Orange : शेतकरी पीक नियोजन : संत्रा

कांडली, (जि.अमरावती) येथील प्रमोद वासनकर यांची २५ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर ३२ वर्षांपूर्वी १८ बाय १८ फुटांवर लागवड केलेली २५०० संत्रा झाडे आहेत.
Orange
Orange Agrowon

शेतकरी ः प्रमोद जगन्नाथराव वासनकर

गाव ः कांडली, ता. अचलपूर, जि.अमरावती

संत्रा लागवड ः २५ एकर

एकूण झाडे ः तीन हजार

कांडली, (जि.अमरावती) येथील प्रमोद वासनकर यांची २५ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रावर ३२ वर्षांपूर्वी १८ बाय १८ फुटांवर लागवड केलेली २५०० संत्रा झाडे (Orange Cultivation) आहेत. लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी या महिन्यात अडीच एकरावर एकर जमिनीत विकत घेतली. त्यात १२ बाय १५ फूट अंतरावर नव्याने ५०० झाडांची लागवड केली आहे. जुन्या बागेत १८ बाय १८ फुटांवर एकरी साधारण १३० ते १४० झाडे बसतात. मात्र, नवीन बागेत (Orange Orchard) कमी अंतरावर लागवड केल्यामुळे एकरी साधारण २५० झाडे बसली.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Panjabrao Deshmukh Agriculture University) येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संत्रा बागेचे व्यवस्थापन (Orange Orchard Management) केले जाते. योग्य खत आणि सिंचन व्यवस्थापनातून एकरी साधारण १२ टन संत्रा उत्पादन (Orange Production) मिळते. बागेत सिट्रस ग्रिनिंगचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बागेचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर देत असल्याचे प्रमोद वासनकर यांनी सांगितले.

- बागेत शेणखताचा वापर दरवर्षी करणे टाळले जाते. साधारण ५ ते ६ वर्षांनी प्रतिझाड ५० किलो शेणखत दिले जाते.

- सिट्रस ग्रिनिंगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेची विशेष काळजी घेतली जाते. सिंचन आणि खत व्यवस्थापन विशेष भर दिला जातो.

- तणनियंत्रणासाठी बागेत कोणत्याही तणनाशकांचा वापर केला जात नाही. ग्रास कटर किंवा रोटाव्हेटर मारून तणनियंत्रणावर भर दिला जातो.

Orange
Orange : संत्रा उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

आंबिया बहाराचे नियोजन ः

- तीन हजार पैकी अडीच हजार झाडांवर आंबिया बहार धरण्याचे नियोजन केले.

- त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी रोजी बाग ताणावर सोडली. हा ताण १ जानेवारीला ठिबकद्वारे पाणी देत तोडला.

- जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर साधारण २० जानेवारीला रिंग पद्धतीने डीएपी १ किलो प्रतिझाड याप्रमाणे मात्रा दिली.

- बागेत सिट्रस सायला, मावा, तुडतुडे आदींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या.

- फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यानंतर तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली.

- एप्रिल महिन्यात फळांची चांगली फुगवण आणि फळगळ टाळण्यासाठी जिब्रेलिक आम्लाची फवारणी केली. तसेच प्रति झाड १ किलो युरिया दिला.

- जून महिन्यात झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट लावली. तसेच सिट्रस सायलाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी घेतली.

- मागील १० दिवसांत सिट्रस ग्रिनिंगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी घेतली.

- बागेत वाढलेले तण ग्रास कटरच्या साह्याने काढून घेतले.

Orange
Orange : सूर्यप्रकाशाचा अभाव अन् रिमझिम पावसामुळे फळगळ

सिंचन व्यवस्थापन ः

संत्रा पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असते. झाडाच्या मुळांचा पाण्यासोबत संपर्क आल्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे प्रमोद यांनी ३२ वर्षांपासून ठिबक सिंचनावर भर दिला आहे. पाटपाणी पद्धतीने सिंचन केल्यामुळे झाडांच्या मुळांचा थेट पाण्यासोबत संपर्क येतो. त्यामुळे फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी मोठे नुकसान होते. असेही वासनकर सांगतात.

क्रमांक हीच झाडांची ओळख ः

बागेतील प्रत्येक झाडाला विशिष्ट क्रमांक दिला आहे. क्रमांक हीच झाडाची ओळख आहे. बागेत मजुरांना काम करताना कीड-रोगग्रस्त झाडाची ओळख सांगणे कठीण जात असे. त्यासाठी प्रत्येक झाडाला एक विशिष्ट क्रमांक दिला. त्यामुळे मजुरांना काम करतेवेळी एखाद्या झाडावर प्रादुर्भाव दिसून आला तर ते झाडाचा क्रमांक येऊन सांगतात. त्यामुळे नेमक्या त्याच क्रमांकाच्या झाडाचे व्यवस्थापन करणे सोपे होते.

आगामी नियोजन ः

- सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये बागेत ब्राऊन रॉट तसेच फळगळ होण्याची शक्यता असते. डाग पडलेल्या फळांना बाजारात चांगले दर मिळत नाहीत. प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणीचे नियोजन केले जाईल.

- सिट्रस ग्रिनिंगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी घेतली जाईल.

- आवश्यकतेनुसार ग्रास कटरने तण नियंत्रण करणार आहे.

- बागेची पाण्याची गरज आणि पावसाचा अंदाज घेत ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.

- फळगळ टाळण्यासाठी जीए, युरियाची मात्रा दिली जाईल.

उत्पादन, विक्री ः

- दरवर्षी आंबिया बहाराच्या बागेतून एकरी साधारण १० ते १२ टन उत्पादन मिळते.

- उत्पादित सर्व मालाची विक्री कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद येथे विक्रीसाठी पाठविले जातात.

- प्रमोद वासनकर, ९७६६५२१९५२ / ८६६८६७२६६२

(शब्दांकन ः विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com