Vegan Food : वेगन फूड अन्नपदार्थांचे नियमन आणि नियंत्रण

लोक शाकाहारी अन्नाकडे (वेगन फूड) वळू लागले आहेत.
फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी
फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी

लठ्ठपणा, मधुमेह (Diabetis) आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचे प्रमाण तसेच आरोग्य आणि निरोगीपणाची चिंता वाढल्यामुळे, रस आणि इतर वनस्पती-आधारित पेये यांसारख्या वनस्पती-आधारित उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. विशेषतः लोक शाकाहारी अन्नाकडे (Vegan Food) (वेगन फूड) वळू लागले आहेत.

फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी
वेगन दूध म्हणजे नक्की काय?

अन्न सुरक्षा व मानदे नियमन २०२२ नुसार शाकाहारी अन्न (वेगन फूड) म्हणजे अन्न किंवा अन्न घटक, ज्यात पदार्थ, फ्लेवरिंग्ज घटक, उत्प्रेरक आणि वाहक किंवा प्रक्रिया साह्य जे प्राणी उत्पत्तीची उत्पादने नाहीत आणि ज्यात, कोणत्याही टप्प्यावर, जसे की उत्पादन आणि प्रक्रिया, घटक, मिश्रित पदार्थ, फ्लेवरिंग्ज घटक, उत्प्रेरक आणि वाहक यामध्ये प्राणी उत्पत्तीची प्रक्रिया करणारे साधन वापरले जात नाही. अलीकडच्या काळात लोक खूप आरोग्याविषयी खूप जागरूक झाले आहेत आणि बरेच लोक शाकाहारी झाले आहेत. जागतिक स्तरावर शाकाहारी बनण्याची निवड करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. शाकाहारी आहाराच्या लोकप्रियतेचे श्रेय शाकाहारीपणाची लोकप्रियता आणि शाश्‍वत जीवनावर वाढणारे लक्ष दिले जाऊ शकते. लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराचे प्रमाण तसेच आरोग्य आणि निरोगीपणाची चिंता वाढल्यामुळे, रस आणि इतर वनस्पती-आधारित पेये यांसारख्या वनस्पती-आधारित उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी
‘जंक फूड'चे आरोग्यावर होतोय परिणाम

वेगन फूड आणि भारतीय ः
१) जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरत असताना भारतीयदेखील त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचार करत आहेत. प्राणिजन्य आहार ते शाकाहारी आहार असा बदल होत आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारामुळे बरेच लोक शाकाहारी आहाराकडे वळले आहेत.
२) निरोगी जीवन जगण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून वेगन फूडचा अवलंब लोक करताना दिसतात. असे दिसून आले आहे, की लोक मांसाहाराला पर्याय म्हणून निरोगी शाकाहारी अन्नाकडे वळले आहेत. निरोगी आहाराबाबत जागरूकता लोकांपर्यंत पोहोचल्याने भारतात शाकाहारी सेवनाचा वेग वाढत आहे. साथीच्या आजारांमुळे लोक शाकाहारी आहाराकडे वळले आहेत.

फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी
जर्मनीची ऑफर नाकारून आणले आरोग्यदायी ‘फूड कल्चर’

महत्त्वाचे मुद्दे ः
१) लोक केवळ प्राण्यांच्या खाद्यपदार्थांपासून प्रथिने मिळवण्यावर अवलंबून असतात. परंतु पालक, मसूर, नट्स, बिया आणि बीन्समध्ये निरोगी मानवी शरीर टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी प्रथिने असतात.
२) सामान्य शाकाहारी आहारामध्ये भाज्या, फळे, तांदूळ, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांचा समावेश असतो, या स्वस्त असतात. हे शाकाहारी खाद्यपदार्थ कुठेही सहज उपलब्ध आहेत. महागड्या प्राणिजन्य उत्पादनांच्या तुलनेत ते खूपच स्वस्त आहेत.
३) दुग्धजन्य पदार्थ शरीरासाठी आवश्यक पोषणतत्त्वे पुरवतात. त्यामुळे दुधाला संपूर्ण अन्न म्हटले जाते. दुग्धजन्य पदार्थ कॅल्शिअमचे युक्त अन्न आहे. यामुळे हाडांना मजबुती मिळते. स्नायू आकुंचन, रक्त गोठणे, रक्तदाब आणि मज्जातंतूंना संदेश पाठवणे यांसारख्या अनेक निरोगी शरीराच्या कार्यामध्ये मदत करते. यामुळे प्रत्येक शाकाहारी व्यक्तीने कॅल्शिअमचे योग्य सेवन करणे आवश्यक होते. जेव्हा शाकाहारी खाद्यपदार्थांमधून कॅल्शिअम घेण्याचा विचार केला जातो तेव्हा पालक, सोया-आधारित पदार्थ, अंजीर, मसूर, मटार, तीळ, बदाम यांसारखे स्रोत उपलब्ध आहेत.
४) लोकांना काही पदार्थ खाण्याची सवय असते आणि ते स्वतःला चवदार पाककृतींपासून वेगळे करू शकत नाहीत. परंतु वनस्पती आधारित खाद्यपदार्थ खाण्याची सवय लावणे आणि शाकाहारी अन्नातून समान चव मिळवणे खूप सोपे आहे. लोक शाकाहारी खाद्यपदार्थांकडे अधिक वळत असल्याने, अनेक अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

