शेतीमाल, खाद्यपदार्थांच्या गरजेनुसार पॅकेजिंग

शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते. ब्रँड तयार होतो. खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात. पॅकेजिंग क्षेत्र हे अन्न उद्योगाचा सर्वात जलद विकसित होणारा भाग आहे. आपल्या गरजेनुसार पॅकेजिंगचे पर्याय उपलब्ध आहेत.
Food Packaging
Food Packaging Agrowon

पल्लवी कोळेकर (देवकाते),डॉ.आर.व्ही.चव्हाण,

काढणीनंतर फळे व भाजीपाल्याची योग्य हाताळणी (Packaging Of Fruit And Vegetables After Harvesting ),पॅकिंग,साठवण आणि वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे दरवर्षी देशात ३० ते ४० टक्के नासाडी होते. ही नासाडी (Wastage) टाळण्यासाठी फळे आणि भाज्या काढल्यानंतर त्यांची योग्य ती प्रतवारी करून पॅकिंग (Packaging Of Vegetables) करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या बाजारपेठेत भाज्या पाठवायच्या यावरून त्याचे पॅकिंग वेगवेगळे असते. शेतीमाल किंवा खाद्यपदार्थांच्या योग्य पॅकेजिंगमुळे त्यांचे संरक्षण होते. ब्रँड तयार होतो. खाद्यपदार्थ आकर्षकपणे सादर करता येतात. पॅकेजिंग क्षेत्र हे अन्न उद्योगाचा सर्वात जलद विकसित होणारा भाग आहे. सध्या खाद्य पॅकेजिंग, स्मार्ट पॅकेजिंग, अँटी-मायक्रोबियल पॅकेजिंग, पाण्यात विरघळणारे पॅकेजिंग,सेल्फ-कुलिंग आणि सेल्फ हिटींग पॅकेजिंग/ उष्णता समायोजन पॅकेजिंग, चव आणि गंध शोषक पॅकेजिंग आणि सूक्ष्म पॅकेजिंग असे पॅकेजिंगचे प्रकार उपलब्ध आहेत.

Food Packaging
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

खाद्य पॅकेजिंग ः

१) पॅकेजिंग वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

२) अन्नातील नासाडी कमी करते. पॅकेजिंगवर होणारी अतिरिक्त गुंतवणूक कमी करते.

५) हे पॅकेजिंग खाद्यपदार्थ पासून बनविले आहे म्हणून ते कमी अपायकारक आहेत.

उदा. आइस्क्रीम कोन, खाण्यायोग्य आवरण

स्मार्ट पॅकेजिंग ः

१) पॅकेजिंग अत्याधुनिक सेन्सर (संवेदना) तंत्रज्ञानासह बनविलेले आहे.

२) स्मार्ट पॅकेजिंग हे खाद्यपदार्थ, फार्मास्युटिकल्स आणि इतर अनेक प्रकारच्या उत्पादनांसाठी वापरले जाते.

३) स्मार्ट पॅकेजिंग हे साठवण क्षमता वाढवण्यासाठी, ताजेपणाचे निरीक्षण करण्यासाठी, गुणवत्तेबद्दल माहिती प्रदर्शित करण्यासाठी आणि उत्पादन आणि ग्राहक सुरक्षितता सुधारण्यासाठी वापरले जाते.

४) या प्रकारचे पॅकेजिंग ग्राहकांना तो पदार्थ खायला चांगले की वाईट हे दर्शविते. रंग बदलून उत्पादनाची गुणवत्ता दर्शवते.

Food Packaging
Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

अँटी-मायक्रोबियल पॅकेजिंग ः

१) प्रतिजैविक पॅकेजिंग ही एक अशी प्रणाली आहे जी सूक्ष्मजीवांचा नाश किंवा वाढ रोखू शकते. यामुळे नाशवंत उत्पादनांची साठवण क्षमता वाढते. उत्पादनांची सुरक्षा वाढवते.

२) या पद्धतीच्या पॅकेजिंगमध्ये प्रतिजैविक पदार्थाचा लेप, किंवा थर दिला जातो.

पाण्यात विरघळणारे पॅकेजिंग ः

१) पॅकेजिंगसाठी वापरण्यात आलेले पदार्थ हे गरम पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर विरघळतात.

२) सुरवातीला कोरड्या पावडर स्वरूपात आणि इच्छित ठिकाणी पोहोचल्यावर अंतिम पदार्थ तयार करून वाहतूक खर्च कमी करता येतो.

३) हाताळण्यास सोपे, प्रदूषण कमी करतात.

सेल्फ-कुलिंग आणि सेल्फ हिटींग पॅकेजिंग ः

१) अशा प्रकारचे पॅकेजिंग वातावरणानुसार तापमान बदलतात. यासाठी काही रासायनिक आणि यांत्रिक तंत्रज्ञानाची गरज असते.

२) हे पॅकेजिंग हे मुख्यतः पेय पदार्थांसाठी वापरतात.

३) हे पॅकेजिंग लष्करी विभाग, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा जेव्हा जेव्हा पारंपारिक स्वयंपाक उपलब्ध नसतो तेव्हा वापरले जाते.

चव, आद्रता आणि गंध शोषक पॅकेजिंग ः

१) अतिरिक्त आद्रता,नको असलेला वास, चव हे अन्न खराब

होण्याचे प्रमुख कारण आहे.विविध शोषकाद्वारे हा नको असलेला वास, चव आणि अतिरिक्त आद्रता अन्न पदार्थातून काढून घेतली जाते.

२) हे शोषक अन्न गुणवत्ता राखण्यास तसेच त्याची टिकवण क्षमता वाढविण्यास मदत करते.

सूक्ष्म पॅकेजिंग ः

१) नॅनो-कणांचा वापर करून अवघ्या काही मिलिमीटर जाडीचा अभेद्य थर देऊन सूक्ष्म पॅकेजिंग केले जाते.या तंत्राद्वारे पॅकेजिंग आकर्षक तंत्र लवचिक, विलगीकरण आणि कमी खर्चिक होते.

२) अन्न, पेये आणि फार्मास्युटिकल उद्योगांमध्ये वापर करतात.

३) हे पॅकेजिंग प्लास्टिकपेक्षा पर्यावरण पूरक आहे.

४) सूक्ष्म पॅकेजिंग थर हा माती,पाणी आणि काही विशिष्ट पॉलिमरचा वापर करून बनवितात.

५) नॅनो-कण हे पदार्थांचे ऑक्सिजन, आद्रता आणि कार्बनडाय ऑक्साईड पासून संरक्षण करते.

६) डेअरी आणि फार्मसी उद्योगांमध्ये सूक्ष्म पॅकेजिंग वापरतात.

---------------------------------------------------------------------

संपर्क ः

- पल्लवी कोळेकर ( देवकाते), ९९२१९०९२७०

(आचार्य पदवी विद्यार्थिनी,कृषी अर्थशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय,परभणी)

- डॉ.आर.व्ही.चव्हाण,९२८४५४२७८५

( सहयोगी प्राध्यापक,कृषी अर्थशास्त्र विभाग,कृषी महाविद्यालय ,परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com