शेतकरी नियोजन : फळबाग

कसोप (ता.रत्नागिरी) येथील चेतन साळवी या तरुणाने वडिलोपार्जित शेतीचा वारसा कायम ठेवत भाजीपाला लागवड, फुलशेती, आंबा-काजू बागायतीमधून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण केले आहे.
Horticulture
Horticulture Agrowon

शेतकरी ः चेतन सुहास साळवी

गाव ः कसोप, ता.जि. रत्नागिरी

एकूण क्षेत्र ः ७ एकर

नवीन लागवड क्षेत्र ः हापूस १५० झाडे

----

कसोप (ता.रत्नागिरी) येथील चेतन साळवी या तरुणाने वडिलोपार्जित शेतीचा वारसा कायम ठेवत भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation), फुलशेती (Flower Farming), आंबा-काजू बागायतीमधून (Mango Cashew Orchard) उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण केले आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीकडे न वळता घरची शेती कसण्यावर भर दिला. सेंद्रिय खतांच्या वापरासह कृषी विद्यापीठातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतामध्ये अवलंबण्यास सुरुवात केली. चेतन यांच्याकडे हापूसची १५० कलमे आहेत. यासह फूलशेती, भाजीपाला पिके, काजू आणि नारळ बाग अशी बहुविध पीकपद्धती त्यांच्याकडे पाहायला मिळते.

Horticulture
Horticulture : फळबाग लागवडीची खीळ काढा

हापूस लागवड ः

- पाच वर्षांपूर्वी १५० हापूस कलमांची कसोप येथे लागवड केली. लागवडीसाठी मागलाड येथील श्री. मुरकर यांच्याकडून जोड कलम पद्धतीने कलम बांधणी करून घेतली. लागवडीच्या १ महिना आधी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती, गांडूळखत, शेणखत टाकून आंब्याच्या बाटा रुजण्यास ठेवल्या. दर दोन दिवसांनी त्यास पाणी दिले. रोपाची जाडी हाताच्या बोटाएवढी झाल्यानंतर त्यावर कलम बांधण्यात आले. बांधलेले कलम पत्र्याच्या डब्यात माती भरून त्यात ठेवण्यात आली. साधारण एक वर्ष रोपे डब्यात ठेवली. डब्यातील कलमांना उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी दिले.

Horticulture
Horticulture : रोहयो’तील फळबाग लागवडीतील अडथळे कायम

- लागवड करण्यापूर्वी शेतामध्ये दोन बाय दोन मीटर आकाराचे खड्डे काढून घेतले. खड्डे गांडूळखत, सेंद्रिय खतांची मात्रा टाकून भरून घेतले. लागवड केल्यानंतर जमिनीत रोपांच्या मुळांना वाळवी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत कीटकनाशकांची मात्रा दिली.

- लागवड योग्य झालेल्या कलमांची खड्ड्यांमध्ये लागवड केली. दोन कलमांमध्ये २५ ते ३० फूट अंतर राखले आहे. विद्यापीठाच्या निकषांनुसार दोन झाडांत कमी अंतर राखणे आवश्यक आहे. परंतु, दोन झाडांतील अंतर कमी असेल तर त्यांची देखभाल आणि काळजी घेण्यास अडचणी येतात. तसेच कमी अंतरावर झाडे लावल्यामुळे त्यांची सतत छाटणी करावी लागते. मजुरांची कमतरता आणि अन्य शेतीकामांमुळे आंबा बागेतील कामांवर पुरेसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे चेतन यांनी दोन झाडांत जास्त अंतर राखले आहे.

- लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात मोकाट जनावरांकडून कलमांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडाच्या बाजूने कुंपण उभारले आहे.

- लागवडीनंतर पहिल्या वर्षी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या नाहीत. दुसऱ्या वर्षी युरिया, १५ः१५ः१५ खतांच्या प्रति झाड १०० किलो मात्रा दिल्या.

- पावसाळा सुरु होण्यापूर्वी बागेतील पालापाचोळा गोळा केला जातो. बागेतील वाळलेले गवत काढून बाग स्वच्छ केली. जाते.

- गोळा केलेला पालापाचोळा जून महिन्यात झाडाच्या बुंध्याला टाकला जातो. जेणेकरून पाऊस पडल्यानंतर हा पालापाचोळा कुजून खत तयार होईल. त्यामुळे रोपांचा अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास मदत होते.

सिंचन व्यवस्थापन ः

- सिंचनासाठी डोंगराच्या पायथ्याला विहीर काढली आहे. तेथील पाणी बागेजवळील विहिरीत पाइपद्वारे नेण्यात येते. आणि त्यानंतर बागेतील झाडास पाणी पुरवठा होतो.

- बागेतील कलमास जमिनीतील ओल आणि तापमान यांचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार सिंचन केले जाते.

- नोव्हेंबरच्या दरम्यान आठवड्यातून १ वेळ साधारण १० ते १५ लिटर याप्रमाणे रोपांना पाणी दिले जाते.

- उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानातील वाढीमुळे कलमांची पाण्याची गरजही वाढते. या काळात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिले जाते. दुपारच्या वेळी पाणी देणे टाळले जाते.

व्यवस्थापनातील बाबी ः

- सध्या बागेतील कलमे ५ वर्षांची झाली आहेत.

- मागील दोन महिन्यात चांगला पाऊस झाला असून बागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. त्यासाठी तणनियंत्रण, साफसफाईची कामे सुरु आहेत.

- हिवाळ्यात मोहोर येण्याच्या प्रक्रियेस आरंभ होतो. मोहोर आल्यानंतर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. बागेतील अस्वच्छता कीड-रोगांच्या प्रादुर्भावास पोषक ठरते. त्यामुळे बाग स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जाईल.

- कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या जातात.

- आवश्यकतेनुसार तण नियंत्रण करून बाग स्वच्छ केली जाते.

- साधारण डिसेंबर- जानेवारीच्या दरम्यान फळधारणेस सुरुवात होते. वातावरणातील बदलामुळे फळगळ होण्याची शक्यता असते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारणी घेतली जाते.

- लागवडीनंतर साधारण ३ वर्षांनी कलमास मोहोर येण्यास सुरूवात होते. पहिल्या वर्षी आलेला मोहोर खुडून टाकला जातो. कारण, या वयाच्या कलमांमध्ये फळधारणा करण्याची ताकद नसते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच लागवडीनंतर चौथ्या वर्षी मोहोर धरण्यास सुरुवात केली.

--------------------

- चेतन सुहास साळवी, ९०९६७५५६६३

९३५९०५०५०७

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com