Tomato : टोमॅटोवरील कीड-रोग नियंत्रण

सध्याच्या काळात टोमॅटो आणि वांगी पिकावर प्रतिकूल हवामानामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
Tomato Crop Protection
Tomato Crop ProtectionAgrowon

डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. संजय कोळसे

रोग ः

१) पर्णगुच्छ ः

- रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.

- पाने वरच्या बाजूस वळालेली दिसतात. झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे दिसते.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- पांढरी माशीच्या बंदोबस्तासाठी फवारणी करावी.

Tomato Crop Protection
Tomato : वरूडकाजी, हिरापूर झाले टोमॅटो, कारल्याचे ‘क्लस्टर’

२) लवकर येणारा करपा ः

- पाने पिवळी पडतात.

- खोडावर, फांद्यावर तपकिरी व काळपट रंगाचे ठिपके दिसतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- ॲझोक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा

- किटाझीन (४८ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा

- पायरॅक्लोस्ट्रोबीन (२५ टक्के डब्ल्यू.जी.) ०.५ ग्रॅम

Tomato Crop Protection
Vegetable : नाशिकमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक वाढून दरात घसरण

३) मर रोग

- पानाच्या शिरा रंगहीन होऊन पाने पिवळी पडतात.

- झाडाच्या पेशी तपकरी होऊन कुजतात त्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- मेटॅलॅक्सिल-एम (३१.८ टक्के ई.एस.) २.५ ग्रॅम किंवा

- थायोफेनेट मिथाईल (३८ टक्के) अधिक कासुगामायसिन (२.२१ टक्के एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मिलि

४) फळसड ः

रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया सोलेनी

- फळधारणेच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसतो.

- फळांवर टोकाच्या बाजूस गोल तपकिरी डाग पडतात.

- फळे रंगहीन होऊन साल कातड्यासारखी होऊ फळे सडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- क्रेसॉक्सिम मिथिल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५४ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) १.५ ग्रॅम किंवा

- कॅप्टन (७० टक्के) अधिक हेक्साकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.

५) बॅक्टेरियल कॅंकर (देवी रोग) ः

- पाने, खोड आणि देठावर फिक्कट हिरवे ठिपके, रेषा दिसतात.

- पाने अर्धवट जळालेली, वाकडी दिसतात.

- फळावर गर्द तपकिरी ते काळे उंचवट्यासारखे खरबडीत डाग पडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट* १ ग्रॅम (टॅंक मिक्स).

टोमॅटोवरील किडी ः

१) फुलकिडे, मावा, तुडतुडे ः

- पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. किडींनी रस शोषल्यामुळे झाडे निस्तेज होऊन मरते.

- विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा

- इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा

- प्रॉपरगाईट (५० टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (५ टक्के एस.ई.)(संयुक्त कीडनाशक) २ मिलि

२) पांढरी माशी

- पानांतील रस शोषते. पानाचा रंग पिवळसर होतो.

- फुलगळ होऊन फळधारणा होत नाही.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा

- डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यू.पी.) १.२ ग्रॅम किंवा

- इमिडाक्लोप्रिड (१७.८० टक्के एस.एल.) ०.३ मिलि

३) फळे पोखरणारी अळी ः

- अळी शेंड्याची किंवा रोपांचे पाने खाते.

- फळांना पोखरून त्यात विष्टा टाकतात. त्यामुळे फळे खराब होऊन सडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिलि किंवा

- इन्डोक्झाकार्ब (१४.५० एस.सी.) ०.८ मिलि किंवा

- नोव्हॅल्युरॉन (१० टक्के ई.सी.) १.५ मिलि

४) नागअळी किंवा पाने खाणारी अळी ः

- अळी पानाच्या पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडते.

- पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

इथिऑन (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के) (संयुक्त कीडनाशक) २.५ मिलि.

५) टुटा ॲबसोल्युटा अळी ः

- अळी पानांमध्ये फुग्यासारखी गॅलरी तयार करते.

- पाने, फळांवर गॅलरी तयार करते. त्यानंतर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- इन्डोक्झाकार्ब (१४.५ एस.सी.) १ मिलि किंवा

- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिलि किंवा

- फ्लुबेन्डायअमाइड (४८० एस.सी.) ०.२५ मिलि

--------------------

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७ ९१११५

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com