Aquarium Business: तंत्र शोभिवंत मत्स्यालय निर्मितीचे

शोभिवंत मत्स्यालय ठेवल्याने घराच्या सौंदर्यात अधिक भर पडते. त्यासाठी खोलीमध्ये योग्य ठिकाणी मत्स्यालय ठेवावे. खोलीच्या आकारानुसार मत्स्यपेटीची निवड करावी.
Ornamental Aquarium Business idea
Ornamental Aquarium Business ideaAgrowon

जयंता टिपले, वैष्णवी सोनवळे, हिरा पाटील

घरामध्ये सुशोभीकरणासाठी शोभिवंत मत्स्यालय (Fish Tank) उभी केली जातात. त्यामुळे दिवसेंदिवस शोभिवंत मत्स्यालयाची लोकप्रिय वाढती आहे.

त्यामुळे शोभिवंत मत्स्यालय बनविण्याच्या व्यवसायात चांगल्या संधी आहेत. मत्स्यालय बनवण्याची प्रक्रिया ही अत्यंत साधी आणि सोपी आहे. साधारणपणे चौकोनी, वर्तुळाकार, आयताकार आकाराची मत्स्यालय तयार केली जातात.

शोभिवंत मत्स्यालय ठेवल्याने घराच्या सौंदर्यात अधिक भर पडते. त्यासाठी खोलीमध्ये योग्य ठिकाणी मत्स्यालय ठेवावे. खोलीच्या आकारानुसार मत्स्यपेटीची निवड करावी.

जेणेकरून मत्स्यालय जास्तच छोटे किंवा जास्त मोठे वाटणार नाही. योग्य आकाराचे मत्स्यालय घराचे सौदर्य वाढवून लोकांना अधिक आकर्षित करते.

आवश्यक साहित्य ः

१) योग्य जाडीचे काचेचे तुकडे ः

मत्स्यपेटी बनवण्यासाठी योग्य आकाराचे पाच काचेचे तुकडे घ्यावेत. एक पृष्ठभागासाठी आणि उरलेले चार बाजूने उभे करण्यासाठी.

२) सिलिकॉन गन ः

काच एकमेकांना घट्ट जोडण्यासाठी किंवा चिकटवण्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो.

३) सिलिकॉन ट्यूब ः

काचेचे तुकडे एकमेकांना जोडण्यासाठी सिलिकॉन ट्यूब वापरली जाते.

४) हिरकणी ः

योग्य आकारात काच कापण्यासाठी वापर करतात. बऱ्याच वेळा काच कापताना तिला तडे जाण्याची शक्यता असते. हिरकणीद्वारे काच एकसारखी कापली जाते. तसेच काचेला तडा जाण्याची शक्यता कमी होते.

५) मोजपट्टी ः

काच कापताना अपेक्षित आकारानुसार तिची लांबी आणि उंची मोजण्यासाठी मोजपट्टीचा उपयोग होतो.

६) धारदार चाकू ः

काच जोडल्यानंतर बाहेर आलेले किंवा जास्त झालेले सिलिकॉन खरडून काढण्यासाठी उपयोग होतो.

Ornamental Aquarium Business idea
Fish Farming : धानशेतीला मत्स्यपालनाचा मोठा आधार

७) पॉलिथिन पेपर ः

मत्स्यपेटीच्या खाली अंथरण्यासाठी पॉलिथिन पेपर वापरला जातो. आणि त्यावर मत्स्यपेटी ठेवली जाते.

८) चिकटपट्टी ः

जोडलेल्या काचांना आधार देण्यासाठी चिकटपट्टी वापरली जाते.

मत्स्यालय बांधणी ः

१) मत्स्यपेटी बनवण्यासाठी अपेक्षित आणि योग्य आकाराचे काचेचे ५ तुकडे घ्यावेत. एक काचेचा तुकडा पृष्ठभागासाठी आणि उरलेले चार बाजूने उभे करण्यासाठी याप्रमाणे काचेचे तुकडे असावेत.

२) प्रथम सपाट पृष्ठभागावर पॉलिथिन पेपर अंथरूण घ्यावा. त्यावर मत्स्यालयाच्या तळासाठी निवडलेली काच ठेवावी.

३) त्यानंतर काचेच्या कडेने सिलिकॉनचा पातळ थर द्यावा. सिलिकॉन थरावर उर्वरित काचेचे तुकडे हळुवारपणे कडेने उभे करावेत. उभ्या केलेल्या काचेच्या कडांना पुन्हा सिलिकॉन लावून ते एकमेकांना जोडून घ्यावेत.

४) त्यानंतर सुरुवातीला पाठीमागील बाजूची काच व नंतर समोरील काच असे एकेक करून लावावी.

५) मत्स्यालयाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपऱ्यांना चिकटपट्टी लावावी. त्यामुळे सिलिकॉन ओला असताना, काचांना आधार मिळतो.

६) सर्व जोडांना लावलेले सिलिकॉन एकसारखे होण्यासाठी हळुवारपणे बोटाने दाबावे.

७) सिलिकॉन सुकण्यासाठी तयार झालेले मत्स्यालय एक दिवस व्यवस्थित ठेवून द्यावे. सिलिकॉन सुकल्यानंतर काचेवरील जास्त झालेले सिलिकॉन चाकूने खरडून काढावे.

८) त्यानंतर मत्स्य पेटीत पाणी टाकून ती गळत नसल्याची खात्री करावी.

Ornamental Aquarium Business idea
ताजे मासे कसे ओळखावेत ?

९) मत्स्यपेटी ठेवण्यासाठी लाकडाचा किंवा स्टीलच्या टेबलाचा आधार घ्यावा. निवडलेले टेबल हे मत्स्यपेटी, त्यातील पाणी आणि शोभेचे साहित्य इत्यादींचे ओझे पेलण्याइतका भक्कम असावा.

जयंता टिपले, ८७९३४७२९९४, (मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com