Horticulture : शेतकरी नियोजन : फळबाग

रत्नागिरी येथील अशोक रामचंद्र साळुंखे हे नोकरीनिमित्त रत्नागिरी शहरात राहतात. नोकरी करीत असतानादेखील शेतीकडे त्यांचा कल कायम होता. शेतीची आवड जपण्यासाठी त्यांनी वेतोशी येथे दोन एकर शेतजमीन विकत घेत पारंपरिक पद्धतीने भातशेतीस सुरुवात केली.
Horticulture
HorticultureAgrowon

शेतकरी : अशोक रामचंद्र साळुंखे गाव : वेतोशी, ता.जि. रत्नागिरी एकूण क्षेत्र : १९ एकर आंबा क्षेत्र : सात एकर (९०० झाडे)

वेतोशी, ता.जि. रत्नागिरी (Ratnagiri Farmers) येथील अशोक रामचंद्र साळुंखे (Ashok Ramchandra Saluke) हे नोकरीनिमित्त रत्नागिरी शहरात राहतात. नोकरी करीत असतानादेखील शेतीकडे त्यांचा कल कायम होता. शेतीची आवड जपण्यासाठी त्यांनी वेतोशी येथे दोन एकर शेतजमीन विकत घेत पारंपरिक पद्धतीने भातशेतीस सुरुवात केली. आज त्यांच्याकडे स्वतःची १९ एकर शेतजमीन असून, त्यात टप्प्याटप्प्याने आंबा, काजू, नारळ, उन्हाळी भुईमूग आदी पिकांची लागवड केली आहे. (Mango Cultivation)

Horticulture
Eknath Shinde : ‘पंचायत राज’मार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

यासह त्यांनी पूरक व्यवसायातही उडी घेत कुक्कुटपालन, शेळीपालनास सुरुवात केली. कुक्कुटपालनासाठी त्यांनी सुमारे २५ हजार कुक्कुटपक्षी क्षमतेच्या शेडची उभारणी केली. तसेच शेततळे आणि गांडूळ खत प्रकल्प उभारले आहेत. फळबागांमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करून त्याजागी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला आहे. खत, सिंचन या बाबींवर विशेष भर देत दर्जेदार आंबा उत्पादन ते घेतात.

Horticulture
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

अशी केली लागवड

- अशोकराव यांनी २५ वर्षांपूर्वी ५ एकरांवर हापूसच्या ७०० कलमांची लागवड केली. २०१२ मध्ये आणखी २०० कलमांची लागवड केली. सध्या त्यांच्याकडे ७ एकर क्षेत्रावर सुमारे ९०० हापूस झाडे आहेत.

- रोपवाटिकेतून ३ वर्षे वयाची रोपे दीडशे रुपये दराने विकत आणली. जून महिन्यात दीड फूट खोल खड्डे काढले. पालापाचोळा आणि गांडूळ खताच्या मात्रा देऊन खड्डे भरून घेतले.

Horticulture
Abdul Sattar : कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे वाण बनवा

तसेच वाळवी लागू नये यासाठी शिफारशीत कीटकनाशकांच्या मात्रा टाकल्या. कलम लागवडीवेळी आणि लागवडीनंतर २ वर्षे रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. मात्र त्यानंतर रासायनिक खते पूर्णपणे बंद करून गांडूळ खत वापरावर भर दिला.

- कातळावरील जमीन असल्यामुळे कमी जागेत जास्त रोपे लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार १ गुंठे क्षेत्रावर २ कलम या पद्धतीने लागवड केली.

- तीन वर्षे वयाची कलमे आणल्यामुळे सुरुवातीची २ वर्षे आलेला मोहोर खुडून टाकला. त्यानंतर तिसऱ्या वर्षी मोहोर धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मोहोर न धरल्यामुळे पुढील काळात कलमांचे आरोग्य आणि उत्पादनक्षमता वाढत असल्याचे ते सांगतात.

Horticulture
Weather Update : राज्यात पावसाची उघडीप शक्य

व्यवस्थापनातील बाबी ः

- दरवर्षी जून महिन्यात प्रतिझाड २० ते २५ किलो गांडूळ खताची मात्रा दिली जाते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात बागेतील पालापाचोळा, झाडांच्या फांद्या छाटणी, गवत काढून ते कलमांच्या आळ्यामध्ये टाकले जाते. जेणेकरून ते कुजून त्याचे खत झाडास उपयोगी पडेल.

- बागेत स्वच्छता राखण्यावर विशेष भर दिला जातो. कलमांचे आळे व्यवस्थित केले जाते.

Horticulture
Weather Update : राज्यात पावसाची उघडीप शक्य

बागेतील कलमांच्या प्रत्येक फांदीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घेतली जाते, असे अशोकराव यांनी सांगितले.

- मोहोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर तो टिकून राहण्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाते.

- जानेवारी महिन्यात तुडतुडे आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीत औषधांची फक्त एकच फवारणी केली जाते. रासायनिक फवारणीमुळे फळांचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे रासायनिक घटकांचा वापर कमी करण्यावर अधिक भर दिला जातो.

उत्पादन ः

- लागवड केल्यानंतर पहिले दोन वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर तिसऱ्या वर्षी मोहोर धरण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन मिळाले. मात्र झाडे मोठी होत जातील तसे उत्पादनही वाढत गेले. पहिल्या वर्षी एका झाडामधून एक पेटी आंबा उत्पादन मिळाले. आता दरवर्षी ६०० झाडांपासून सुमारे ३०० पेटी आंबा उत्पादन मिळते.

- झाडांवरून आंबा काढल्यानंतर पॅकहाउसमध्ये आणून त्याची प्रतवारी केली जाते. योग्य प्रतवारी करून पेट्यांमध्ये आंबा भरून विक्रीसाठी पाठविला जातो.

- गतवर्षी ४ डझनांच्या पेटीस सरासरी २ ते ७ हजार रुपये दर मिळाला.

- आंब्याची मुंबई, पुण्यातील ग्राहकांना थेट विक्री करण्यावर अधिक भर असतो. मुलगा तुषार आणि पराग यांच्या ओळखीतून बरेच ग्राहक जोडले गेले आहेत. त्यामुळे विक्री करण्यास अडचणी येत नाहीत. खर्च वजा जाता पन्नास टक्के उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेततळे, गांडूळ खत प्रकल्प उभारणी ः

- शाश्‍वत सिंचनासाठी शासकीय योजनेतून अनुदान घेत एक एकर क्षेत्रावर दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. त्यामुळे डिसेंबर ते मेअखेरपर्यंतच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या शेततळ्यामध्ये मत्स्यपालनही ते करतात. त्यामुळे उत्पन्नाचा आणखी एक स्रोत निर्माण झाला आहे.

- फळबागांमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे टाळला जातो. त्याऐवजी गांडूळ खत वापरावर अधिक भर दिला जातो. त्यांच्याकडे सुमारे २५ टन क्षमतेचा गांडूळ खत प्रकल्प आहे. त्यातील १० टन गांडूळ खत शेतामध्ये वापरून उर्वरित खताची विक्री केली जाते.

अशोक साळुंखे, ९४२२०५४१९९

(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com