
पालाशचे कार्य :
नत्र आणि स्फुरदापेक्षा बहुतेक सर्वच पिकांना पालाश (Potassium) जास्त प्रमाणात लागतो. एक टन ऊस तयार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ४ किलो पालाश जमिनीतून घेतला जातो.
पालाश उसाचा जोमदारपणा आणि रोग प्रतिकारशक्ती (Disease immunity) वाढवितो.
पेशींमध्ये पाण्याचे नियंत्रण करतो. तसेच जडणकार्य (अनाबोलीझ्म ), श्वासोश्वास आणि जलछेदन (ट्रान्सपीरेशन) - या क्रियेमध्ये समतोलपणा आणून पाण्याची बचत करतो. यामुळे पिके पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतात.
साखरेसारख्या पिष्टमय पदार्थांच्या निर्मितीस व त्यांचे रूपांतर होण्यास तसेच त्यांचे स्थलांतर घडवून आणण्यास मदत करतो.जास्त नत्रामुळे होणारे दुष्परिणाम नाहीसे करतो. पिकांचा दर्जा उंचावतो.
उसासाठी ठिबक सिंचनातून रासायनिक खते देण्याचे नियोजन
लागवडीचा हंगाम / पीक प्रकार (आडसाली, पूर्वहंगामी, सुरु, खोडवा)
उसाची जात आणि त्याची अन्नद्रव्यांची गरज
निश्चित केलेले ऊस उत्पादन व साखर उतारा उद्दिष्ट
पीक कालावधी आणि अपेक्षित हेक्टरी ऊस संख्या
पीक वाढीच्या अवस्था
जमिनीचा प्रकार आणि भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता
पाण्याची गुणवत्ता
खते देण्याच्या पद्धतीची निवड
पूर्वहंगामातील उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे
खत व्यवस्थापन मार्गदर्शक तक्ता
लागवडीचा महिना : ऑक्टोबर, नोव्हेंबर
शिफारशीत खत मात्रा : नत्र: स्फुरद: पालाश : १३६:६८:६८ (किलो/एकर)
लागवडीपूर्वी खतमात्रा
शेणखत १० टन , गंधक २४ किलो, फेरस सल्फेट १० किलो, झिंक सल्फेट ८ किलो, मॅंगेनीज सल्फेट १० किलो, निंबोळी ८० किलो, बोरॉन २ किलो
लागवडीनंतर खतमात्रा ः
खते देण्याची वेळ नत्र स्फुरद पालाश
टक्के मात्रा युरिया
(किलो /
एकर ) टक्के
मात्रा फॉस्फेरिक
आम्ल
(किलो/एकर) टक्के
मात्रा म्युरेट ऑफ
पोटॅश
(किलो /एकर)
लागवडीनंतर
४५ दिवसापर्यंत ९ २६.५५ ९ १०.०८ ८ ९.१२
४६ ते १३५ दिवसांपर्यंत ५० १४७.५० ५० ५६.०० ३५ ३९.९०
१३६ ते १८० दिवसांपर्यंत २७ ७९.६५ २७ ३०.२४ २७ ३०.७८
१८१ ते २२५ दिवसांपर्यंत १२ ३५.४० १२ १३.४४ २३ २६.२२
२२६ ते २४० दिवसापर्यंत २ ५.९० २ २.२४ ७ ७.९८
एकूण १०० २९५ १०० ११२ १०० ११४
(टीप : १) वरील शिफारस ही सर्वसाधारण असून, प्रत्येक शेतकऱ्याने मातीच्या रासायनिक पृथक्करणानुसार उसास खते देणे आवश्यक आहे.
२) वरील मात्रा दर दिवशी एक दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदा याप्रमाणे देता येते.)
अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग,
नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि.पुणे.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.