Hunger : बुचकुलीभर भुकेची जाण

केवळ पोट भरण्यासाठी लहानपणी केलेले उद्योग किंवा चुका म्हणजे फार मोठा गुन्हा नव्हता हे भूतकाळात डोकावून पाहिलं की आत्ता मनोमन पटतं. माझा मित्र संपत व मी एकत्र शिकत असताना केलेले अनेक उद्योगही नेहमी आठवत राहतात.
food
foodAgriculture

देवा झिंजाड

केवळ पोट भरण्यासाठी लहानपणी केलेले उद्योग किंवा चुका म्हणजे फार मोठा गुन्हा नव्हता हे भूतकाळात डोकावून पाहिलं की आत्ता मनोमन पटतं. माझा मित्र संपत व मी एकत्र शिकत असताना केलेले अनेक उद्योगही नेहमी आठवत राहतात. संपत होता शेजारच्या शेरी गावचा पण त्याचे आई वडील आमच्या गारखिंडीत पोट भरायला आल्यानं आमची शाळेत गाठ पडली.

food
Indian Tourism : कोरोना साथीनंतर पर्यटन ‘रुळा’वर

मग आम्ही शेवटपर्यंत एकमेकांची पाठ सोडलीच नाही. त्याचीही परिस्थिती अत्यंत हलाखीची, माझी तर त्याहूनही वाईट. कारण त्याला वडील होते पण माझे मात्र मी पहिलीत असतानाच 'देवाघरी' गेले होते. आम्ही दररोज शाळेत जाताना मारुतीरायाचं दर्शन घ्यायचो. मग समोरच्या दगडी नंदीवर बसायचो. कुणी प्रसाद ठेवला असेल तर तो पटकन खायचो.

food
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

मारुतीच्या देवळात एक लाकडी कपाट होतं ते भिंतीत बसवलेलं होतं. जुन्या काळातलं. त्यात हरिनाम सप्ताह झाल्यानंतर उरलेली खिरापत ठेवलेली असायची. गावात हरिनाम सप्ताह फार मोठा उत्सव असायचा आणि अजूनही आहे. घरी तर गोड ह्या शब्दाची व्याख्या कळेल एवढी साखर कधी घरात येत नसायची.

food
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

सणावाराला ती तरी कळायची. मग गोड खाणार तरी कुठं ना? त्यामुळे मारुतीच्या देवळातली ती खिरापत आमच्यासाठी मोठा खाऊ वाटायची. पण त्या कपाटाला असायचे कुलूप अन् चावी असायची पुजाऱ्याकडं. तरीही मी व संपत त्या कपाटाच्या दरवाजामधून हात घालायचो. आत हात घालताना तो पसरट असायचा पण बुचकुली भरून खिरापत उचलली की मग मात्र त्या दरवाजातून हात बाहेर येत नसे.

food
Indian Marriage : लग्नातील बदलते मध्यस्थ

बरं हात बाहेर काढण्यासाठी बुचकुली सोडावी तर खिरापत सांडणार अन् नाही सोडावा तर हात बाहेर निघत नसे. अशा वेळी डोक्यातली टोपी त्या फटीत घालून तिथेच बुचकुलीतली खिरापत सोडून द्यायचो अन् हात बाहेर काढून घ्यायचो. मग टोपी बाहेर काढून त्यात साचलेली खिरापत खायचो अन् मारुतीला सांगायचो,

"उजूक नाही खानार ह." "फक्त एकदाच हा."

असं म्हणत आम्ही पाच वर्षे खिरापत खाल्ली. पण मारुतीराया कधी आमच्यावर रागावलाच नाही. बहुतेक त्याला आमच्या 'बुचकुलीभर' गरीब भुकेची अन् आनंदाची जाण असावी. जर ही गोष्ट त्यावेळी गावात कुणाला समजली असती तर देवळात चोरी केली म्हणून कदाचित आम्हांला कोलदांडा घालून मारलंही असतं. त्यामुळे ही गोष्ट मी संपत आणि मारुतीराया सोडून आत्तापर्यंत कुणालाच माहिती नव्हती. पण आज सगळ्या महाराष्ट्राला समजली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com