हरभरा बाजारात तेजीचे संकेत

केंद्र सरकारने यंदा देशात १३१ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान आणि उष्णता यामुळे उत्पादनात घट आली आहे.
Chana Work
Chana WorkAgrowon

केंद्र सरकारने (Center Government) यंदा देशात १३१ लाख टन हरभरा उत्पादनाचा (gram production) अंदाज व्यक्त केला. मात्र पाऊस, गारपीट, प्रतिकूल हवामान (Rain, hail, adverse weather) आणि उष्णता यामुळे उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे हरभरा (Gram) उत्पादन ८५ ते ९० लाख टनांच्या दरम्यानच राहील, असे जाणकारांनी सांगितले. हरभरा आयात दीड लाख टनावर आहे. तर नाफेड आणि उद्योगाकडील साठा २० लाख टन असू शकतो. त्यातच बफर स्टाॅक कमी झाल्याने नाफेड (NAFED) खरेदी वेगात सुरू आहे. त्यामुळे देशातील एकूण पुरवठा आणि मागणी पाहता हरभरा दर पुढील काळात तेजीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

हरभऱ्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. देशी हरभरा (Country Gram) आणि काबुली (Kabuli Gram) हरभरा. देशी हरभऱ्याचे उत्पादन मुख्यतः भारतात आणि शेजारच्या देशांत होते. तर काबुली हरभऱ्याचे उत्पादन भारतासह पश्‍चिम आशिया आणि इतर काही देशांमध्ये होते. हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. हरभऱ्याचे अनेक आरोग्यविषयक (Gram Health Benefit) फायदेही सांगितले जातात. यात शरीरातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवणे, मधुमेह आणि हृदयरोगावर हरभरा फायदेशीर असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे जागतिक पातळीवर हरभऱ्याचा वापर वाढत आहे. जगातील विविध देशांत आहारात हरभऱ्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.

Chana Work
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून

जगातील हरभरा (World Gram) वापरात कोणते देश आघाडीवर आहेत, असा प्रश्‍न आला तर त्याचे उत्तर भारत असेच आहे. भारत जागतिक पातळीवर कडधान्य उत्पादन आणि वापरात आघाडीवर आहे. देशांतर्गत उत्पादन कमी पडत असल्याने भाराताला कडधान्यांची आयातही करावी लागते. त्यात हरभऱ्याचाही समावेश आहे. हरभरा वापरात भारत जगात आघाडीवर आहे. सोबतच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, म्यानमार आणि इथिओपिया या देशांमध्ये हरभऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणत होतो. कोरोनानंतर जगभरात आरोग्यविषयक जागरूकता वाढली. त्यामुळे लोक आता प्रथिनेयुक्त (प्रोटीन) आहाराला पसंती देत आहेत. हरभऱ्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हरभऱ्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. तसेच भारतासह इतर विकसनशील देशांमध्ये लोकांचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे रेडी टू कूक, प्रक्रियायुक्त आणि हाॅटेल्सच्या खाण्याला प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रांतून हरभरा मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हरभऱ्याचा वापर वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे किंमत. इतर प्रथिनयुक्त पदार्थ, जसे की सोयाबीन, हभऱ्याच्या (Soybean, Gram) तुलनेत महाग असतात. इतर कडधान्यांच्या तुलनेत हरभऱ्याचा उत्पादनखर्च कमी असतो. तूर, मूग, उडीद, मसूर आदी पिकांच्या तुलनेत हरभरा किंवा हरभरा डाळ स्वस्त असते. त्यामुळे गरिबांच्या आहारात हरभऱ्याचा समावेश असतो. कडधान्यांमध्ये हरभऱ्याचाच पर्यायी वापर अधिक होतो. हरभऱ्यापासून उपपदार्थ जास्त बनवले जातात. यामुळे हरभऱ्याची (Gram) मागणी वर्षागणिक वाढतच आहे.

