Bhendi Cultivation : जाणून घ्या निर्यातक्षम भेंडी उत्पादनाचे तंत्र

भेंडी हे कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भेंडीची लागवड केली जाते. निर्यातीसाठी भेंडीला वर्षभर मागणी असते.
Bhendi Cultivation
Bhendi CultivationAgrowon

भेंडी (Okra) हे कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये भेंडीची लागवड (Okra Cultivation) केली जाते.

निर्यातीसाठी भेंडीला वर्षभर मागणी असते. स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत भेंडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

उन्हाळी हंगामात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन सहज घेता येते. भेंडीच्या उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीने भेंडी लागवडीसाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत? याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. 

भेंडी पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.भेंडीवर तापमानाचा विशेष प्रभाव होतो. त्यासाठी योग्य तापमानात भेंडीची लागवड करणे गरजेचे असते. १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.

तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते.

तापमान २० ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास, बियांची उगवण, झाडाची योग्य वाढ होऊन फूलगळ कमी होते. समशितोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान पिकास उपयुक्त ठरते.

जास्त थंडी अधिक काळ असणाऱ्या ठिकाणीहे पीक घेता येत नाही. अतिशय दमट वातावरणामध्ये भुरी रोगाचा उपद्रव आढळतो.

Bhendi Cultivation
Wheat Cultivation : जाणून घ्या खपली गहू लागवडीचे तंत्र

हलक्या ते भारी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये भेंडीची वाढ चांगली होते. काळी, कसदार, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते.

जमिनीचा सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असावी. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत वाढ खुंटते व फूलगळ होते.

त्यामुळे चोपण, क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी. हलक्या जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा.

Bhendi Cultivation
SIILC : जाणून घ्या निर्यातक्षम शेवगा लागवडीतील संधी

लागवडीसाठी अर्का अनामिका, परभणी क्रांती, अर्का अभय, पुसा सावनी, अकोला बहार, प्रगती, फुले विमुक्ता या जातींची निवड करावी. 

लागवडीसाठी एकरी १० ते १२ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्यात भिजवून मग पेरणी करावी. 

भेंडीची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. लागवड सरी वरंबा, पट्टा पद्धतीने किंवा सपाट वाफ्यावर करावी.

सरी पद्धतीत हलक्या जमिनीत २.५ फूट किंवा भारी जमिनीत ३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. दोन बियांमध्ये ६ ते ७ इंच अंतर ठेवून लागवड करावी.

गरजेनुसार उगवण झाल्यावर विरळणी करावी. एकरी ६० ते ६२ हजार रोपांची संख्या ठेवावी.पेरणीनंतर त्वरित पहिले पाणी द्यावे.

जमिनीच्या प्रकारानुसार पेरणीनंतर ३ किंवा ४ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com