बारामती येथे चैत्रपालवी कार्यशाळेचे आयोजन

कृषी ज्ञानाची पालवी फुटण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेने शेतकऱ्यांसाठी ‘चैत्रपालवी’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
Chaitrpalavi
ChaitrpalaviAgrowon

माळेगाव ः कृषी ज्ञानाची पालवी फुटण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेने शेतकऱ्यांसाठी ‘चैत्रपालवी’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत विषमुक्त शेती व शेतमाल निर्यात, शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी वापर, अन्न प्रक्रिया व विपणन, शेतकरी उत्पादक कंपन्या, आधुनिक दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, पर्यायी पीक पद्धती व शासकीय योजना इत्यादी विषय चर्चेसाठी घेतले आहेत.

‘शारदानगर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या चैत्रपालवी कार्यशाळेत कै. अप्पासाहेब पवार प्रगतिशील शेतकरी पुरस्कार २०२२देऊन संबंधित शेतकऱ्यांचा गुरव केला जाईल’’, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे यांनी दिली.

देशात कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये भरीव योगदान देणाऱ्या काही नामवंत संस्थांमध्ये अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असणारे कृषी क्षेत्रातील विविध प्रकारचे संशोधन शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे ठरेल, याचा धांडोळा नेहमीच ही संस्था घेते. ही संस्था दरवर्षी ‘चैत्रपालवी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करते. यंदाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्रपालवी कार्यशाळेच्या निमित्ताने कै. अप्पासाहेब पवार प्रगतिशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा निश्‍चित झाला आहे.

दरम्यान, चैत्रपालवी कार्यशाळेत सद्यःस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या समस्या दूर करण्यासाठी जगभरामध्ये उपलब्ध तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाईल. या साठी जगभरातून नामवंत शास्त्रज्ञ, विविध विषयांतील तज्ज्ञ व्याख्याने, कृती प्रात्यक्षिके, शिवार फेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. विशेषतः कार्यशाळेत सहा विषयांच्या चर्चेसाठी निवड केल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी

https://forms.gle/zHbqd9JMq7F9C5XA7 या लिंकवर नोंदणी करावी. आपला प्रवेश निश्‍चित करावा. अधिक माहितीसाठी संपर्क मो. क्रमांक ः ९४२२५१९९७१, २७५५७३२९२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com