बेदाणानिर्मिती ठरू शकते फायद्याची...

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात द्राक्ष उत्पादनासाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भागातील कासेगाव व परिसराची गुणवत्तापूर्ण बेदाणानिर्मितीसाठी वेगळी ओळखही तयार झाली आहे.
Raisin production
Raisin productionAgrowon

डॉ. अजय कुमार शर्मा, रोहित पलघडमल, डॉ. आर. जी. सोमकुंवर

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात द्राक्ष उत्पादनासाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भागातील कासेगाव व परिसराची गुणवत्तापूर्ण बेदाणानिर्मितीसाठी वेगळी ओळखही तयार झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षामध्ये वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि अवकाळी पावसामुळे बेदाणा उत्पादन कमी होत चालल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे मत आहे.

नुकत्याच निदर्शनास आलेल्या माहितीनुसार पंढरपूर विभागातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा काढून टाकण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्याची कारणमीमांसा तपासली असता या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार द्राक्ष विक्रीतून खर्च वजा जाता अत्यल्प नफा हाती येत आहे. बहुतांश शेतकरी उशिरा ऑक्टोबर फळछाटणी करतात, त्यामुळे फळकाढणीदेखील उशिरा म्हणजे मे -जूनच्या दरम्यान होते. या काळात नेमका अवकाळी पावसाचा फटका बसतो. या वर्षीही बऱ्याच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. प्रामुख्याने या कारणांमुळे शेतकऱ्यांनी बाग काढून टाकण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र वरील समस्यांचे निराकरण करणे शक्य असल्याचे मांजरी (जि. पुणे) येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीतून अपेक्षित रक्कम मिळत नसल्याचे व अत्यल्प नफा मिळत असल्याचे लक्षात येताच, द्राक्षाची विक्री करण्यापेक्षा बेदाणा निर्मितीकडे वळले पाहिजे. यामुळे मूल्यवर्धन होण्यास मदत होईल. मात्र, पंढरपूर विभागामध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त होऊ लागले असून, त्यातून बेदाणा काळसर होण्याची समस्या निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून गंधक (सल्फर) पावडर धुरी अर्धा ते एक ग्रॅम प्रति किलो द्राक्ष या प्रमाणात दिल्यास द्राक्ष बेदाण्याचा सोनेरी रंग टिकविण्यास मदत होईल. गुणवत्तापूर्ण बेदाणानिर्मितीतून योग्य नफा मिळणे शक्य होईल. त्यामुळे फळ बागा काढून न टाकता द्राक्षापासून मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीकडे शेतकऱ्यांनी वळावे.

संपर्क ः डॉ. अजय कुमार शर्मा, ९९२३७४८२५०

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com