वेगन फूड ः शाकाहारी अन्न- नियमन व नियंत्रण, २०२२
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा व मानदे (वेगन फूड) नियमन २०२२ साठी अंतिम अधिसूचना प्रकाशित केली. त्यामध्ये शाकाहारी खाद्यपदार्थ काय आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे लेबलिंग आणि पॅकेजिंग आवश्यक आहे आणि अन्न व्यावसायिकांसाठी देखील तरतुदींचे पालन करणे नमूद केले आहे. सदर नियमनाची अंमलबजावणी १० जून २०२२ पासून सर्व भारतभर सुरू झाली आहे. जे अन्न व्यावसायिक शाकाहारी अन्नपदार्थ म्हणून उत्पादन, पॅकिंग, विक्री, बाजार किंवा अन्यथा शाकाहारी अन्न म्हणून विक्री करणार असेल त्यांना या नियमनातील सर्व तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे.

नियमनातील सामान्य आवश्यकता ः
१) कोणतीही व्यक्ती या नियमनानुसार दिलेल्या आवश्यकतांचे पालन करत नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती उत्पादन, पॅक, विक्री, बाजार किंवा अन्यथा शाकाहारी अन्न (वेगन फूड) म्हणून कोणतेही अन्न वितरित किंवा आयात करू शकत नाही.
२) शाकाहारी (वेगन फूड) म्हटल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये, कोणत्याही नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केल्याशिवाय, सुरक्षा मूल्यमापनासह कोणत्याही कारणासाठी प्राण्यांच्या चाचणीचा समावेश नसावा.
३) शाकाहारी खाद्यपदार्थांसाठी वापरलेले प्रत्येक पॅकेजिंग साहित्य पॅकेजिंगच्या नियमनातील तरतुदींचे पालन करेल.
४) अन्न व्यावसायिक हे सुनिश्चित करेल की उत्पादन, प्रक्रिया आणि वितरणाचे सर्व टप्पे असतील. अशा प्रकारे चांगल्या उत्पादन पद्धतींच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी डिझाइन केलेल्या मांसाहारी पदार्थांची अनपेक्षित उपस्थिती टाळेल.
५) जर तीच उत्पादन लाइन मांसाहारी उत्पादने किंवा घटकांसह सामाईक केली गेली असेल, तर उत्पादनापूर्वी संपूर्ण स्वच्छता किंवा चांगल्या उत्पादन पद्धतींच्या अनुषंगाने तुलनात्मक उपाय केले जातील.
६) अन्न व्यावसायिकाने शाकाहारी उत्पादने तयार, उत्पादित किंवा पॅकेज करण्यापूर्वी चांगल्या उत्पादन पद्धतींच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी.
७) उत्पादक स्तरापर्यंत शोधनक्षमता स्थापित केली जाईल. अन्न व्यावसायिकाने वेळोवेळी खाद्यपदार्थ किंवा अन्न घटक किंवा उत्पादनांची शाकाहारी अखंडता राखण्यासाठी अन्न प्राधिकरणाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सर्व आवश्यकतांचे पालन केले पाहिजे.

शाकाहारी अन्नाचे (वेगन फूड) लेबलिंग ः
१) शाकाहारी अन्नाचा विक्रेत्याने एकतर केवळ किंवा किरकोळ व्यापाराचा भाग म्हणून असे अन्न मांसाहारी खाद्यपदार्थांपासून वेगळे करता येईल अशा पद्धतीने साठवावे आणि विक्रीस ठेवावे.
२) शाकाहारी पदार्थांचे प्रत्येक पॅकेज, मंजुरीनंतर त्यास लोगो असेल.
३) सर्व शाकाहारी खाद्यपदार्थांनी अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) विनियम, २०२० अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पॅकेजिंग आणि लेबलिंग आवश्यकतांचे पालन करावे.

शाकाहारी अन्न अनुपालन ः
- अन्न व्यवसाय ऑपरेटरने संबंधित परवाना प्राधिकरणाकडे सर्व आवश्यक तपशिलासह अन्न प्राधिकरणाने निर्दिष्ट केल्याप्रमाणे एक अर्ज सादर करावा.
------------------------------------------------------------
संपर्क ः नारायण सरकटे, ७५८८६४९२९६
(सहायक आयुक्त (अन्न) तथा पदावधीत अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com