Silk Farming : शेतकरी नियोजन ः रेशीमशेती

रेशीम उद्योगात मिळालेल्या सातत्यपूर्ण यशामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील केकत जळगाव (ता.पैठण) येथील उद्धव कारभारी बढे हे रेशीम उत्पादकांमध्ये सर्वांच्या परिचयाचे झालेले नाव. रेशीम उद्योगाकडे वळण्यापूर्वी ते पारंपारिक पद्धतीने कपाशी, कांदा, भाजीपाला, बाजरी या पिकांची लागवड करायचे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon

शेतकरी ः उद्धव कारभारी बढे

गाव ः केकत जळगाव ता. पैठण. जि. औरंगाबाद

एकूण शेती: ११ एकर

तुती क्षेत्र ः ४ एकर

रेशीम उद्योगात (Silk Industry) मिळालेल्या सातत्यपूर्ण यशामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील केकत जळगाव (ता.पैठण) येथील उद्धव कारभारी बढे हे रेशीम उत्पादकांमध्ये सर्वांच्या परिचयाचे झालेले नाव. रेशीम उद्योगाकडे (Silk Farming) वळण्यापूर्वी ते पारंपारिक पद्धतीने कपाशी (Cotton), कांदा (Onion), भाजीपाला, बाजरी या पिकांची लागवड करायचे.

Silk Farming
Silk Farming : रेशीम शेतीतून मिळाला ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

गावातील काही शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळले. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. आपणही रेशीम शेती करून पाहू या विचाराने त्यांनी रेशीम उद्योगास २०१६ मध्ये सुरुवात केली. सुरुवातीला १ एकरावर केलेली तुती लागवड आज ४ एकरांपर्यंत पोचली आहे. यासह त्यांच्याकडे एक एकर मोसंबी, एक एकर तुळस, ४ एकर कपाशी व एक एकर क्षेत्रावर बाजरी लागवड आहे. सातत्याने शाश्वत उत्पन्नामुळे आता रेशीम उद्योग त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे.

तुती क्षेत्र विस्तार ः

उद्धव बढे यांना २०१६ मध्ये एक एकर तुती लागवडीतून वर्षी तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. पहिल्याच वर्षी मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे आत्मविश्वास वाढला. त्यातूनच २०१७-१८ मध्ये नव्याने दोन एकर तुती लागवड केली. तुती लागवड वाढविल्यामुळे उत्पन्नात भर पडली. ही संपूर्ण लागवड ४ बाय २ व साडेतीन बाय २ फूट अंतरावर होती. सुधारित पद्धतीने लागवड करण्याच्या अनुषंगाने त्यांनी मागील वर्षी एक एकर क्षेत्रावर ६ बाय ४ फूट अंतरावर तुती लागवड केली आहे. सध्या त्यांच्याकडे सुमारे ४ एकर तुती लागवड आहे.

Silk Farming
Silk Production: रेशीम शेतीतून ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान

तुती बागेचे व्यवस्थापन ः

तुती बाग व्यवस्थापनात तुतीची व्यवस्थित छाटणी केली जाते. प्रत्येक तुती क्षेत्रामध्ये खत, सिंचन, मशागत, फवारणी, तण नियंत्रण, छाटणी आधी कामांचे योग्य व्यवस्थापन केले जाते. तण नियंत्रणासाठी खुरपणी व बैल पाळीवर भर दिला जातो. चॉकी शेडवर आल्यानंतर पहिला मोल्ट होईपर्यंत कोवळा पाला बाल्य कीटकांना दिला जातो.

बॅच नियोजन ः

- बाल्य कीटक शेडमध्ये आणल्यानंतर सुरुवातीला त्यांना कोवळा पाला दिला जातो. मोल्ट व्यवस्थित पास होण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मोल्ट पूर्ण पास होईपर्यंत पाला टाकला जात नाहीत. आवश्‍यकतेनुसार शिफारशीप्रमाणे पावडर मारली जाते.

- दरवर्षी किमान ८ बॅच घेतात. प्रत्येक बॅच ३५० अंडीपुंजाची असते. एका बॅचपासून सुमारे ३०० ते ३५० किलो रेशीम कोषाचे उत्पादन मिळते. काही वेळा ४०० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन त्यांना मिळाले आहे. आजपर्यंत किमान २२५ ते जास्तीत जास्त ८०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला आहे.

संगोपनगृहाचे व्यवस्थापन ः

- शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी योग्य खबरदारी घेतली जाते. पावसाळ्यात शेडमध्ये दमट वातावरण तयार होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते.

- उन्हाळ्यात संगोपनगृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी शेडवर उसाचे पाचट, कडबा किंवा इतर काडी कचरा पसरला जातो. शेडच्या बाजूने पोती लावून त्यावर ठिबकच्या नळ्यांद्वारे पाणी सोडले जाते. काही वेळा शेडच्या पत्र्यावर स्प्रिंकलर पाणी सोडले जाते.

सिंचन आणि खत व्यवस्थापन ः

- पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी तुती लागवडीत ठिबकची व्यवस्था केली आहे. साधारण ८ दिवसांच्या अंतराने २ वेळा तुती लागवडीस सिंचन केले जाते. आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोन वेळा मोकळे पाणी दिले जाते. उन्हाळ्यात ४ दिवसांनी सिंचन केले जाते.

- दरवर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला शेणखत दिले जाते. प्रत्येक बॅच घेण्यापूर्वी छाटणीनंतर १५ दिवसांनी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात.

उत्पादन ः

मागील वर्षी तीन एकर तुती लागवडीतून मिळालेल्या पाल्याच्या आधारे रेशीम कीटकांच्या सात बॅच घेण्यात आल्या. त्यातून सुमारे २५०० ते २७०० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळाले.

- उद्धव बढे, ९९२१२१९४१०

(शब्दांकन ः संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com