Soybean : शेतकरी पीक नियोजन - सोयाबीन

माझी लोहा तालुक्यातील वाका शिवारात २० एकर शेती आहे. यापैकी ६ एकरावर यंदा सोयाबीन पिकाचे नियोजन केले आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये ऊस, कापूस, हळद आणि उडीद लागवड आहे. (Soybean Crop Management)
Soybean
SoybeanAgrowon

माझी लोहा तालुक्यातील वाका शिवारात २० एकर शेती आहे. यापैकी ६ एकरावर यंदा सोयाबीन पिकाचे नियोजन केले आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये ऊस (Sugarcane), कापूस (Cotton), हळद (Turmeric) आणि उडीद (Black Gram) लागवड आहे.

माझे दरवर्षी खरीप हंगामात साधारण ४ ते ५ एकरांवर सोयाबीन लागवडीचे नियोजन (Planning Of Soybean Cultivation) असते. मागील १० वर्षांपासून सोयाबीन लागवड करत आहे. आमच्या भागामध्ये सोयाबीन पीक (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मी सोयाबीन लागवडीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी विविध कृषी मेळावे, परिसंवाद, कृषी प्रदर्शन आदी कार्यक्रमांना भेटी दिल्या आहेत. बैलजोडीच्या मदतीने पेरणी करण्यावर माझा विशेष भर असतो. मात्र, यावर्षी पेरणी काळात बैल आजारी पडल्याने नाइलाजास्तव पेरणीसाठी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. पेरणी साधारण १५ जूनला सुरु करून १७ जूनला संपवली. योग्यवेळी पेरणी केल्यामुळे सध्या पिकाची वाढ समाधानकारक झाली आहे.

Soybean
सोयाबीन, तूर पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती काय आहे?

मागील महिनाभरातील कामकाज ः

- मागील हंगामात रब्बीमध्ये हळद आणि हरभरा पीक घेतलेल्या क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचे नियोजन केले आहे.

- रब्बीतील पीक निघाल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची वखरणी करून घेतली.

- मजुरांच्या मदतीने शेतातील काडीकचरा गोळा करून शेत स्वच्छ केले.

- पेरणीसाठी जमीन तयार झाल्यानंतर मे महिन्यात एकरी दोन ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून घेतले.

- साधारण ५ एकरावरील पेरणी ट्रॅक्टरद्वारे तर १ एकरावर बैलजोडीच्या मदतीने केली.

- पेरणीसोबतच रासायनिक खतांच्या मात्रा एकरी ५० किलो मात्रा दिली.

- पेरणीसाठी जेएस-३३५ या वाणाची निवड केली. सहा एकरातील पेरणीसाठी साधारण एकरी ३० किलो बियाणे लागले.

आगामी नियोजन ः

- सध्या पेरणी होऊन १२ ते १३ दिवसांची कालावधी पूर्ण झाला आहे.

- पीक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर तण नियंत्रणासाठी तणनाशकांची फवारणी घेतली जाईल.

- त्यापुढील दहा दिवसांनी कोळपणी करून पीक तणविरहित केले जाईल.

- एकरी झाडांची संख्या योग्य राहण्यासाठी विरळणी केली जाईल.

- वाढीच्या अवस्थेत पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करून आवश्यकतेनुसार फवारणी केली जाईल.

-----

- चक्रधर हंबर्डे, ९८८१७३७३७१

(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com