Grape Adversary : बागेत वाफसा नसल्याने उद्‍भवणाऱ्या समस्या

सततच्या पावसामुळे जमिनीत वाफसा स्थिती येण्याची चिन्हे कमी आहेत.अशा स्थितीमध्ये बागेत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यातील काही समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.
Grape Adversary
Grape AdversaryAgrowon

१) डोळे न फुटणे

द्राक्ष लागवडीखालील (Grape Sowing) बऱ्याच भागात ही समस्या दिसून येत आहे. बागायतदारांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारीनुसार फळछाटणीनंतर १४ ते १६ दिवस होऊनही अजून डोळे फुटलेले दिसत नाहीत. काही ठिकाणी शेंड्याकडील फुटी निघाल्या आहेत, तर काही ठिकाणी सबकेनच्या खालील डोळे फुटलेले दिसत आहेत. अशा मागेपुढे फुटी निघताना दिसत असल्याचे समजते.

Grape Adversary
Grape Prunning : सांगलीत पन्नास टक्के द्राक्ष फळ छाटणी

बागेमध्ये फुटी एकसारख्या निघण्यासाठी फळछाटणीपूर्वी काडीवरील डोळे फुगलेले असावेत. डोळे जर पूर्णपणे फुगलेले असतील, तर फुटी सहज निघतात. त्याकरिता पानगळ होणे गरजेचे असते. या हंगामात पावसाचा कालावधी वाढत गेल्यामुळे काडीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश फार कमी काळाकरिता मिळाला. बराच काळ ढगाळ वातावरणामध्ये गेला. त्यामुळे काडीसुद्धा परिपक्व झालेली नाही. ज्या बागेत पानगळ पूर्ण झाली नाही, अशा ठिकाणी जर लवकर छाटणी घेतली असल्यास डोळे पूर्णपणे फुगलेले नसल्याने फुटी निघण्याच्या अडचणी आल्या असाव्यात.

Grape Adversary
Grape Advisory : सततच्या पावसामुळे बागेत उद्‍भवणाऱ्या समस्या

एका वेलीवर काड्यांची जाडी कमी अधिक दिसून येईल. जाड काडीवरील डोळा मोठा असल्यामुळे त्याला बारीक काडीवरील डोळ्याच्या तुलनेमध्ये फुटण्याकरिता अधिक वेळ लागतो. यासोबत काडीवर छाटणी घेतेवेळी जर सबकेनच्या पुढे चार डोळ्यावर छाटणी घेतलेली असल्यास सबकेनच्या गाठीच्या पुढील डोळे लवकर फुटतील. या तुलनेत गाठीखाली असलेले डोळे फुटण्यास उशीर होईल. एका काडीवर सबकेनच्या वर जाडी कमी असते, तर तीच काडी सबकेनच्या खाली जाड असते.

Grape Adversary
Grape Pruning : सांगलीत पन्नास टक्के द्राक्ष फळ छाटणी

यामुळेही एकाच वेळी डोळे फुटण्यात अडचणी येतात. यासाठी काडी कोणत्याही प्रकारची असली तरी पानगळ होऊन डोळे फुगल्याशिवाय छाटणी करणे टाळावे. बऱ्याचदा बागायतदार पानगळ झालेली नसतानाही हाताने पानगळ करून त्याच दिवशी छाटणी घेतात. वेलीची पूर्ण पानगळ झालेली असल्यास ती काडी साधारणतः तीन ते चार दिवस तशीच उघडी राहिल्यास वेलीच्या मुळाद्वारे घेतलेल्या अन्नद्रव्यांचा वेलीवर दाब निर्माण होऊन डोळे फुगण्यास मदत होते. छाटणी केल्याबरोबर लगेच हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करण्याचे टाळून तिसऱ्या दिवशी (किंवा कमीत कमी दुसऱ्या दिवशी) पेस्टिंग केल्यास अडचणी येणार नाहीत.

Grape Adversary
Grape Crop Insurance: द्राक्ष विमा योजनेचा लाभ कसा घ्याल ?

ज्या बागेत डोळे मागेपुढे फुटण्याची समस्या आहे, किंवा डोळे अजून कापसलेलेच नाहीत, अशा स्थितीत त्वरित हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग किंवा फवारणी करता येईल. डोळे कापसलेल्या परिस्थितीमध्ये मात्र त्याचा वापर केल्यास डोळे जळण्याची शक्यता अधिक असते. ज्या बागेत सबकेनच्या चार डोळे पुढे छाटणी घेतली आहे आणि फुटी निघालेल्या नाहीत, अशा बागेत सबकेनच्या पुढे एक किंवा दोन डोळे राखून पुढील भाग कापून घ्यावा. यामुळे मागील डोळे फुटण्यास मदत होते.

