उसातील लाल कूज रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

लाल कूज हा उस पिकातील घातक रोग असून बुरशीमुळे पसरतो.
Red Rot Disease of Sugarcane Crop
Red Rot Disease of Sugarcane Crop Agrowon

ऊस पिकातील (Sugarcane) कर्करोग (Cancer) म्हणून ओळखला जाणारा लाल कूज (Red Rot) रोग उभे पिक नष्ट करू शकतो. या रोगाच्या संसर्गामुळे उसाचे वजन २९ टक्क्यांनी कमी होऊ शकते परिणामी उसाचा दर्जा निकृष्ट होतो. निरोगी उसाच्या तुलनेत रोगट उसामधील तब्बल २५-७५ टक्के सुक्रोज (Sucrose) कमी होते. १९३८-१९३९ साली भारतातील प्रमुख ऊस क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार या उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रथम लाल कूज रोग दिसून आला होता.
लाल कूज हा उस पिकातील घातक रोग असून बुरशीमुळे पसरतो. या रोगास कारणीभूत ठरणारी बुरशी वारा, पाऊस आणि कीटकांमुळे पसरते. हा रोग जमिनीत एक वर्षापासून दुसऱ्या वर्षापर्यंत टिकून राहू शकतो. साधारणतः सप्टेबर - ऑक्टोबर महिन्यात या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

Red Rot Disease of Sugarcane Crop
Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

लक्षणे
- हा रोग उसाच्या सर्व भागांवर येतो. प्राथमिक लक्षणे पानांच्या मध्य शिरेवर रंगहीन ठिपके अथवा रेषांच्या स्वरूपात दिसतात. यामध्ये नवीन पाने शेंड्यापासून पिवळी पडलेली व वाळत आलेली दिसतात.
- खोडकीड किंवा मुळे पोखरणाऱ्या अळीने केलेल्या छिद्राद्वारे अथवा दोन कांड्यांच्या जोडातून या बुरशीचा शिरकाव उसाच्या अंतर्भागात होतो.
- सुरवातीस रोगाची बाह्य लक्षणे खोडावर दिसत नाहीत; परंतु रोगग्रस्त उसाचे उभे दोन काप केले असता आलटून पालटून तांबडे व पांढरे रंगांचे पट्टे दिसतात.
- रोगग्रस्त उसाचा आंबूस वास येऊन वाढ खुंटलेली दिसून येते. यामुळे असे ऊस पिवळे पडून उसाचा शेंड्याकडील भाग वाळून गेलेला दिसतो.
- सतत पडणारा पाऊस, थंड हवामान व गरजेपेक्षा जास्त पाणी देणे, शिवाय रोगाला बळी पडणाऱ्या जातींची लागवड आदी घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात.
- बेणे, हवा व रोगग्रस्त पिकातून वाहणाऱ्या पाण्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.

Red Rot Disease of Sugarcane Crop
Cotton : कापूस वेचणी यंत्राची चाचणी अंतिम टप्प्यात

काय उपाययोजना कराव्यात
- लागवडीसाठी रोगमुक्त, निरोगी बेणे निवडावे.
- लाल कूज रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उस शेतामध्ये एका वर्षी भात आणि पुढील दोन वर्षात इतर पिकाची फेरपालट करावी.
- शिफारस केलेल्या रोगप्रतिकारक आणि मध्यम रोगप्रतिकारक को ८६०३२, कोसी ८६२४९, कोसी ९५०७१, कोजी ९५०७६, कोसी २२, कोसी ६ आणि कोजी ५ अशा वाणांची निवड करावी.
- सुरुवातीच्या टप्प्यात प्रादुर्भाव झालेले झाड काढून टाकावेत आणि कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
- लागवडीपुर्वी बेणे १ टक्का बोर्डोमिश्रणच्या द्रावणात बुडवावेत.
- रोग आढळून आल्यास पाने व ऊस गोळा करून जाळून नष्ट करावेत.
- लागवडीपुर्वी कार्बेन्डाझिम (५० ड्ब्लूपी) ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम (२५ डीएस) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात युरीया सोबत २.५ किलो २५० लिटर पाण्यात मिसळून बेणे प्रक्रिया करावी.
- बाजारात अनेक बुरशीनाशके उपलब्ध आहेत त्यांचा वापर शिफारशीत प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com