किस्से आळेफाट्याचे : पोलिस पाटील

गाव तसं चांगलं पण पोलिस पाटलाचा विषय आला की बिथरतंच. पोलिस पाटलांच्या मुलाखतीने नेमणूका झाल्या तोवर ठिक होतं. पण त्याला तीन साडेतीन हजार पगार सुरु झाला
पोलिस पाटील
पोलिस पाटीलAgrowon

गाव तसं चांगलं पण पोलिस पाटलाचा विषय आला की बिथरतंच. पोलिस पाटलांच्या मुलाखतीने नेमणूका झाल्या तोवर ठिक होतं. पण त्याला तीन साडेतीन हजार पगार सुरु झाला आणि अनेकांच्या मनात सकाळ संध्याकाळ घंटानाद होवू लागला.

एका आटक बटक चवळी चटक गावात या घंटानादाचा कळस झाला. पोलिस पाटील मागास, त्यात गरिब, वर शांत. हे सगळं कमी म्हणून की काय निरुपद्रवी आणि सरळमार्गीही. जे काय असेल ते पोलिसांना खरं सांगायचा. मिटवा मिटवी आणि दाबादाबीची भानगड नाही. हे सर्व बहुजनघातक दुर्गून त्याच्या अंगलट न आले तर नवल.

पोलिस पाटील बदलायचं वारं 8-10 जणांच्या टोळक्यात, मग वस्तीत, गल्लीत, चौकात व सरतेशेवटी गावात घुमायला लागलं. अर्थात तो अधिकार गावाला नाही. पण वाजत्या घंटेची लोळी कोण धरणार. घंटा वाजली. ग्रामसभा भरली. ठराव झाला. जुना पोलिस पाटील रद्द. नव्याची निवड.

पोलिस पाटील
Crop Damage : मराठवाड्यात २५ टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

नव्या निवडीचे फ्लेक्स गावभर लागले. पण त्याला इचारतो कोण. पोलिस व शासन नियुक्त पोलिस पाटील एकच. जुना पठ्ठ्या. त्याचा आपला दिनक्रम रोजच्यासारखाच कायम.

ग्रामसभा आणि येड्या घंट्यांच्या घंटानादाचा त्याच्यावर घंटा परिणाम झाला नाही. ना तो मेला. ना त्याने राजीनामा दिला. ना जागा रिक्त झाली. ना नवी भरती झाली. ना पोलिस पाटील बदलला. घंट्यांचा आवाज आणि उंचावलेले फ्लेस आपसूक भुईसपाट झाले.

गावगाड्याची एकेक मेख साली एवढी इरसाल निघते की बस्स... कळतच नाही. अज्ञानाची किव करावी, बेरकीपणाचं कौतुक की फालतूपणाचा राग !

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com