तेलंगणा कापूस लागवड वाढविणार

भात लागवड कमी करण्यासाठी सरकराचा निर्णय
Cotton
CottonAgrowon

पुणे : तेलंगणा सरकारने यंदा कापसाच्या (Cotton) लागवडीचे क्षेत्र ५५ ते ६५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी राज्यात १८ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र २८ ते ३० लाख हेक्टरवर नेण्याचा प्रयत्न तेलंगणा सरकार करणार आहे.

तेलंगणात भात खरेदीचा (Rice Purchase) विषय यंदा चिंतेचा बनला. शेतकऱ्यांना (Farmer) सांगूनही शेतकरी भाताची लागवड अधिकच करत आहेत. त्यामुळे सरकारने यंदा धोरणच राबविण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोबर २०२१ पासून मध्यम लांबीच्या धाग्याला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला. देशातील बहुतांशी बाजारांत लांब धाग्याच्या कापसाला साधारणतः १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. राज्य सरकारने गेल्या हंगामातही शेतकऱ्यांना (Farmer) भातपिकापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कापूस, ऊस, (Sugarcane) फळभाज्या उत्पादनाकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले. राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाऐवजी मिरचीला प्राधान्य दिले. मात्र पाऊस, (Rain) कीड-रोग यामुळे मिरची उत्पादकांचे (Chili Production) नुकसान झाले.

Cotton
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे नुकसान 

शेतकऱ्यांना भात पिकापासून (rice Crop0 परावृत्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी कापसासारख्या चांगला परतावा देणाऱ्या पिकाचे उत्पादन घ्यावे, असा आग्रह राज्याचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी केले. जुलैपासून सुरू होणाऱ्या खरिपात कापूस बियाणे उद्योग क्षेत्राकडूनही कापूस लागवड (Cotton Cultivation) क्षेत्रात यंदा १५ टक्क्यांची वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वाढती मागणी आणि रास्त दरामुळे शेतकरी आता कापूस लागवडीकडे वळतील, असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी प्रयत्न करूनही राज्यातले कापूस (Cotton) लागवडीखालचे क्षेत्र वाढवता आलेले नाही. त्यामुळे यंदा राज्य सरकारकडून कापसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी एक उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली आहे. राज्यातील पिकांचे क्लस्टर्स शोधून त्यांना विशिष्ट पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांना खतांची (Fertilizers to cotton growers) कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही रेड्डी यांनी नमूद केले.

मागील हंगामात अपयश
२०२०-२०२१ या आर्थिक वर्षात राज्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र २४ लाख हेक्टर होते. त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या आवाहनानंतर लागवडीचे प्रमाण वाढवण्याऐवजी ते १८ लाख हेक्टरपर्यंत घसरले. येत्या खरिपात आम्हाला २८ ते ३० लाख हेक्टर क्षेत्रात कापूस (Cotton) , २० लाख हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड अपेक्षित आहे. फलोत्पादन लागवड ५ लाख हेक्टरवर, ६ लाख हेक्टर क्षेत्रात तूर लागवडीची अपेक्षा असल्याचे रेड्डी म्हणाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com