स्ट्रॉबेरीने घडवले आदिवासींच्या जीवनात परिवर्तन

शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक उत्पादन ते विपणन-विक्रीपर्यंत कसोशीचे प्रयत्न करून स्ट्रॉबेरीचे दर्जेदार उत्पादन घेतले
strawberry crop
strawberry cropAgrowon

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या १५ वर्षांत स्ट्रॉबेरी पिकाखालील क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक उत्पादन ते विपणन-विक्रीपर्यंत कसोशीचे प्रयत्न करून स्ट्रॉबेरीचे दर्जेदार उत्पादन घेतले. इथल्या मातीत व हवामानात पिकणारी लाल चुटूक, आकर्षक स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यासह परराज्यांतील बाजारपेठ त्यास मिळाली आहे. एकरी दोन लाखांपर्यंत नफा देणाऱ्या या पिकाने आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सुरगाणा तालुक्यातील आदिवासी खरिपात भात, नागली, मका, भुईमूग, कुळीथ, उडीद (In tribal kharif rice, nagli, maize, groundnut, kulith, urad) अशी पारंपरिक जिरायती पिके घेऊन उदरनिर्वाह करायचे. दिवाळी संपली की त्यांची रोजगाराच्या शोधात भटकंती ठरलेली असायची. ही वणवण थांबवण्याठी व गावातच स्वरोजगार तयार करण्यासाठी
सन २००२ नंतर येथील काही निवडक शेतकरी (Farmer) पुढे आले. त्यांना स्ट्रॉबेरी पिकाचा (strawberry crop) सक्षम पर्याय पुढ्यात दिसत होता. प्रायोगिक स्तरावर लागवडी झाल्या. डोंगराळ भाग व पावसाचा प्रदेश यामुळे थंड वातावरण (Cool Weather) पिकास अनुकूल ठरले. अर्थात, शेतकऱ्यांनी सुरुवातीला अनेक चढ उतार सोसले.
सुरुवातीला भांडवलही नव्हते. पण एकमेकांना आधार देत एकेक शेतकरी (Farmer) या पिकासाठी पुढे येऊ लागले. श्रीराम गायकवाड, रमेश महाले यांचे सुरुवातीचे योगदान महत्त्वाचे ठरले. अनुभव व कौशल्य (Experience and Skill) यातून सुमारे १५ वर्षांत हे पीक व त्याचे लागवड तंत्र आदिवासींनी आत्मसात केले. महाबळेश्वर भागातील हुकमी मानले गेलेले स्ट्रॉबेरी हे पीक आता सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील नगदी बनले आहे. किंबहुना, या पिकाने (Crop) जीवनात परिवर्तन आणल्याचे शेतकरी अभिमानाने सांगतात.

strawberry crop
स्ट्रॉबेरी पीक बदलातून मिळवला आत्मविश्‍वास

तंत्र जाणले, मिळाला प्रगतीचा मंत्र

तालुक्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावरील बोरगाव, घागबारी तर कळवण तालुक्याच्या पश्‍चिम भागात पळसदरचे खोरे, सुकापूर अशा १० ते १५ गावांत लागवडी विस्तारल्या. स्ट्रॉबेरी (strawberry crop) लागवडीत
मातृ रोपांची उपलब्धता व त्याचा निरोगी दर्जा हा कळीचा मुद्दा असतो. रोपे महाबळेश्‍वर परिसरातून आणावी लागतात. सुरगणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास करून रोपे दर्जेदार व निरोगी रोपे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. सन २००६ मध्ये ‘सेल्वा’ वाणाची लागवड केली जायची.
बदल करून २०१० मध्ये ‘स्वीट चार्ली’ वाण येथे रुजला. उत्पादकता वाढली. पुढे २०१५ नंतर ‘विंटर डाउन’ हा नवा वाण हाती आला.

व्यवस्थापनातील बाबी

- दोन गुंठ्यांपासून दोन एकरांपर्यंत क्षेत्र.
-माती- पाणी (Soil - Water) परीक्षणाद्वारे सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापन.
-थंड प्रदेशात लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या व हलक्या प्रतीच्या जमिनीवर लागवड.
-मातीतील (Soil) बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी पीक फेरपालट.
-चार फुटी बेड व पॉली मल्चिंग पेपरचा वापर.
-अधिक उत्पादनक्षम व नावीन्यपूर्ण वाणांचे प्रयोग झाले.

