Cotton : कापसाची उत्पादकता वाढविण्यास हवे नवे तंत्रज्ञान

‘नॅशनल सीड्स असोसिएशन’च्या चर्चासत्रातील सूर
New technologies needed to increase cotton productivity
New technologies needed to increase cotton productivityAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : कापूस उत्पादकता वाढीसाठी नवे तंत्रज्ञान त्यासोबतच ‘एक देश, एक परवाना’ या धर्तीवर बियाणे परवाना वितरणात पारदर्शकता आणण्यासाठीची मोहीम राबवावी, असा सूर नॕशनल सिडस असोसिएशन इंडियातर्फे आयोजित तांत्रिक परिषदेत उमटला.
नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ‘जैवतंत्रज्ञानाद्वारे पीक सुधारणा’ आणि ‘बियाणे नियामक समस्या’ या विषयावर तांत्रिक चर्चासत्र हैदराबाद येथे आयोजित करण्यात आले. या वेळी उपस्थित कंपन्यांच्या संचालकांनी या क्षेत्रातील सुधारणा संदर्भात अनेक मुद्दे मांडले.

New technologies needed to increase cotton productivity
Cotton Production: कापूस उत्पादन यंदा ३७५ लाख गाठींवर पोचणार?

एक देश, एक बियाणे परवाना’ धोरण स्वीकारून देशात बियाणे परवाना देण्याची एकसमान प्रणाली असावी. संशोधन आणि विकास (आरॲण्डडी) आधारित राष्ट्रीय बियाणे कंपन्यांना राज्यांमध्ये विनाव्यत्यय बियाणे व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र परवाना दिला जाऊ शकतो. या तरतुदींचा समावेश करण्यासाठी बियाणे (नियंत्रण) आदेश, १९८३ मध्ये सुधारणा करण्याची गरज परिषदेत व्यक्त करण्यात आली.
अनेक बियाणे कंपन्यांकडे सशक्त संशोधन व विकास प्रणाली आहे. त्या विविध पिकांमध्ये विविध आशादायक आणि सुधारित आणि संकरित वाण विकसित करत आहेत. नवीन वाणांचे बियाणे लहान आणि मध्यम बियाणे कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी या वाणांचे बीजोत्पादन करण्यासाठी आणि देशाच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत पुरवठा करण्यासाठी नवीन वाणांसाठी परवाना प्रणाली प्रभावी केली जाऊ शकते, असे तज्ञांनी नमूद केले.

कापसाचे उत्पादन कमी होत आहे. त्याकरिता नवीन तंत्रज्ञान, नवीन वैशिष्ट्ये असलेले जनुकीय परावर्तित बियाणे आणण्याची गरज आहे. हर्बिसाइड टॉलरंट कॉटन (तणनाशकाला प्रतिकारक) च्या आरआरएफ इव्हेंटची मान्यता ज्याची चाचणी आधीच समाविष्ट केली गेली आहे. ती पर्यावरणीय मुक्तीसाठी जलद ट्रॅक केली जाऊ शकते. बियाणे (नियंत्रण) आदेश आणि कापसाच्या बनावट बियाण्यांच्या विक्रीपासून शेतकरी वाचू शकतात, असेही मत काही तज्ज्ञांनी मांडले.

‘इंटरनॅशनल सीड टेस्टिंग असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. के केशवुलू यांनी भारतीय बियाण्यांच्या उच्च निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बियाण्याच्या गुणवत्तेचे जागतिक मानक स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. तसेच भारतीय बियाणे कंपन्यांसाठी त्यांची बियाणे गुणवत्ता चाचणी प्रणाली वाढविण्यासाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात संस्था मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.
...........
चौकट ः
‘निकृष्ट दर्जाचे बियाणे न पुरविण्याचा संकल्प’
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवले जाणार नाही, असा संकल्प बियाणे उद्योगाच्या सभासदांनी या वेळी केला. असोसिएशनचे अध्यक्ष एम. प्रभाकर राव या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com