Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय

जगात वनस्पतिभक्षक किटकांच्या सुमारे एक लाख जाती आहेत. रोगकारक व्हायरस, बुरशी, बॅक्टेरिया, सूत्रकृमी यांच्या जातींची संख्या तर त्याहून कितीतरी पटींनी अधिक असते. पण असे असूनही कोणत्याही एका वनस्पतीच्या जातीवर आपल्याला केवळ पाच ते सहा वनस्पतिभक्षक किटकजाती आणि रोगकारक बुरशी आढळतात. कारण वनस्पतींच्या अंगी असणारी संरक्षक रसायने त्यांच्या जातिपरत्वे भिन्न असतात.
Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय

आपल्या भक्षकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही वनस्पती आपल्या पेशिकाभित्तींमध्ये सिलिका या अत्यंत कठीण अशा एका खनिजाचा वापर करतात. सिलिका सर्व गवतांमध्ये आढळते. ऑस्ट्रेलियात (Australia) कुरणात चरणाऱ्या मेरिनो मेंढ्यांचे दात तेथल्या गवतातल्या सिलिकामुळे पार हिरड्यांपर्यंत झिजतात.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
Crop Damage Compensation : अतिवृष्टीची मदत जाहीर करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी

अशा मेंढ्या चरू शकत नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागते आणि म्हातारपण येण्याआगोदरच त्यांना मारून टाकावे लागते. याउलट प्रजोत्पत्तीसाठी गोठ्यात सांभाळून ठेवलेल्या नरांचे दात मात्र ते म्हातारे होईपर्यंत शाबूत राहतात. कारण त्यांना खायला लुसलुशीत लसूणघास आणि गोळीबंद पशुखाद्य दिले जाते.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
Crop Protection : सूत्रकृमी प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या योग्य खबरदारी

भाताच्या आणि खपली गव्हाच्या दाण्यांवरही जोवर तूस असते तोवर त्या धान्याला कीड लागत नाही, कारण या तुसातही सिलिका असते. काही वनस्पतींमध्ये डिंक, राळ किंवा रबरयुक्त चीक असतो. हे पदार्थ जोवर वनस्पतींच्या अंतरंगात असतात तोवर ते द्रवरूप आणि प्रवाही असतात; पण बाह्य वातावरणात ते घट्ट होतात.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
Cotton Crop Protection : अतिवृष्टीनंतर कापूस पिकाची घ्या काळजी

जर एखाद्या किटकाने अशी वनस्पती खाण्याचा प्रयत्न केला तर त्या किटकाच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेतून हे पदार्थ बाहेर स्रवतात. या पदार्थांमुळे किटकांची तोंडे बरबटून बंद केली जातात. पण याशिवाय वनस्पती स्वसंरक्षणासाठी अनेकविध रासायनिक पदार्थांचाही वापर करतात.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
World Ozone Protection Day : जागतिक ओझोन संरक्षण दिन विशेष

जगात वनस्पतिभक्षक किटकांच्या सुमारे एक लाख जाती आहेत. रोगकारक व्हायरस, बुरशी, बॅक्टेरिया, सूत्रकृमी यांच्या जातींची संख्या तर त्याहून कितीतरी पटींनी अधिक असते. पण असे असूनही कोणत्याही एका वनस्पतीच्या जातीवर आपल्याला केवळ पाच ते सहा वनस्पतिभक्षक किटकजाती आणि रोगकारक बुरशी आढळतात. काही सर्वभक्षक किटक सोडल्यास एका जातीच्या वनस्पतीवर आढळणारे किटक आणि बुरशी वनस्पतींच्या अन्य जातींवर आढळत नाहीत.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
Crop Protection : फळांतील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापन

याचे कारण असे की वनस्पतींच्या अंगी असणारी संरक्षक रसायने त्यांच्या जातिपरत्वे भिन्न असतात. त्यामुळे उत्परिवर्तनाने एखाद्या वनस्पतिभक्षकात जर एखाद्या विशिष्ट जातीच्या वनस्पतीतली संरक्षकरसायने निष्प्रभ करण्याची क्षमता निर्माण झाली तर तेवढ्याच जातीच्या वनस्पतींवर तो आपली गुजराण करू शकतो. याचे उत्तम उदाहरण आहे रेशमाच्या अळ्यांचे. त्या फक्त तुतीची पानेच खाऊ शकतात, अन्य कोणत्याही वनस्पतीची पाने या अळ्यांना चालत नाहीत, कारण या अळ्यांमध्ये केवळ तुतीच्या पानांमधील कीटकनाशक द्रव्ये पचविण्याचीच क्षमता असते.