Chana Work
हरभरा खरेदीला केवळ ९५ शेतकऱ्यांचा प्रतिसाद

जागतिक पातळीवर कडधान्यामध्ये हरभरा तिसऱ्या क्रमांकाचे मुख्य पीक (World Third Number Gram) आहे. हरभरा उत्पादनात भारत जगात आघाडीवर आहे. जागाच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा तब्बल ७० टक्के आहे. मागील हंगामात भारतात ११९ लाख टन उत्पादन झाले, अशी सरकारची आकडेवारी सांगते. मात्र उद्योगाच्या मते उत्पादन १०० लाख टनांवरच स्थिरावले. त्यानंतर टर्कीचा नंबर लागतो. जगाच्या उत्पादनात टर्कीचा वाटा ४.४२ टक्के आहे. त्यानंतर रशिया ३.५५ टक्के, म्यानमार ३.५० टक्के, पाकिस्तान ३.१३ टक्के, इथिओपियाचा ३ टक्के वाटा आहे.

(डोनट डायग्राम पुढील प्रमाणे....)

Donut diagram
Donut diagramAgrowon


जागतिक उत्पादन (Global production)
जगात हरभरा उत्पादन वर्षागणिक वाढतच आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, टर्की, रशिया, म्यानमार, पाकिस्तान, अमेरिका, मेक्सिको, इराण आदी ६० ते ६५ देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन होते. मात्र भारताचा वाटा अधिक आहे. जगात हरभरा (World Gram) उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०१६ मध्ये जागतिक हरभरा उत्पादन ११६.२ लाख टनांवर होते. ते २०१८ मध्ये १६९.४ लाख टनांवर पोहोचले. त्यात पुन्हा घट होऊन २०२० साली १५०.८ लाख टनांवर आले. २०२१ मध्ये हरभरा उत्पादन (Gram Production) पुन्हा १७० लाख टनांवर पोहोचले, असे जाणकारांनी सांगितले. मात्र जागतिक पातळीवर हरभरा लागवड आणि उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे.

जागतिक हरभरा उत्पादन (लाख टनांत) पुढील फोटोत...

Chana Market
Chana MarketAgrowon

देशातील हरभरा लागवड (Gram cultivation in the country)
भारतात जगात सर्वाधिक हरभरा लागवड होते. भारतात रब्बी हंगामात हरभरा पीक घेतले जाते. देशातील एकूण रब्बी पिकांचा (Rabi Crop) विचार केला, तर सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याखाली असते. २०१८-१९ मध्ये देशात हरभऱ्याची सर्वांत कमी लागवड झाली. त्या वर्षी ९६.१९ लाख हेक्टरवर हरभरा पीक होते. तर २०१६-१७ मध्ये ९९ लाख हेक्टरवर पेरणी होती. त्यानंतर हरभरा लागवड वाढतच गेली. देशातील वाढता हरभरा वापर आणि सरकारने (Government) वाढविलेला हमीभाव यामुळे लागवडीत वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. चालू हंगामात जवळपास ११५ लाख हेक्टरवर हरभरा (Chana Cultivation) लागवड झाली. हे क्षेत्र आजपर्यंतचे विक्रमी ठरले. यंदा माॅन्सून लांबला होता. तसेच परतीचा पाऊस देशातील अनेक भागांत चांगला झाला. त्यामुळे रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध होते. परिणामी, यंदा हरभरा लागवड विक्रमी पातळीवर पोहोचली.

