जैवविविधतेमधील ‘स्टार्ट अप' संधी

राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान (NSDC), राष्ट्रीय अपारंपरिक पारंपरिक ऊर्जा स्रोत, आयुष मंत्रालय आणि इतर अनेक विभागांमार्फत हरित व्यवसाय किंवा उद्योगांचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासाठी नियोजन करण्यात येते.
Biodiversity Startup
Biodiversity StartupAgrowon

डॉ. सुमंत पांडे

ज्या नोकरी किंवा व्यवसायामुळे या सृष्टीवर सकारात्मक परिणाम होईल आणि जैवविविधता अबाधित आणि वृद्धिंगत होईल, त्या सोबतच आपल्या गरजादेखील भागतील अशी नोकरी किंवा व्यवसायांना हरित नोकरी किंवा हरित उद्योग असे म्हणतात. यामध्ये पारंपरिक ऊर्जेचे स्रोत, कृषी, पशुसंवर्धन, वनोपज, सागरीसंपत्ती, जलसंपदा, वनौषधी, मृदा संवर्धन, इत्यादी अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. अशा संधी भारताशिवाय इतर देशात नाहीत. म्हणून आपण योग्य नोंदी आणि सर्वेक्षण केल्यास त्याचा राष्ट्रीय संपदा म्हणून वापर होऊ शकेल, त्याच्या वापराचे ज्ञानही समाजाकडे आहे.

एका पशुतज्ज्ञाने सांगितलेली ही सत्यघटना अशी, की गाई आणि म्हशींमध्ये त्यांच्या प्रजनन काळात गर्भाशय बाहेर येण्याचे प्रमाण असते. काही गायी आणि म्हशींमध्ये व्याल्यानंतर संपूर्ण गर्भाशय कधी कधी बाहेर येते. त्यावर उपचार म्हणजे पशुवैद्यकांना आव्हान असते. तथापि, अशीच एका म्हशीची केस हाताळताना, एका स्थानिक वैदूने कांद्यासारखी असणारी वनस्पती आणली. तिचा रस काढून तो बाहेर आलेल्या गर्भाशायावर लावला.

त्यानंतर काही वेळात बाहेर आलेल्या गर्भाशयाचा आकार हळूहळू कमी झाला, त्यानंतर मग पशुवैद्याचे काम सोपे झाले आणि त्या म्हशीचे प्राण वाचले आणि त्या गरीब शेतकऱ्याचे होणारे नुकसान वाचले. हे पारंपरिक ज्ञान आणि त्या वनस्पतीची उपलब्धता स्थानिक स्तरावरच आहे. त्यांचे संकलन करण्यासाठी विश्‍वासू आणि समर्पित लोकांची टीमच लागते. तथापि, त्या वनस्पतीचे नाव आणि त्याच्या उपलब्धतेचे ठिकाण सांगण्याचे त्या वैदूने टाळले.

कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासाठी नियोजन ः
राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान (NSDC), राष्ट्रीय अपारंपरिक पारंपरिक ऊर्जा स्रोत, आयुष मंत्रालय आणि इतर अनेक विभागांमार्फत हरित व्यवसाय किंवा उद्योगांचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासाठी नियोजन करण्यात येते. किंबहुना, त्याही पुढे जाऊन काही नवीन उद्योग किंवा संकल्पनांची यात सांगड घातल्यास काही ‘स्टार्ट अप’सारख्या संकल्पना पुढे आल्यास त्याचाही निश्‍चित उपयोग होऊ शकतो. या क्षेत्रात सर्जनशीलतेला भरपूर प्रमाणामध्ये वाव आहे.

१) माहिती संकलन झाल्यानंतर तिचे विश्‍लेषण करत असताना या क्षेत्रातील जाणकार अथवा रुची घेणारे आहेत त्यांना निश्‍चित यातल्या संधी दिसतील. म्हणजेच जैवविविधतेचे संवर्धन, रक्षण आणि त्यातून आवश्यक तेवढे समाजाच्या उपयोगासाठी घेणे या गोष्टींचे संतुलन साधता येणे सहज शक्य आहे. मागील लेखांमध्ये आपण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे उदाहरण बघितले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालावधीमध्ये दुष्काळात मात करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे ज्वारीचे बियाणे (Seeds) तत्कालीन व्यवस्थेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दुष्काळात आणि कमी पावसात येणारी ज्वारीची जात होती.

२) अशा अनेक गोष्टी आजही निसर्गात (Nature)अस्तित्वात आहेत, ज्याचे ज्ञान आणि उपयोगाच्या विधीची माहिती असणाऱ्या व्यक्तीदेखील समाजात आहेत. ही सर्व माहिती संकलित होणे गरजेचे आहे. म्हणूनच लोकांचे जैवविविधता नोंद पत्रक तयार करणे हा केवळ सोपस्कार न ठेवता ती समाजाची, आणि सृष्टीची गरज आहे याचे भान ठेवून केल्यास योग्य तो विकासही साधेल आणि सृष्टीचे संरक्षणही होईल.

३) लोक जैवविविधता लोकांचे जैवविविधता (Biodiversity) नोंदणी पत्रकामधून आपल्याला विविध क्षेत्रांतील गाव स्तरावरील माहितीचे संकलन एकत्र करणे गरजेचे आहे. याचा उद्देश म्हणजे जैवविविधता आणि जैविक संसाधनाबद्दल व्यवस्थित माहिती संग्रहित करणे होय. तथापि, जीवसृष्टीचे वैविध्य अफाट आहे.

असे म्हटले जाते, की विज्ञानाच्या अंदाजाप्रमाणे एकूण विविध जीव, जातींची संख्या ८० लक्ष ते एक कोटी १० लक्षांच्या आसपास आहे. याचे आधुनिक विभाजन भिन्न आहे, केवळ नऊ हजार पक्षी आणि ६० ते ७० लाख कीटक आहेत. तथापि, ही संख्या आणि आपल्या परंपरेतील संख्या यांच्यात साम्य लक्षणीय आहे, (संदर्भ ः डॉ. माधव गाडगीळ यांच्या ‘निसर्ग नियोजन लोकसहभागाने’ या साहित्यातून)

४) लोक हे परिसराचा अतूट भाग आहेत. म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या घटकाचा नैसर्गिक संसाधानांशी काय संबंध आहे याची नोंदणी हा पीबीआरचा महत्त्वाचा भाग आहे. याचा संदर्भ नेमका स्पष्ट व्हावा म्हणून जी माहिती संग्रहित आणि संकलित करण्यासाठी चौकट आखली आहे.त्या चौकटीत माहिती संग्रहित करणे गरजेचे आहे.

(लेखक यशदा येथील जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com