किस्से आळेफाट्याचे : गहाणखत

आजारी माणूस अंगावर दुखणं वागवित दिवसेंदिवस पारुसं रहावं, तशी अवस्था. व्याजाची चिपडं आली पण कर्ज काय साफ होईना. बरं... बडबडी तोंड जास्त. राबनारं हात थोटकं.
गहाणखत
गहाणखतAgrowon

संतोष डुकरे

पार्टी तशी दमदार. नामांकीत. रंगित आणि संगित. खटलं होतं तोवर ठिक होतं. खटलं मोडलं आणि मग वर खाली सुरु झालं. मनगटात दम तो जोमदार झाला. अन् फक्त तोंडात दम असलेला न्यानबा कर्जदार...

आजारी माणूस अंगावर दुखणं वागवित दिवसेंदिवस पारुसं रहावं, तशी अवस्था. व्याजाची चिपडं आली पण कर्ज काय साफ होईना. बरं... बडबडी तोंड जास्त. राबनारं हात थोटकं.

गहाणखत
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

अडी नडीला बहिणी हात ढिला सोडायच्या. नाही असं नाही. पण किती दिवस. फुगवटा वाढतोयच. करायचं काय. शेतमाल तर इकंना... मग वावार ?

कर्जापायी शेती विकायची वेळ येणं, शेतकऱ्यासाठी जिवघेणं असतं. पण तगादेदार दारातून गटेना म्हटल्यावर करायचं काय. बहिणीला भेटला. ढसढसा रडला.

शेवटी तिनंच तोडगा काढला. एकराचे 10 लाख. 10 वर्षे ताबा, मालकी, मिळकत तिची. पिकाचं नियोजन बियोजन सगळं तिचं, कसायची त्यानं. त्याचा त्याला वाटा तिचा तिला. 10 वर्षात 10 लाख परत केल्यास जमिन पुन्हा त्याची त्याला परत, नाय तं कायमची बहिणीला.

लोक काय म्हणतील या भितीपोटी तोंडाचं कानाला कळू न देता व्यवहार झाला. कागद फिरला. पण काही झालंच नाही या थाटात न्यानबा वावरतो. त्या वावरातला आपला ऊस कसा चांगला याच्या चारचौघात मुद्दाम गप्पाही मारतो.

वस्तीत सगळ्यांना सर्व माहित आहे. पण तरीही त्याला वाईट वाटेल म्हणून कोणीच काही माहिती नाही, असे दाखवतात. उसाची अधेमध्ये आवर्जून आपुरलकीनं विचारपुस करतात. आता माणसं कामाला आणि शेती सुदराया लागल्याचं कौतुकही करतात.

वेदनेचा लाव्हा उरात उकळ्या घेतोय. तरी चेहऱ्याच्या रेषारेषांवर निखळ हास्य फुलतंय. जगण्याच्या झाडाला कष्टाचं पाणी आणि नात्यागोत्याच्या मदतीने आनंदाची फुलं फुलताहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com