Chana Pest : ढगाळ वातावरण ठरतेय घाटे अळीसाठी पोषक

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्र मोठी असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडी घालतात.
हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापनासाठी शेतामध्ये   ‘टी’ (T) आकाराचे पक्षिथांबे उभारावेत.
हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापनासाठी शेतामध्ये   ‘टी’ (T) आकाराचे पक्षिथांबे उभारावेत. Agrowon

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर (Chana Crop) घाटेअळीचा (Pod Borer) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्र मोठी असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडी घालतात. या सर्व बाबी घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असल्यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळया सुरुवातीला कोवळी पाने, कळया व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळया घाटे कुरतडुन त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणत: एक अळी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील, किटकशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी केले आहे.

हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापनासाठी शेतामध्ये   ‘टी’ (T) आकाराचे पक्षिथांबे उभारावेत.
Rabi Season : ढगाळ वातावरण ठरतेय कीड, रोगाला पोषक

 उपाययोजना काय आहेत?

कोळपणी किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे. घाटेअळीच्या मोठया अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात. 

घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. 

कामगंध सापळयामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडनाशकाची फवारणी करावी. 

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल. 

पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. 

घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही (५०० एल ई) १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकुन सायंकाळी फवारणी करावी. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड (३९.३५ एससी) २ मिली किंवा क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) २.५ मिली यापैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीडनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी. शेतात कीडनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.  

173 words / 1166 characters

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com