बोरगाव ब्रॅण्ड रुजतोय

लाल चुटूक, आकर्षक अशी सुरगाण्याची स्ट्रॉबेरी (strawberry) ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. पूर्वी मुंबई, बडोदा, अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे पुरवठा व्हायचा. आता पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई येथील व्यापाऱ्यांकडूनही मागणी असते. ‘बोरगाव स्ट्रॉबेरी’ नावाने ब्रँड रुजवला जात आहे. लाल चुटूक, आंबटगोड स्ट्रॉबेरी डिसेंबरनंतर रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटून वणी, सप्तशृंगी गड व सापुतारा रस्त्यावर विक्रीसाठी दिसू लागते. पर्यटकांची या भागात वर्दळ अधिक असल्याने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या भागातील स्ट्रॉबेरीबाबत समजल्यानंतर मुंबई व गुजरातेतून व्यापारी बांधावर येऊन खरेदी करू लागले आहेत.


एकत्र येण्याचा फायदा

डिसेंबर ते मार्च अखेर प्रमुख हंगाम (Season) चालतो. जानेवारी काळात उपलब्धता कमी व दरांत तेजी असते. पुढे आवक वाढून दर कमी होत असतात. द्वितीय ग्रेडचा माल असल्यास ठरावीक शेतकऱ्यांच्या (Farmer) खळ्यांवर संकलित करून तो प्रक्रिया उद्योगांना ३० रुपये प्रति किलो दराने पाठवला जातो.
अशा संघटित कामकाजामुळे देयकांची हमी (Guarantee) मिळाली आहे. साप्रो नावाने शेतकरी उत्पादक (Farmer Product Company) कंपनी स्थापन झाली आहे. या कंपनीमार्फत प्रक्रिया करण्यासाठी दुय्यम प्रतवारीचा शेतीमाल स्थानिक पातळीवर रोखीने खरेदी केला जातो.

strawberry crop
तरुण शेतकऱ्यांना मिळाले शेतीमाल निर्यातीचे धडे

प्रगतीचा मिळाला मंत्र

स्ट्रॉबेरी पिकातून (strawberry crop) आदिवासी शेतकऱ्यांना प्रगतीचा जणू मंत्रच सापडला आहे. त्यांना एकरी एक, दोन लाख तर थेट विक्रीपर्यंत प्रयत्न केल्यास अडीच लाख व त्यापुढे नफा मिळत आहे. परिणामी, लागवड क्षेत्रातही वाढ झाली आहे. मातृ रोपांपासून अभिवृद्धी करून रोपनिर्मितीचे तंत्रही त्यांना उमगले. स्वतःकडील गरज पूर्ण करून उर्वरित रोपांची काही जण विक्री करतात. आता द्राक्ष पट्ट्यात स्थलांतरित होणारे मजूर स्ट्रॉबेरी उत्पादक झाले आहेत. जीवनमान उंचावले आहे. मुलांना चांगले शिक्षण (Good Quality Education) देता येत आहे. स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.

लागवड दृष्टिक्षेपात

वर्ष - क्षेत्र सुमारे (हेक्टर)
२०१९-२० - ९१
२०२०-२१ - १३१
२०२१-२२ - १४६

दर

कालावधी दर रु. (प्रतिकिलो)

डिसेंबर - २०० ते ३००
जानेवारी - १५० ते २००
फेब्रुवारी - ७५ ते १००
मार्च - ५० ते ७५
एप्रिल - ३० ते ५० (प्रक्रियेसाठी)

कृषी विभागाचे पाठबळ (Agriculture Department)

कृषी विभागाने (Agriculture Department) ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित शेतकऱ्यांना एकत्र करीत स्ट्रॉबेरी उत्पादन विपणन प्रकल्प हाती घेतला आहे. प्रक्रिया उद्योग स्थानिक पातळीवर होण्याकडे लक्ष दिले आहे. मल्चिंग पेपर व सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान, थेट विक्रीसाठी उन्हापासून (Summer) संरक्षणासाठी छत्री, क्रेट व वजनकाटे उपलब्ध केले आहेत. कृषी सहसंचालक संजय पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, कळवण उपविभागीय कृषी अधिकारी राकेश वाणी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
संपर्क
देवेंद्र गायकवाड- ९८८१७७२६१०
(स्ट्रॉबेरी उत्पादक)
प्रशांत राहणे- ९४२०८०५५०६
(तालुका कृषी अधिकारी)

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००२ मध्ये सर्वप्रथम १० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड केली.त्यातून आश्‍वासक उत्पन्न हाती येऊन आत्मविश्‍वास वाढला. या पिकाने आमचे अर्थकारण भक्कम केले आहे. मुलाबाळांचे शिक्षण, जीवनपद्धतीत सुधारणा करण्यात या पिकाची साथ चांगली मिळालीआहे.

-देवेंद्र गायकवाड, स्ट्रॉबेरी उत्पादक, उंबरपाडा, ता. सुरगाणा

पारंपरिक भातशेतीतून एकरी २५ हजारापंर्यंतच नफा शेतकऱ्यांना मिळायचा. स्ट्रॉबेरी पिकातून मात्र शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलत आहे. कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून स्ट्रॉबेरीवर आधारित प्रक्रिया युनिट स्थापन करण्याचा मानस आहे.

प्रशांत राहणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com