Pest Management : उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन कसे कराल?

शेतकऱ्यांनी वेळीच किडीचा प्रादुर्भाव ओळखून उपाय योजले पाहिजेत.
Sugarcane Pyrilla Pest
Sugarcane Pyrilla PestAgrowon

सध्या राज्याच्या अनेक भागांत पावसाची झड कायम आहे. वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उसावर पायरीला म्हणजे पाकोळी (Sugarcane Pyrilla Pest) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. ही रस शोषणारी कीड (Sucking Pest) आहे. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उसाचे उत्पादन ३१ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते. तर साखर उताऱ्यात २ ते ३ टक्के घट येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळीच किडीचा प्रादुर्भाव ओळखून उपाय योजले पाहिजेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने यासंदर्भात पुढील सल्ला दिला आहेः

Sugarcane Pyrilla Pest
Trap Crop मुळे कीड नियंत्रण होते? | ॲग्रोवन

कशी ओळखाल पायरीला कीड ?
- या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते.
- एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यावर मेणचट दोऱ्यासारखे आवरण असते. अंड्यातून पांढरट रंगाची पिल्ले बाहेर पडतात. ज्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात. आणि शरिरावर मेणचट आवरण असते. प्रौढ फिकट पिवळसर रंगाची आणि पाचरीच्या आकाराची असतात.

Sugarcane Pyrilla Pest
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र वाढले

प्रादुर्भावाची लक्षणे कोणती ?
- ही कीड वर्षभर सक्रिय असते परंतु वाढीसाठी सर्वात जास्त अनुकूल काळ जुलै ते सप्टेंबर या महिन्यात असतो.
- किडीची पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेतात त्यामुळे उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात. ही किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ शरीरातून बाहेर सोडते. त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात. उसातील साखरेचे प्रमाण घटते. वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास उसाच्या उत्पादनात घट होते. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उताऱ्यात घट होते.

एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल?
- उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होते.
- उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.
- नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.
- जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत. जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल.
- पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करावीत.
- निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवावा.
- वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे व इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे. जेणेकरून नैसर्गिकरित्या किडींचे व्यवस्थापन होईल. त्याकरिता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.
- उपलब्ध झाल्यास इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे ४००० ते ५००० कोष किंवा ४ ते ५ लाख अंडी शेतामध्ये सोडावीत.
- रासायनिक व्यवस्थापनकरिता प्रति पान ३ ते ५ पिल्लं किंवा प्रौढ अथवा १ अंडीपुंज दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस (२० टक्के) ६०० मिली प्रति एकर फवारावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांशी ०२४५२ २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com