Linseed Cultivation : सुधारित तंत्राने करा जवसाची लागवड

जवस हे पिक मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या उत्तम निचऱ्याच्या आम्लवीम्ल निर्देशांक पाच ते सात या दरम्यान असणाऱ्या जमिनीत चांगले येते
Linseed Cultivation
Linseed CultivationAgrowon

जवस (Linseed) हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) महत्त्वाचे तेलबिया पीक (Oil Seed Crop) आहे. जवसाचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. जवसामधून आठ प्रकारचे प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलामध्ये ५८ % ओमेगा ३, ओमेगा ६ संपृक्त मेदआम्ले आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे हृदयरोगास कारणीभूत असलेले विकार, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांचे प्रमाण कमी होते. संधिवात सुसह्य होतो. मधुमेह आटोक्यात येतो. कर्करोग व इतर रोगांना प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणून जवस दैनंदिन आहारात जरूर वापरावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनूसार पुढीलप्रमाणे जवसाची लागवड करावी.

Linseed Cultivation
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’

जवसाचा उपयोग 

जवस तेलाच्या एकूण उत्पादनापैकी २० % खाद्यतेल म्हणून तर ८० % तेलाचा औद्योगिक क्षेत्रात साबण, पेंड, वॉर्निश शाई तयार करण्यासाठी केला जातो. जवसाची ढेप दुभत्या जनावरांसाठी उत्तम खुराक आहे. जवसाच्या काड्यापासून तयार होणाऱ्या धाग्याची प्रत चांगली असल्यामुळे पिशव्या कागद व कपडे तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 

Linseed Cultivation
जवस एक सुपरफूड

लागवड तंत्र काय आहे?

- जवस हे पिक मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या उत्तम निचऱ्याच्या आम्लवीम्ल निर्देशांक पाच ते सात या दरम्यान असणाऱ्या जमिनीत चांगले येते 

- पिकाच्या वाढीसाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. फुलोरा व त्यानंतरच्या अवस्थेत जास्त कोरडे व उच्च तापमान असल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते.  

- खरीप हंगामात पडीक ठेवलेल्या जमिनीवर पीक घ्यावयाचे असल्यास नांगरणी करून प्रत्येक पावसाच्या उघडीपीमध्ये वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी किंवा सोयाबीन, उडीद, मूग यासारखे अल्पमुदतीची पिके घेऊन जवसाचे दुबार पीक घ्यावयाचे असल्यास पिके निघाल्यानंतर ताबडतोब वखराच्या आडव्या - उभ्या पाळ्या देऊन काडी, कचरा, धसकटे वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी. 

- पाण्याची उपलब्धता असल्यास ओलीत करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्टरी २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून मिसळावे. 

- लातूर जवस ९३, एन एल ९७, एन एल २६० तसेच कोरडवाहू लागवडीसाठी शारदा पद्मिनी ३९७ या सुधारित वाणांचा वापर करावा. 

- कोरडवाहू पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास ऑक्टोबर च्या पहिला आठवड्यात पेरणी करावी. तर बागायती क्षेत्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पेरणी करावी. पेरणी वेळेवर केल्यास भुरी रोग व गादमाशी या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. 

- हेक्टरी २५ ते ३० किलो बियाणे वापरावे. रोपांतील दोन ओळीतील अंतर तीस सेंटीमीटर ठेवावे जेणेकरून झाडांची हेक्टरी संख्या योग्य राहील. ओलाव्यानुसार बियाणे दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर चाडी च्या तिफनीने पेरावे. 

- जवसाच्या कोरडवाहू लागवडीसाठी हेक्‍टरी २५ किलो नत्र व २५ किलो स्फुरद संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. बागायती लागवडीसाठी नत्र प्रती हेक्टरी ५० किलो, २५ किलो स्फुरद यापैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित अर्ध्या नत्राची मात्रा पाण्याच्या पाळीच्या वेळी  २५ ते ३० दिवसांनी द्यावी. 

- रोप अवस्था,  फुलोरा अवस्था आणि बी भरण्याची अवस्था अशा संवेदनशील अवस्थेत पाण्याच्या तीन पाळ्या दिल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होते

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com