Food Processing : पौष्टिक भरडधान्यांच्या प्रक्रियेला संधी

जागतिक बाजारपेठेतील वाढत्या ग्लुटेन फ्री पदार्थामुळे भरडधान्य विक्रीसाठी चांगली संधी मिळाली आहे. भरड धान्यांच्या उत्पादनांपासून ते मल्टिग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स, विविध प्रकारचे पीठ ते मल्टिग्रेन मिक्स, लाह्या, स्नॅक्सनिर्मिती करता येऊ शकते.
Food Processing
Food ProcessingAgrowon

भरडधान्यामध्ये (Millet) मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात. ही पिके कमी पाण्यावरही वाढतात. ही धान्ये पौष्टिक असतात. ज्वारी, बाजरी (Pearl Millet), नाचणी (Ragi), भगर, राळे, बार्ली, राजगिरा ही धान्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. भरडधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व तसेच त्यातील विविध पिकांच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष “जागतिक भरडधान्य वर्ष” (International Millet Year) म्हणून जाहीर केले आहे. ही धान्ये सामान्यपणे आकाराने बारीक, गोलाकार, खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात त्यावर फारशी प्रक्रिया करण्याची गरज नसते. म्हणून पौष्टिकतेच्या बाबतीत भरडधान्य अग्रेसर ठरतात.

Food Processing
Food Processing : फळांपासून पल्प, स्लाइस निर्मिती

देशातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे आपल्याकडे विविध पीकपद्धती असल्यामुळे फार पूर्वीच्या काळापासून ही धान्ये लागवडीखाली आहेत. परंपरागत पीक पद्धतीमधील भरडधान्यांचा विचार करता भारतामध्ये ८० पेक्षा जास्त जाती आपल्या आहारशैलीचा भाग होत्या. कालांतराने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यामध्ये हरितक्रांतीच्या काळामध्ये जनतेची भूक भागविणे हे आपल्यासमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे गहू, भाताच्या लागवडीमध्ये वाढ झाली. परिणामी, त्याचे उत्पादन वाढले पण या काळामध्ये भरडधान्यांची लागवड मागे पडली. तसेच ते आहारातूनही मागे पडले.

भरडधान्याचे फायदे

यामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते.

ही भरडधान्ये ‘ग्लुटेन फ्री’ असतात. त्यामुळे गहू किंवा तांदळापेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असल्याने यांचे बारा महिने सेवन करू शकतो.

प्रथिनांचे प्रमाण जास्त असते ती शरीराची झीज भरून काढतात. तसेच आपले स्नायू बळकट करायला देखील मदत करतात.

यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचन क्रिया सुलभ होण्यास मदत होते व पोट लवकर भरते आणि भूक लागायचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी तंतुमय घटकयुक्त आहार फायदेशीर असतो.

Food Processing
Food Processing : अल्पभूधारक झाला डाळ मिल यंत्र उद्योजक

प्रक्रिया उद्योगाला संधी

गेल्या काही वर्षांतील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर आज लोकांच्या आहारात जीवनसत्त्व बी ६, जीवनसत्त्व बी १२, जीवनसत्त्व ई, तंतुमय पदार्थ या पोषणमूल्याची कमतरता आहे. त्यातून मधुमेह, रक्तदाब, संधिवात, पित्त, हृदयरोगाच्या समस्या दिसून येतात. जागतिक बाजारपेठेतील वाढत्या ग्लुटेन फ्री पदार्थामुळे भरडधान्य विक्रीसाठी चांगली संधी मिळाली आहे. कोरोनानंतरच्या काळात लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता तयार झाली आहे. या संधीचा फायदा युवा शेतकरी, महिला बचत गटाने घेतला पाहिजे.

या क्षेत्रात नावीन्य असले तरी व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील. चवीशी कोणतीही तडजोड न करता आरोग्यदायी उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला तर ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस पडतील. भरडधान्यांचे उत्पादन तसेच भरड धान्यांच्या उत्पादनांपासून ते मल्टिग्रेन ब्रेकफास्टचे पर्याय, सेंद्रिय आणि आरोग्यदायी फ्लेक्स ते फायबर समृद्ध अन्न, विविध प्रकारचे पीठ ते मल्टिग्रेन मिक्स, पफ/ लाह्या, स्नॅक्सनिर्मिती करता येऊ शकते.

सध्या शहरी तसेच ग्रामीण भागातही सकस अन्न ही संकल्पना लोकांमध्ये रुजू लागली आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन ज्वारी चिवडा, ज्वारी पोहे, ज्वारी पॉपकॉर्न, ज्वारी इडली मिक्स, नाचणी इडली मिक्स, नाचणी डोसा मिक्स, ज्वारी रवा, नाचणी रवा, नाचणी बिस्किटे, नाचणी नानकटाई, नाचणी लाह्या, भगरीपासून भगर डोसा, वरी भात, वरई भाकरी, भगर-शिंगाडा थालीपीठ, तसेच विविध भरडधान्याचे पीठ असे अनेक पौष्टिक पदार्थ करता येऊ शकतील. आज अशा नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थांना अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशातही चांगली मागणी आहे.

आश्‍विनी चोथे, ७७४३९९१२०६

(के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com