जुते दो पैसे दो !

ठीवत नसतंय कुणी कुणाला. इचीमाय येऊ द्या राग कुणाला यायचाय ते पण ष्टैल म्हणून नाही मराठवाड्याच्या लग्नात हे अंतिम सत्यय. अरे, उघडा डोळे बघा बाहीर... कशी कशी मज्जा येतीय मुंबई, पुन्याच्या लग्नायनं.
Story By Prasad Kumthekar
Story By Prasad Kumthekar Agrowon

प्रसाद कुमठेकर

वरातीत आठ धा झुलत्या नागिनी सांडनं लवंडनं कॉमनय बे आपल्याकडं. काय तो ड्यान्स काय ते पडनं ..उगच नावं ठीवत नसतंय कुणी कुणाला. इचीमाय येऊ द्या राग कुणाला यायचाय ते पण ष्टैल म्हणून नाही मराठवाड्याच्या लग्नात हे अंतिम सत्यय. अरे, उघडा डोळे बघा बाहीर... कशी कशी मज्जा येतीय मुंबई, पुन्याच्या लग्नायनं. तिकडचे लग्न नाही मॅरेज होतात. समधा कुल कुल गोड गोड मामला असतोय. स्टेजवर इस्माईल मारत बसलेल्या दोघांना आपली गाठ स्वर्गात मारल्यासारखंच वाटतंय. करनं तर लय लांब राहिलं साधं बोलनं.. ते तर नीटय का आपल्याकडं... झ्यायच्यायला! आता एकदा तुम्हीच बघा ना भावांनो, ‘जीज्जू’ कसं वाटतंय कानाला? झाल्या गुदगुल्या. आता भावजीऽऽ दाजीऽऽ कसं वाटतंय ऐकायला. आपल्याकडच्या लग्नायनं सगळा ऊत तिसऱ्याचाच. हा पावना अन् तो मूळ पावना. अरे, नवऱ्या नवरीपेक्षा बाकीच्यांचाच जलजलाट जोरात. विनबाईचे पाय धुतले का? मोठे भावजी आले का? धाकटी नणंद नाराजय? त्यांना बोलावलं का? हे का नाही आले? अरे, लगन कुणाचं? लाडं कुणाचे? आऱ्या भो! ...”

प्यार का पंचनामामधल्या कार्तिक आर्यनसारखा मी निस्ता भका भक फ्रष्ट्रेशन ओकण्यावर होतो. ऐकणाऱ्या सगळ्या पोरांच्या तोंडातून धूर निघलालता. प्याशिव स्मोकिंगनं शेवटी मलाच ढास लागली म्हणून थांबलो. पण तोपर्यंत चालेंज मारून आपण आपलं लग्न खासम खासच करणार हे पक्क केलतं. काय मॅरेज एकदाच होणार. त्यातला हॅपीनेस बी एक्याच बारीला येणार. त्यामुळे आपल्याकडल्या नद्या, होळ वाहो न वाहोत लग्नात हॅपीनेस वाह्यला पाहिजे. वराकडचे अन् वधूकडचे वऱ्हाड खाली वर न मोजता एकसाथ मोजले गेले पाहिजेत. लग्नासाठी आलेल्या लोकात फक्त प्रेम अन् प्रेम वाटलं गेलं पाहिजे. मोरल एकच आपलं मॅरेज म्हणजे रियालटीमधला हम आपके है कौनच. नुसता आनंद शेलीब्रेषणचा कंद. मॅरेजची शिडी पाहणाऱ्याला दिसलं पाहिजे मराठवाडा के लोग पुनेमुंबई के बाप होते है.

Story By Prasad Kumthekar
Weed Management : फळ बागायतदारांचे तण व्यवस्थापनातील अनुभव

खरं तर आपण आधी इकडचीच, म्हणजे पुण्यामुंबईचीच करणार होतो पण आपले फादर? ते आमचं ऐकतेत थोडीच. त्यांनी सांगितलं ‘चिमण्या, ये पोरगी बघ अन् हो म्हणून जा.’ तर माझ्या होणाऱ्या ‘हिला’ त्येनीच शोधलेत. तोलामोलाचं खानदानी खानदान हाय म्हनले. पुर्गी बियशी मायक्रो आहे, दिसायला एकच लंबर. बघून आपण खुश, खानदान बघून फादर लकिली माझ्यासाठी फेअर मामला होता. बिना वादाची प्रोशिजर झाली. म्हणजे मी वाद घातला असता तरी पण प्रोशिजर टळली असती असं काही नाही. आपले फादर म्हणजे मोदीपेक्षा खतरनाकयत. डायरेक रात्री आठ वाजता अनौंसमेंट करणार. मग डायरेक एक्जिक्युशन. चर्चेफिर्चेतून निर्णय या गोष्टीवर त्यांचा जल्मल्यापासूनच विश्‍वास नसावा.

तर माझा टिळा झाला. तवा मला ‘हिच्या’शी बोलायचं होतं, पर आमचे परमपूज्य फादर जमू दिलनीत. त्यांना त्यांच्या डीलमध्ये माझे लाखमोलाचे इमोशन ओव्हरपावर होऊ द्यायचे नव्हते. मोरल हे की मला अन् हिला टिळ्याच्या दिवशी भेटायला मिळालं नाही. माझी एक पगारी सुट्टी गो गोआ गॉन झाली. दिलात चऽऽर्र झालं मनाला वाईट वाटलं. लंचटाइममध्ये ‘माझा टिळा’ वृतांत ऐकताना ऑफिसमधल्या पोरी चुकचुकल्या, फ्रायडेला चे गुवेराचा टी शर्ट घालणाऱ्या पोरांनी ब्लडी पॅट्रीआर्की म्हणले.

मी पण उगीचच ‘या मॅन’ म्हनलं. कंपनीच्या बसमध्ये मोशीपर्यंत सोबत येणारा तन्मय दामले मला म्हणला ‘हिम्मतप्रताप तुला न कणाच नाही बाबा’ मी त्याच्याकडे फक्त पाहिलं तो गप्प झाला. त्या येड्याला काय माहीत ‘कंपनीच्या पे रोलवर ‘हिम्मतप्रताप शिवप्रतापराव धोंडे पाटील’ असं भारदस्त नाव असलेला मी आमच्या फादरसाठी चिमन्याय, त्यांना कणा दाखवला असता तर तो त्यांनी कुटमन मोडला असता. मुंबईपुण्याच्या अन् मराठवाड्यातल्या फादरमधला हा बेशिक फरक माहितच नसतोय जनतेला. पण एक गोष्ट नक्की प्रेमात ताकद असतीय, युनिवर्सली.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com