भरतीः आशिष शिंदे यांची कथा

कोल्हापूरात सायबर चौकातून वर विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यावर अनिलला नेहमी दीदीची आठवण येते. पण क्षणभरच. तिथे तेवढ्या सकाळीसुद्धा सायकलवरून क्लासला जाणाऱ्या मुली दिसतात.
Bharti By Ashish Shinde
Bharti By Ashish ShindeAgrowon

लेखक - आशिष शिंदे

कोल्हापूरात सायबर चौकातून वर विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यावर अनिलला नेहमी दीदीची आठवण येते. पण क्षणभरच. तिथे तेवढ्या सकाळीसुद्धा सायकलवरून क्लासला जाणाऱ्या मुली दिसतात. अनिल रोज सकाळी ग्राउंडच्या तयारीसाठी उठतो. लगेच वर्दीची अनिलला आठवण होते. त्याला माहित्ये भरती हाच एकमेव मार्ग आहे या सगळ्यांतून सुटायचा.

उन्हाळ्यातला दिवस. सात वाजता ऊन पडायला सुरू होतं. कितीही स्टॅमिना असला तरी उन्हात नेहमीचा राउंड पूर्ण होत नाही. लाल पट्ट्या असलेली मांडीपर्यंतची छोटी चड्डी. वर लाल-निळा बनेन. खाली काळ्या सॉक्समधून बाहेर येतात वाटणारे ग्रे कलरचे ॲक्शनचे शूज. काही गोष्टींसाठी कुणी ठरवलेला नसताना युनिफॉर्म ठरला जातो.

आपोआप. जसं भाजीवाला असला तर वर जाड लाइन्स असलेला डार्क हिरवा-निळा शर्ट आणि खाली एकदम डार्क ब्राउन/ग्रीन/ब्ल्यू फॉर्मल पॅन्ट, अगदी शाळामास्तरची असते तशी. किंवा शाळामास्तर वर फिक्कट चौकडा, लाइन्सचेचं शर्ट घालावेत असं कुणी ठरवलं असेल? किंवा शाळांमधला ऑफिसमध्ये काम करणारे तरुण अकाउंटंट अतिशय बारीक शरीरयष्टी घेऊन बेंबीच्या वर येणाऱ्या गडद रंगाच्या पॅन्ट आणि फिकट गुलाबी, निळे शर्ट का घालत असतील? रस्त्याचं काम करणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला असणारा साइट मॅनेजर नेहमी शर्टच्या आत काळ्या किंवा लाल रंगाचे टी-शर्ट किंवा गोल गळ्याचा फुल बनियन का घालत असेल? किंवा असं काहीतरी. पण अनिलला आता असे प्रश्‍न पडत नाहीत.

Bharti By Ashish Shinde
Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

अनिलला प्रश्‍नच पडत नाहीत. सकाळी उठून रनिंग आणि व्यायाम करायचा, खाऊन कॉलेजला जायचं, घरी आलं की भरतीचा अभ्यास करायचा एवढचं त्याला कळतं. अनिलच्या आयुष्यात भरतीला उभारलेलेच मित्र आहेत.

दोन-तीन गावाकडचे. अनिल कसा दिसतो हे पण मी नेमकं सांगू शकणार नाही. चार-चौघे दिसतात तसाच अनिल दिसतो. फारतर थोडा सावळा पडला असेल सकाळच्या उन्हानं. बारीक पण घडलेली अंगकाठी. शरीरात उत्साह आणि डोळ्यांमध्ये बघितलं तर दिसणारा रिकामेपणा. उन्हाळा असल्याने सकाळी जॉगिंग, वॉकला येणारे अनेक लोक असतात. अनिल त्या लोकांना बघत, कधी दुर्लक्ष करत रनिंग करत असतो.

Bharti By Ashish Shinde
Banana Crop Management : शेतकरी नियोजन पीक : केळी

अनिल चंदगडजवळच्या एका छोट्या गावाचा. गावाचं नाव काहीही असू शकतो. चारचौघा लोकांचं थोडं मागास खेडं असतं तसं त्याचं गाव. गावाच्या कोपऱ्याला मागच्या दोन वर्षांपूर्वी जियोची इंटरनेट रेंज येऊ लागली. रेंज येऊ लागली तशी गावात उलथापालथ होऊ लागली. तरणी पोरं उसाचं बिल आलं की स्मार्ट फोन मागू लागली.

लॉकडाउन लागलं आणि स्मार्ट फोन महत्त्वाचाच आहे असं सगळ्यांना वाटू लागलं. पोरांच्या ऑनलाइन शाळांसाठी सगळ्या घरात स्मार्टफोन आले. म्हाताऱ्यांना फोन वापरायची अक्कल नसल्याने, तरण्या, बारक्या पोरांच्याच हातात फोन विसावले. एक दिवस गावात भयंकर वादळ उठलं. पोरांच्या व्हॉट्सअॅपवर एक एमएमएस पसरू लागला.

तसं पोरं अशा क्लिप खूप सहजपणे बघायचे. पण ही क्लिप पसरताना त्याच्याबरोबर एक आसुरी कुजबुज पण पसरू लागली. क्लिपमधली मुलगी गावातलीच होती. अनिलच्या बहिणीचा चेहरा त्यात अस्पष्ट, पण ओळखू येण्याइतपत दिसत होता.

अनिलच्या बहिणीबद्दल काय सांगावं? तिचं नावही इतकं भारी, वेगळं न्हवतं की लक्षात राहावं. ना तिचा चेहरा इतका सुंदर. ना त्या क्लिपमध्ये जगावेगळं काही दिसत होतं. पण ती क्लिप आंबट चवीने बघून जवळच्या गावातल्या एकानं इथल्या एका मुलाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवली आणि एकदम एक गडदपणा पसरला. वेळ लागला पण ही कुजबुज गावात मोठ्या लोकांच्यात पोहोचलीच.

दिनू सोनाराच्या बायकोला दिनू सोनाराने धीर करून त्या क्लिपबद्दल सांगितलं आणि तिनं कसनुस करून हवालदारांच्या बायकोला. हवालदारची बायको म्हणजे खटपटी बाई. गावात भिशी सुरू करण्यापासून, लोकांच्या लेकींच्या लग्नात देवघेव ठरवण्यापर्यंत हवालदार बाई सगळ्यात पुढे होती. अनिलची म्हणूनच दिनू सोनाराच्या बायकोने तिच्या कानावर ही गोष्ट घातली. अनिलची आई हवालदारांकडे घरकामाला होती.

हवालदार बाईने अनिलच्या आईला निरोप पाठवला, बोलवून घेतलं, चहा पाजला, कळलेली गोष्ट सांगितली. अनिलच्या आईला धक्का लागला. ती भिंतीला टेकून बसली, तोंडाला पदर लावला, तिचे हुंदके ऐकून हवालदार बाईचे घर पण हादरून गेले. अनिलचे वडील डेयरीत कलेक्शनला, सगळ्या गावाशी ओळख, ये- जा. अनिलच्या वडिलांना निरोप गेला. अनिलचे वडील कामावरून थेट हवालदार बाईच्या घरावर पोहोचले. रडतेली बायको बघून अनिलच्या बापाच्या काळजात खड्डा पडला.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com