Banana Disease : केळीवरील सिगाटोका रोगाची लक्षणे कशी ओळखायची?

महाराष्ट्रात केळीची लागवड मोठया प्रमाणावर होते. गेल्‍या काही वर्षात केळीवर सिगाटोका म्हणजेच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
sigatoka disease of banana
sigatoka disease of banana Agrowon

महाराष्ट्रात केळीची लागवड (Banana Cultivation) मोठया प्रमाणावर होते. गेल्‍या काही वर्षात केळीवर सिगाटोका (sigatoka disease) म्हणजेच करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. केळीची प्रत कमी झाल्याने उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होतो. हा रोग बुरशीजन्य असून उष्ण कटिबंधातील केळी लागवडीवर येतो. या रोगाची लक्षणे आणि प्रसार कसा होतो याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

sigatoka disease of banana
Banana Crop Management : शेतकरी नियोजन पीक : केळी

रोगाची लक्षणे 

१. प्रथम पानावर लहान पिवळे ठिपके येतात.

२. हे पिवळे ठिपके ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी रुंद आकाराचे होतात.

३. असे लांबट झालेले ठिपके कालांतराने रंगाने तपकिरी, काळे होऊन वाढतात व लांबट गोलाकार होतात. पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांची लांबी १२ ते १५ मि. मी. आणि रुंदी २.५ ते ३. मि. मी. एवढी असते.

४. पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्याभोवती पिवळी वलये तयार होतात.

५. शेवटी ठिपके मध्य भागापासुन राखी रंगाचे होऊन त्यांच्या कडाच फक्त काळपट राहतात.

sigatoka disease of banana
Banana Orchard Management : अशी घ्या केळी बागेची काळजी

६. ठिपक्यांची संख्या जास्त असेल तर ती वेगवेगळी ओळखता येत नाहीत आणि अशी रोगग्रस्त पान फाटतात, करपतात व झाडावर देठापासून मोडून लोंबकळतात.

७. रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर, तीव्र असेल तर केळी भरत नाहीत. अपरिपक्व पिकतात आणि घडातून गळू लागतात. अपरिपक्व पिकलेल्या फळाचा गर पिवळसर होतो व त्याची चव तुरट बनते.

रोगाचा प्रसार कसा होतो ?

- हया रोगाचा प्राथमिक प्रसार हवेव्दारे बिजाणुंमुळे होतो.

- बिजाणु पावसाचे थेंब व जोराचा वारा यामुळे पसरतात व दुय्यम प्रसारास कारणीभूत होतात.

- या बुरशीच्या वाढीस उष्ण व आर्द्रतायुक्त हवामान अनुकूल आहे. पाऊस व ढगाळ हवामानामुळे या रोगाचा उद्रेक पावसाळयात जास्त होतो. थंडी वाढल्यावर या रोगाचा प्रसार व वाढ थांबते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com