२) पिवळ्या फुटी निघणे

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बागेतील बोदातून व मुळांच्या कक्षेतून पाणी व अन्नद्रव्ये वाहून गेली असतील. छाटणी होईपर्यंत जर जास्त पाऊस झाला असल्यास मुळांच्या कक्षेतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा पूर्ण निचरा होऊन काहीच उरलेले नसल्याची स्थिती असल्यास नवीन फुटी निघताना अडचणी येऊ शकतात. खरेतर फळछाटणीनंतर निघत असलेल्या फुटीकरिता आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची पूर्तता ही काडी किंवा ओलांड्यातून जास्त प्रमाणात केली जाते.

परंतु जर पानगळ होण्यापूर्वी काडी परिपक्वतेच्या कालावधीत जास्त प्रमाणात नवीन फुटी निघालेल्या असल्यास या भागातील अन्नद्रव्यांचा ऱ्हास झाला असेल. अशा वेळी अन्नद्रव्याचा पुरवठा पूर्ववत होण्याकरिता काही कालावधी आवश्यक असतो. म्हणून हा समतोल बिघडलेला असल्यास नवीन

फुटी एकतर लवकर निघतात, अशक्त असतात किंवा पिवळसर दिसतात. या वेळी ज्या बागेत जमीन अजूनही वाफसा परिस्थिती आलेली नाही, अशा ठिकाणी सध्या जमिनीतून अन्नद्रव्याची उपलब्धता करणे टाळावे. कारण अशा जमिनीतून थोडा पाऊस झाला, तरी वेलीस उपलब्ध केलेली अन्नद्रव्ये वाहून जाण्याची शक्यता असेल. त्यासाठी वाफसा येईपर्यंत अन्नद्रव्यांचा पुरवठा फवारणीद्वारे करावा. फुटी पिवळ्या पडण्याचे कारण या वेळी स्पष्ट होत नसले तरी नत्र, फेरस आणि मॅग्नेशिअम यांच्या कमतरतेमुळे या अडचणी येताना दिसतील.

अ) पूर्ण फूट अशक्त असल्यास नत्रयुक्त खतांचा वापर करता येईल.

ब) फक्त पान पिवळे दिसत असल्यास फेरसचा वापर करता येईल.

क) पानांच्या कडा पिवळ्या दिसत असल्यास मॅग्नेशिअमचा वापर करता येईल.

३) फळकुजेची समस्या ः

बऱ्याचशा बागेत प्रीब्लूम अवस्थेतील द्राक्षघडावर कूज होताना दिसत आहे. फळछाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग प्रत्येक काडीवरील चार ते पाच डोळ्यावर केले जाते. म्हणजेच प्रत्येक काडीवर तितक्याच प्रमाणात फुटी निघतात. अशा फुटी पूर्ण वेलीवर असल्यास प्रीब्लूम अवस्थेमध्येच दाट कॅनोपी तयार होते. घडाच्या दोडा अवस्थेमध्ये व पावसाळी वातावरणात दाट कॅनॉपी हानिकारक ठरू शकते.

सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बाकीच्या काही गोष्टी आपल्याला टाळता येत नसल्या तरी मोकळी कॅनॉपी ठेवणे सहज शक्य आहे. यासाठी प्रीब्लूम अवस्थेमध्येच फेलफुटी काढलेल्या असल्यास मोकळी कॅनॉपी राहते. त्यामध्ये हवा खेळती राहते. परिणामी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन घड कुजण्याची समस्या राहणार नाही.

दाट कॅनॉपीत प्रीब्लूम अवस्थेतील घड फारच नाजूक असतो. अशा घडामध्ये एक तास जरी पाणी साचून राहिल्यास घड कुजतो. या वेळी पावसामुळे एकतर मुळे आवश्यक तितकी कार्य करत नाही, त्यामुळे वेलीला ताण बसतो. अशा वेळी वेल सशक्त होण्याच्या दृष्टीने फेलफुटी शक्य तितक्या लवकर काढून घ्याव्यात. वेलीवरील फुटींच्या वाढीचा जोम थोडा जरी जास्त दिसला तरी पोटॅशचा वापर फवारणीद्वारे करावा. त्यामुळे वाढ नियंत्रणात राहील. यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक, बोरॉन व मॅग्नेशिअम) फवारणी करून घ्यावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com