देशातील हरभरा लागवड (लाख हेक्टरमध्ये)

Country Chana Planting
Country Chana Planting Agrowon

देशातील राज्यनिहाय हरभरा लागवड (Country State level Chana Planting)_
देशात दरवर्षी मध्य प्रदेशात हरभरा लागवड (Gram Cultivation) सर्वाधिक होत असते. मध्य प्रदेशात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ३० लाख हेक्टर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत सरासरी १९ लाख हेक्टरवर, तर राजस्थानमध्ये १७ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली. परंतु यंदा लागवडीचे चित्र बदलले. महाराष्ट्राने यंदा हरभरा लागवडीत बाजी मारली. एकट्या महाराष्ट्रात लागवड ९ टक्क्यांनी वाढली. राज्यात २७ लाख हेक्टरवर हरभरा डोलतोय. केवळ क्षेत्रवाढच विचारात घेतली, तर गुजरामध्ये सर्वाधिक ३४ टक्क्यांनी पेरा वाढला. येथे हरभरा क्षेत्र ८ लाख हेक्टरवरून ११ लाख हेक्टरवर पोहोचले. मध्य प्रदेशात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली. मध्य प्रदेशातही पेरणी काहीशी वाढली. मात्र राजस्थान आणि कर्नाटकात यंदा हरभरा लागवड माघारली. राजस्थानमध्ये २० लाख हेक्टर आणि कर्नाटकात ११ लाख हेक्टरवर पीक आहे.

राज्यनिहाय हरभरा लागवड (लाख हेक्टरमध्ये)

State Chana Planting
State Chana PlantingAgrowon

देशातील हरभरा उत्पादन (Gram production in the country)
गेल्या काही वर्षांचा ट्रेण्ड पाहता भारतात हरभरा उत्पादन (India Gram Production) वाढतच गेल्याचे दिसते. देशात २०१६-१७ मध्ये हरभरा उत्पादन जवळपास ९४ लाख टन होते. तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये हरभरा उत्पादनाने ११३.८ लाख टनांचा टप्पा गाठला. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी उत्पादन पुन्हा घटले. मात्र त्यानंतर उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०२०-२१ मध्ये उत्पादनाने ११९ लाख टनांचा टप्पा गाठला होता. हे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन होते. तर यंदा विक्रमी १३१ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता सरकारने आपल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात व्यक्त केली आहे. असे झाल्यास हा उत्पादनाचा नवा विक्रम ठरेल. मात्र सरकारने सुधारित अंदाज जाहीर केल्यानंतर वाढती उष्णता, पाऊस आणि गारपीट तसेच प्रतिकूल हवामान यामुळे हरभरा पिकाला (Gram Crop) मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादन यापेक्षा कमीच राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

देशातील हरभरा उत्पादन

Chana Production
Chana ProductionAgrowon
Chana Grantee Rupees
Chana Grantee Rupees Agrowon

उत्पादन घटण्याचा अंदाज (Production decline forecast)
देशातील लागवड विचारात घेता सरकारने यंदा १३१ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी ११५ लाख टन उत्पादन होते. मात्र जाणकार आणि उद्योगाला सरकारचा हा अंदाज मान्य नाही. जाणकारांच्या मते यंदा ८५ ते ९० लाख टनांपर्यंत हरभरा उत्पादन (Gram Production) होईल. प्रतिकूल हवामान आणि पाऊस याचा उत्पादनावर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले. थोडक्यात, उद्योग आणि सरकार यांच्या अंदाजात मोठा फरक आहे. तसेही लागवड वाढली असली तरी उत्पादकता कमी राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. प्रक्रिया उद्योग, व्यापारी आणि निर्यातदारही सरकारच्या अंदाजाशी सहमत नाहीत. बाजारातील या घटकांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले असले तरी कुणाचाही अंदाज सरकारच्या अंदाजाच्या जवळपासही नाही. महाराष्ट्र, (Maharashtra) मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक या महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांत उत्पादकता कमी आल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे यंदाही उत्पादन कमीच राहील, असे ढोबळमानाने म्हणता येईल.

