Paddy : शेतकरी पीक नियोजन : भात

नाधवडे (ता.वैभववाडी) येथे राजेश तावडे यांची ९ एकर जमीन आहे. त्यापैकी ७ एकरावर आंबा, काजू, नारळ, कोकम या फळबागा आहेत. तर खरीप हंगामात दोन एकरावर भात लागवडीचे त्यांचे नियोजन असते.
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

शेतकरी ः राजेश परशुराम तावडे

गाव ः नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती ः ९ एकर

भात लागवड ः २ एकर

नाधवडे (ता.वैभववाडी) येथे राजेश तावडे यांची ९ एकर जमीन आहे. त्यापैकी ७ एकरावर आंबा (Mango), काजू (Cashew), नारळ, कोकम या फळबागा आहेत. तर खरीप हंगामात दोन एकरावर भात लागवडीचे (Paddy Cultivation) त्यांचे नियोजन असते. भात लागवड एसआरआय पद्धत आणि यंत्राद्वारे करण्याचे नियोजन असते. त्यानुसार दोन वेगवेगळ्या भात रोपवाटिका तयार केल्या जातात.

यंत्राद्वारे भात लागवड ः

रोपवाटिका ः

- भात बियाणे पाण्यात २४ तास भिजत ठेवले. त्यानंतर पाण्यातून बियाणे काढून गोणपाटावर २४ तास ठेवले. त्यानंतर कोंब आलेले बियाणे पेरणीसाठी वापरले.

- यंत्राद्वारे भात लावणी करण्यासाठी विशिष्ट आकाराच्या साचामध्ये भात बियाणे पेरले जाते.

- त्यासाठी सुरुवातीला माती आणि वाळलेले शेण चाळणीने चाळून घेतले. त्यानंतर माती आणि शेण चांगले मिसळून घेतले.

- माती आणि शेण प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे घेऊन साचे अर्धा इंच प्रमाणात भरून घेतले.

- प्रत्येक साचामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम कोंब आलेले बियाणे पसरले. त्यावर पुन्हा मातीचा हलका थर देऊन वर गवत अंथरून घेतले.

- सर्व साचे शेतामध्ये मोकळ्या ठिकाणी ठेवून दिले. पावसाची उघडीप असेल तेव्हा हलके पाणी दिले.

- साधारण १५ ते २० दिवसांत भात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात.

Paddy Cultivation
Paddy : यंत्राद्वारे भात लागवड करून खर्चात बचत करावी

यंत्राद्वारे पुनर्लागवड ः

- पेरणीनंतर साधारण १५ ते २० दिवसांनी साचातील रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. साचातून रोपांचे बेड अलगद मातीसह निघून येतात.

- पूनर्लागवडीपूर्वी शेतामध्ये १ ट्रॉली शेणखत, १८ः१८ः१० हे खत ७५ किलो प्रति एकर प्रमाणे पसरून घेतले.

- त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे ३ वेळा जमीन चांगली नांगरून घेतली.

- साधारण २२ जून रोजी रोपांचे बेड राइस ट्रान्सप्लान्टर यंत्रामध्ये व्यवस्थित ठेवून लावणी केली. दोन रोपांत साधारण ६ इंच आणि दोन ओळींत १ फूट अंतर राखत यंत्राद्वारे रोपांची लावणी केली.

- यंत्राद्वारे एकसमान अंतरावर भात रोपांची लावणी केली जाते. तसेच कमी वेळेत भात रोपांची पुनर्लागवड पूर्ण होते.

Paddy Cultivation
Paddy : भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन

एसआरआय पद्धतीने लागवड ः

रोपवाटिका ः

- मे महिन्यात शेताची भाजावळ केली.

- एक एकर क्षेत्रासाठी १ गुंठ्यावर रोपवाटिका तयार केली.

- पेरणीपूर्वी बियाणास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया केली.

- नांगरट करून गादीवाफे तयार केले. साधारण १ जून रोजी भात बियाणांची पातळ पेरणी केली.

- पेरणीनंतर साधारण २५ जून रोजी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार झाली.

पुनर्लागवड ः

- पूनर्लागवडीपूर्वी जमिनीची ३ वेळा नांगरणी केली. त्यानंतर एकरी १ ट्रॉली शेणखत दिले.

- एकरी १ ट्रॉली शेणखत, १८ः१८ः१० हे खत ७५ किलो प्रमाणे पसरवून दिले.

- नंतर उभी आडवी नांगरणी करून जमीन लागवडीसाठी तयार केली.

- त्यानंतर २५ जून रोजी भात लावणीस सुरुवात केली. लावणीसाठी दोरीवर १० बाय १० सेंमी अंतराच्या खुणा केल्या होत्या. त्यानुसार शिफारशीत अंतरावर भात रोपांची लावणी केली.

- एसआरआय पद्धतीने १ एकर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला.

पूनर्लागवडीनंतरचे कामकाज ः

- लागवडीनंतर २० दिवसांनी दोन्ही लागवड क्षेत्रात उगवलेले तण काढून टाकले.

- त्यानंतर युरिया खताचा पहिला डोस १ किलो प्रति गुंठा प्रमाण दिला. पुढील २० दिवसांनी दुसरा डोस १ किलो प्रति गुंठा प्रमाणे दिला जाईल.

- भात खाचरामध्ये पाण्याची योग्य पातळी राखली जाईल.

- मागील आठवडाभरापासून पावसात उघडीप असल्यामुळे खाचरात योग्य पाणी पातळी राखण्यासाठी बांधबंदिस्ती केली. त्यामुळे पाणी साचून राहण्यास मदत झाली.

- राजेश तावडे, ९४०४४ ५०००२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com