यावरून असा निष्कर्ष निघतो की आपण एका जातीच्या वनस्पतीच्या अंगभूत किटकनाशकाने ती जात सोडून इतर सर्व जातींच्या वनस्पतींवरील अपायकारक किटकांचा बंदोबस्त करू शकतो. तंबाखूचा अर्क, निंबोणीच्या बियांचा अर्क किंवा पायरेथ्रमच्या फुलांपासून बनविलेले किटकनाशक हे सर्व त्या त्या वनस्पतीवरची कीड सोडून अन्य सर्व वनस्पतींवरील किडींना मारक ठरतात.

थोड्या अभ्यासाअंती आपल्याला आपल्या परिसरातील बिनलागवडीच्या वनस्पतींमध्येही आपल्या शेतातील किडींचा नाश करणारी नैसर्गिक किटकनाशके नक्कीच सापडतील. वनस्पतींमधील स्वसंरक्षक रसायनांमध्ये बहुसंख्येने फेनॉलिक गटातली विविध रसायनेच आढळतात. खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रत्येक जीवमात्राला पाचक विकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रथिनांचा वापर करावा लागतो.

फेनॉलिक गटातील टॅनिन हा पदार्थ त्याच्या संपर्कात येणाऱ्या विकरांना निष्प्रभ करतो. टॅनिनच्या या गुणधर्मामुळे किडे, वनस्पतिभक्षक प्राणी आणि रोगकारक सूक्ष्मजंतुंपासून वनस्पतींचे संरक्षण होते. आयुर्वेदातली बहुतेक सर्व वनस्पतिजन्य औषधे फेनॉलिक गटात मोडणारी असल्याने ती तोंडावाटेच घ्यावी लागतात. इंजेक्शनवाटे दिल्यास त्यांच्यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होतील.

फेनॉलिक पदार्थ चवीला तुरट किंवा कडू लागतात. तसेच त्यांच्यामुळे वनस्पतींच्या कोवळ्या भागांना तांबडा तर बियांवरील आवरणाला तपकिरी किंवा काळा रंग येतो. कडधान्यांची बीजावरणे काढून त्यांची डाळ केली की त्यांची पाच्यता वाढते. मानवी अन्न या दृष्टीने ज्या वनस्पतींमध्ये फेनॉलिक गटातील रसायनांचे प्रमाण कमी असते अशा वनस्पतीच शेतीसाठी निवडल्या गेल्या कारण अशा वनस्पतींची पाच्यता आणि चव हे दोन्ही गुणधर्म चांगले असतात.

पण म्हणूनच लागवडीखालील वनस्पतींमध्ये किटक आणि रोगकारक बुरशींचा प्रतिकार करण्याची क्षमता लागवड न केल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या मानाने कमी असते. गांधिलमाशा आणि किटकांना खाणाऱ्या अन्य भक्षकांचा वापर करून अपायकारक किटकांना मारता येते; पण भक्ष्याचा संपूर्ण नाश केल्यास भक्षकाचीही उपासमार होते. त्यामुळे निसर्गात भक्ष्य आणि भक्षक यांचे नेहमीच एक विशिष्ट संतुलन पाळले जाते.

Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय
Crop Protection : पीक संरक्षण आधुनिक; पण महाग होणार

त्यामुळे भक्षक किटकांचा वापर करून अपायकारक किटकांचा संपूर्ण नायनाट करता येत नाही. नर किटकांना मादीच्या गंधाने आकृष्ट करून विशिष्ट प्रकारच्या सापळ्यांद्वारे त्यांचा नायनाट करण्याचीही एक पद्धती आहे. किटकांचे हे मादीगंध त्यांच्या जातिनिहाय भिन्न असतात. त्यांची रासायनिक संरचना आता माहिती झाल्याने ते कृत्रिमरीत्या निर्माण करणेही शक्य झाले आहे. त्यामुळे सापळ्यांमध्ये ज्या जातीच्या किटकांचा मादीगंध वापरलेला असतो त्याच जातीच्या नरांचा नाश होतो.

निसर्गातल्या मित्रकिटकांना वगळून फक्त निवडक आपायकारक किटकांचा नायनाट करण्याचा उपाय म्हणून या पद्धतीचा बराच प्रचार करण्यात आला, पण मादीगंध असलेल्या सापळ्यांचा वापर करून आपण केवळ अपायकारक नरकिटकांचा नाश करू शकतो. यातून सुटलेले मादीकिटक आपले भक्ष्य असलेल्या वनस्पतींवर अंडी घालतातच. त्यामुळे असे सापळे लावूनही किटकांचा उपद्रव काही पूर्णपणे थांबत नाही.

