Orange : शेतकरी नियोजन : संत्रा

अमरावती जिल्ह्यातील तोंडगाव (ता. चांदूरबाजार) येथील गजानन खडके यांची १८ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये संत्रा लागवड असून बागेत जैविक घटकांचा वापर करून व्यवस्थापनावर भर दिला जातो.
Orange
Orange Agrowon

शेतकरी : गजानन खडके

गाव : तोंडगाव, ता. चांदूरबाजार,अमरावती.

एकूण क्षेत्र ः १८ एकर (संपूर्ण क्षेत्रात संत्रा लागवड)

अमरावती जिल्ह्यातील तोंडगाव (ता. चांदूरबाजार) येथील गजानन खडके यांची १८ एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये संत्रा लागवड (Orange Cultivation) असून बागेत जैविक घटकांचा वापर करून व्यवस्थापनावर भर दिला जातो.

Orange
Orange : बांगलादेशच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक जेरीस

रासायनिक खते आणि रासायनिक फवारण्यावर टाळल्या जातात. या माध्यमातून कमी उत्पादन खर्चात बागेचे व्यवस्थापन शक्य होते. मागील काही वर्षांपासून संत्रा उत्पादकांना फळगळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बागेत योग्य वाफसा स्थिती असल्यास फळगळीवर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे ते अनुभवातून सांगतात.

Orange
Orange Rate : संत्र्याचा गोडवा जगभर पोहोचवा

सध्या दोन एकरांतील बाग उत्पादनक्षम असून त्यात साधारण २२५ झाडे आहेत. ही लागवड आठ वर्षे जुनी आहे. दोन एकरातून साधारणपणे ११५ क्रेट संत्रा उत्पादन मिळते. झाडे कीड-रोगमुक्त राहण्यासाठी नियमित नीमपेस्ट लावले जाते. वर्षातून चार वेळा नीमपेस्टचा वापर केला जातो. नीमपेस्ट तयार करण्यासाठी देशी गाईचे ताजे शेण, गोमूत्र, कडुलिंबाची पाने बारीक काडीसह (खलबत्त्यामध्ये कुटून) इत्यादींचा वापर केला जातो.

संत्रा लागवड

पावणेतीन एकरावर ७ ते ८ वर्ष जुनी संत्र्याची साधारण २९० झाडे आहेत.

मागील दोन वर्षांपूर्वी क्रॉस पद्धतीने साडेसात ते ८ एकरांवर २० बाय १५ फूट अंतरावर नवीन लागवड केली. त्यात इंडो इस्राईल पद्धतीने लागवड केल्यानंतर मध्यभागी १ झाड याप्रमाणे एकरी साधारण २९० झाडे बसली. दोन झाडांमध्ये १० फुटांपेक्षा जास्त अंतर असूनदेखील झाडांची संख्या अधिक ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

यावर्षी साडेचार ते ५ एकरांत पुन्हा नवीन लागवड केली आहे. ही लागवड १८ बाय १५ फूट अंतरावर आहे.

सिंचन व्यवस्थापन

 सुरुवातीपासूनच बागेला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला आहे. मात्र, सध्या जुनी ठिबक यंत्रणा बंद पडल्याने नवी यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित आहे. ठिबक सिंचनाद्वारे जीवामृत व इतर जैविक निविष्ठांचा वापर करणे शक्य होते. त्यामुळे मजुरी

खर्चात बचत होते. सद्यः स्थितीत बागेला पाट पाणी दिले जात आहे.

दुपारी साधारण १२ वाजता झाडाची सावली ज्या ठिकाणी पडते त्यापासून काही अंतरावर ठिबकद्वारे सिंचनाचे नियोजन असते. याप्रमाणे पाटपाणी दिले जाते. कारण, दुपारी झाडाची सावली पडलेल्या ठिकाणीच झाडाची मुळे असतात.

 बागेत सिंचनावर विशेष लक्ष दिले जाते. जेणेकरून पाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल. बागेत अधिक पाणी झाल्यास फळगळ आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

 बागेत फेरफटका मारून झाडाची पाण्याची गरज आणि जमिनीतील वाफसा यांचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन केले जाते. त्यासाठी झाडाच्या जवळील माती बोटाने थोडी उकरून हाताने दाबली जाते. मातीच्या गोळा लाडूसारख्या आकाराचा झाला तर बागेला पाण्याचा गरज नसते. मात्र, बागेत ओलावा कमी असेल तर मातीचा गोळा फुटतो. अशावेळी बागेस पाणी देण्याची गरज आहे, असे समजले जाते. या पद्धतीने नियोजनबद्ध पाणी देणे शक्य होते.

आंबिया बहराचे नियोजन

सध्या बाग आंबिया बहरासाठी ताणावर सोडली आहे.या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाग ताणावर सोडली. हा ताण डिसेंबरच्या अखेरीस तोडला जाईल.

जमीन काळी भारी प्रकारातील असल्याने झाडांना लवकर ताण बसत नाही. त्यामुळे योग्य ताण बसल्यानंतरच पाटपाणी देत ताण तोडण्याचे नियोजन आहे.

 बागेतील मोकळ्या जागेत रब्बी गव्हाची लागवड करण्याचे नियोजन आहे.

 ताण तोडण्यापूर्वी शेणखतासोबत वेस्ट डी-कंम्पोजर किंवा घन जीवामृत बागेत पसरले जाईल. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

 झाडांना नवीन पालवी फुटल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जैविक घटकांच्या मदतीने प्रादुर्भाव कमी न झाल्यास क्वचित रासायनिक फवारणी घेतली जाते.

 जानेवारीच्या अखेरीस आंबिया बहारातील फुलधारणा सुरू होते. या काळात फुलगळ टाळण्यासाठी उपाययोजनांचा अवलंब केला जातो.

 बागेत वाढलेले तण रोटाव्हेटरच्या साह्याने काढले जाईल.

 आवश्यकतेनुसार जीवामृताची फवारणी केली जाईल.

 दशपर्णी अर्कासोबत बारीक केलेले वेखंड उकळून नंतर ते पाण्यात मिसळून फवारणी जाईल.

 घन जीवामृत तयार करून एकरी चारशे किलो प्रमाणे वापर करणार आहे. झाडाच्या खोडाला नीमपेस्ट लावले जाईल.

- गजानन खडके, ९४२२६५७५७४, (शब्दांकन ः विनोद इंगोले)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com