Warehouse Registration : गोदाम प्रमाणिकरण नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी नेटवर्थ

गोदाम व्यवसायात उतरण्यासाठी शेतकरी कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी वखार विकास व नियामक प्राधिकरण यांच्यामार्फत गोदामाचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon

- मिलिंद आकरे, हेमंत जगताप

गोदाम व्यवसायात (Warehouse Business) उतरण्यासाठी शेतकरी कंपनी, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांनी वखार विकास व नियामक प्राधिकरण यांच्यामार्फत गोदामाचे प्रमाणिकरण (Warehouse Registration ) करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून गोदाम व्यवसायाशी निगडित पुढील तरतुदी करणे शक्य होईल. हे प्रमाणिकरण करण्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारले जाते. त्याबाबत तपशीलवार माहिती सर्व समुदाय आधारित संस्थांना असणे आवश्यक आहे. वास्तविक गोदाम बांधणीपूर्वीच प्रमाणित गोदाम बांधणी करणे आवश्यक असून त्यामुळे पुढील त्रुटी टाळता येणे शक्य होईल.


Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम पावतीचे नियोजन

वखार विकास व नियामक प्राधिकरणाकडील गोदाम प्रमाणिकरण नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी नेटवर्थ ः
१) गोदामाचे प्रमाणिकरण करण्यासाठी आवश्यक प्रमाणिकरण शुल्कासह इतरही काही बाबी आवश्यक आहेत. गोदाम नोंदणी (विकास आणि नियमन) कायदा, २०१७ अधिनियम क्रमांक १८ अन्वये तपशील क्र. ७ नुसार गोदामाचे प्रमाणिकरण करण्यासाठी कमीतकमी नेटवर्थ किती असावे याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापनाचे नियोजन

२) गोदाम क्षमता नेटवर्थशी जोडण्यात आली आहे. याबाबत शेतकरी कंपनी व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांच्या पात्रतेविषयी अटींमध्ये एक अट म्हणजे नेटवर्थ योग्य असणे आवश्यक असल्याबाबत तपशील सादर करण्यात येत आहे.

३)नेट वर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या मालकीच्या सर्व गैर-आर्थिक आणि आर्थिक मालमत्तेचे मूल्य वजा त्याच्या सर्व थकबाकी दायित्वाचे मूल्य. परंतु शेतकरी कंपनी व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या अथवा चालविण्याकरीता घेण्यात आलेल्या गोदामांशी निगडित नेटवर्थ हे चांगले असावे अशी अपेक्षा आहे. जरी छोट्या गोदामांकरीता नेटवर्थची गरज २० मार्च २०१८ च्या बदलानुसार करण्यात आलेली असली तरी अन्न व सार्वजनिक वितरण विभाग आणि वखार विकास व नियामक प्राधिकरण यांचेशी झालेल्या चर्चेनुसार २१ डिसेंबर २०२० नेटवर्थमध्ये बदल करण्यात आले.



पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गोदाम नोंदणी
पूर्वी नोंदणी कालावधी तीन वर्षांसाठी होता, परंतु गोदाम नोंदणी कायदा २०१७ नुसार पाच वर्ष कालावधीसाठी गोदाम नोंदणी आणि नोंदणी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा ठेव रक्कम भरणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या गरजेनुसार व सुरक्षा ठेव जमा करण्यात येणाऱ्या अडचणी गृहीत धरून काही अर्जदारांना ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीकरिता गोदाम नोंदणीची आवश्यकता असते. त्यानुसार ऑनलाइन प्रक्रियेमध्ये दिनांक ६ सप्टेंबर २०१८ पासून अर्जदाराने केलेल्या विनंती अर्जानुसार ५ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गोदाम नोंदणी व सुरक्षा ठेव भरण्याच्या कालावधीत सूट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com