नाफेडच्या खरेदीने बाजाराला आधार (Market support with NAFED's purchase)
नाफेडने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात हरभाऱ्याचे वितरण केले. त्यानंतर खुल्या बाजारात पुरवठा वाढावा म्हणून वेळोवेळी टेंडर काढून हरभरा विकला. त्यामुळे सध्या नाफेडकडे साठा खूपच कमी आहे. त्यामुळे नाफेड यंदा हरभऱ्याची १५ लाख टन खरेदी करेल, असे जाणकारांनी सांगितले. यापैकी महाराष्ट्रात ६ लाख ८० हजार टनांची खरेदी होणार आहे. सध्या नाफेडकडे सर्व कडधान्यांचा मिळून केवळ १७ लाख टनांचा साठा आहे. नाफेडकडे २१ लाख टन साठा असणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बीत (Rabi) नाफेडकडून खरेदी वाढण्याची शक्यता आहे. सध्या नाफेड हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. आतापर्यंत नाफेडने देशभरात ६ लाख ६१ हजार टन हरभरा खरेदी केला. त्यात सर्वाधिक खरेदी गुजरातमधून केली. तेथे शेतकऱ्यांनी २ लाख ८२ हजार टन हरभरा नाफेडला विकला. तर महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार टन हरभरा नाफेडकडे (Cआला. कर्नाटकात ५५ हजार टन, तर आंध्र प्रदेशात ४४ हजार टन हरभऱ्याची नाफेडने खरेदी केली.

हरभरा दरात वाढीची शक्यता (Possibility of increase in gram rate)
देशात यंदा ८५ ते ९० लाख टन हरभरा उत्पादन (Gram Production) होईल. तर नाफेड आणि व्यापारी, उद्योग यांच्याकडे मिळून २० लाख टनांच्या दरम्यान शिल्लक साठा असू शकतो, असे जाणकारांनी सांगितले. म्हणजेच यंदा १०५ ते ११० लाख टन हरभऱ्याचा पुरवठा होईल. तर देशात हरभरा (Gram Country) वापर ९६ ते १०२ लाख टनांच्या दरम्यान आहे. कारण कोरोनानंतर हरभऱ्याला मागणी वाढली. परिणामी, वापर वाढला. एरवी देशाची मागणी वार्षिक ९६ लाख टनांच्या दरम्यान गृहीत धरली जाते. परंतु यंदा वापर वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. तसेच आतापर्यंत दीड लाख टनांच्या दरम्यान हरभरा आयात (Gram Import) झाल्याचा अंदाजही जाणकार व्यक्त करतात. यंदा हरभरा आयात कमी झाली. त्यामुळे पुरवठा मागणीच्या तुलनेत जास्त नाही. म्हणजेच यंदा अतिरिक्त पुरवठ्याचा प्रश्‍न नाही. त्यामुळे हरभरा आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजारात (Market) दर सुधारू शकतात. जाणकारांच्या मते जून महिन्यात हरभरा दर ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांचा टप्पा गाठतील. कारण आयातशुल्क अधिक असल्याने आयात होणार नाही. देशातील मालावरच गरज भागवावी लागेल. याचा आधार हरभरा दराला मिळेल आणि दर वाढतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

देशात यंदा ८५ लाख टनांच्या दरम्यान हरभरा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पाऊस आणि उष्णतेचा पिकाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे पीक कमीच राहिल. आता लग्न-समारंभ सरू झाले. त्यातच हाॅटेल्स, रेस्टाॅरंट्सही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या क्षेत्रातून हरभऱ्याला मागणी राहील. त्यामुळे जून महिन्याच्या शेवटी हरभरा दर ६ हजार रुपयांचा टप्पा गाठू शकतात.

- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार अभ्यासक

देशात यंदा हरभरा उत्पादकता घटली. आयातशुल्क अधिक असल्याने ऑस्ट्रेलियातून आयात नगण्य आहे. सध्या दर हमीभावापेक्षा कमी आहेत. मात्र नाफेडचा बफर स्टाॅक कमी आहे. नाफेड स्टाॅक वाढविण्यासाठी खरेदी वाढवत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात दरात सुधारणा होऊ शकते.

- राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्‍लेषक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com