वनस्पतींमध्ये असणाऱ्या फेनॉलिक गटातल्या पदार्थांमुळे रोगकारक बुरशींच्या बीजुकांच्या रुजण्याला प्रतिबंध केला जातो, पण तरीही एखाद्या बुरशीने वनस्पतीच्या पेशिकेत प्रवेश केलाच तर त्या बुरशीच्याच काही घटकद्रव्यांमुळे त्या पेशिकेतल्या बुरशीविरोधी यंत्रणा जागृत केल्या जातात. बुरशीच्या पेशिकाभित्तीत आढळणाऱ्या कायटीन या द्रव्यामुळे वनस्पतीच्या पेशिकांना कायटिनेज हा विकर निर्माण करण्याची चालना मिळते.

या द्रव्याने बुरशीची पेशिकाभित्ति विरघळते आणि ती बुरशी मरते. संधिपाद गटातल्या सर्व प्राण्यांच्या बाह्यांगावर कायटीनचेच कवच असते. याच गटात झिंग्यांचाही समावेश होतो. झिंग्यांची निर्यात करणाऱ्या उद्योगांकडे या कवचांचा कचरा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. झिंग्यांच्या कवचाची पूड जमिनीत घालून टोमॅटोच्या पिकातल्या रोगकारक बुरशींचा प्रतिबंध करता येतो, हे मी सुमारे ३० वर्षांपूर्वीच एका प्रयोगाने दाखवून दिले होते.

रोगांना बळी न पडणारी वाणे निर्माण करणे हे किटकांना बळी न पडणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याच्या मानाने सोपे असते. गेल्या शंभर वर्षात गेरवा रोगाला बळी न पडणारा गहू, गोसावी रोगाला बळी न पडणारी बाजरी, कणसे पावसाने भिजली तरी दाणा लाल किंवा काळा पडणार नाही अशी ज्वारी अशी अनेक वाणे पीक पैदासकार शास्त्रज्ञांनी निर्माण केली.

त्यासाठी मेंडेलप्रणीत पारंपरिक जननशास्त्राचा वापर करण्यात आला. पण किटकांच्या अळ्यांना बळी न पडणारी कपाशीची वाण निर्माण करण्यास मात्र एकविसावे शतक उजाडावे लागले. हे साध्य करण्यासाठी अळ्यांना मारण्याचा गुण एका बॅक्टेरियाच्या पेशिकेतून जनुकीय अभियांत्रिकी या आधुनिक तंत्राचा वापर करून कपाशीत आणावा लागला. शेतकरी अजूनही मावा, हुमणी, पांढरी माशी, टोळ, मिज् माशी इ. किटकांना बळी न पडणाऱ्या वाणांच्या प्रतीक्षेत आहेत.

कपाशी, ज्वारी, वाल, तूर, तीळ, एरंडी अशा अनेक पिकांची पारंपरिक वाणे दीर्घ मुदतीची होती. त्यांची पेरणी जून-जुलै मध्ये करून हिवाळ्यात काढणी केली जात असे. त्यामुळे या वनस्पती पावसाळ्यात चांगल्या फोफावून वाढत; पण त्यांची फळे व शेंगा मात्र कोरड्या हंगामात विकसित होत असल्याने शेवटी या वाणांचे उत्पन्न बेताचेच असे. आता अनेक पिकांमध्ये कमी मुदतीची वाणे विकसित करण्यात आली आहेत.

पण पावसाळ्यात वनस्पतिभक्षक किटकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा वापर करावा लागतो. हिवाळ्यात किटकांचा उपद्रव कमी असतो. कारण लहान होत जाणाऱ्या दिवसांमुळे आता हिवाळा सुरू होणार हे किटकांना समजते आणि ते सुप्तावस्थेत जातात. पूर्वी प्रभावी किटकनाशके उपलब्ध नसल्याने आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक दीर्घ मुदतीच्या पिकांची लागवड करण्याचा उपाय अवलंबला असणार.

मोकाट सोडलेली पाळीव जनावरे, ससे, हरणे, माकडे, रानडुकरे, गवे आणि हत्ती यांचाही पिकांना उपद्रव होतो. हा उपद्रव टाळण्यासाठी गवती चहा आणि सिट्रोनेला अशा अखाद्य वनस्पतींची लागवड करावी. या वनस्पतींच्या पानांमधील तीव्र वासाच्या तेलामुळे त्यांना वनस्पतिभक्षक सस्तन प्राणी तोंड लावत नाहीत.

एकेकाळी केवळ सुगंधी पदार्थ या नात्यानेच मागणी असणाऱ्या या तेलांना आता त्यातल्या काही विशिष्ट रसायनांमुळे रसायन उद्योगाकडून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे. प्रस्तुत लेखकाने अशा लागवडीचा सल्ला काही शेतकऱ्यांना दिला असता, “मग आम्ही खायचे काय?” असा प्रश्न त्यांच्याकडून आला. त्याला उत्तर म्हणून मी ऊस किंवा कपाशी लावणाऱ्या शेतकऱ्यांचे उदाहरण देऊ इच्छितो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com