवा तासणी, खते देण्याचे व बगला फोडण्याचे काम होऊ शकते.
-ऊस तोडणीनंतरचा उसाचा खोडवा व्यवस्थित कापला किंवा तासला जातो. त्यामुळे पुढील फुटवे जमिनीखालून व जोमदार निघतात.

ट्रॅक्टरचलित मल्चर
- ४० एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवता येते.
-पीक कापणीनंतर शेतातील पीक अवशेष, पाला पाचोळा, काड्या, गवत, तण इ. चे बारीक तुकडे करते.
-अवशेषांचे बारीक केलेले तुकडे जमिनीत मिसळण्याचे कामसुद्धा (land Work) या यंत्राद्वारे केले जाते. त्यामुळे शेतामध्ये लवकर कुजून सेंद्रिय खत मिळते.

ट्रॅक्टरचलित पाचटाचे गठ्ठे बनविणारे यंत्र (बेलर)
- ४५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे (Tractor) चालवता येते.
-एका तासात ४० ते ६० गठ्ठे तयार होतात.
-उसाचे पाचटाचे गठ्ठे बनविता येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com