
बऱ्याच भागात वन्य प्राण्यांमुळे नियमितपणे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) होते. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. शेती जर जास्त असेल तर एकाच वेळी कुंपण (Fencing) घालणे शक्य होत नाही. या कामात खूप पैसा खर्च होतो. यावर उपाय म्हणून शेतीला कुंपण घालण्यासाठी राजस्थान सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. या योजनेंतर्गत सुमारे ५० शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
राजस्थान सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री किसान साथी योजना सुरू केली आहे. या योजनेतील राजस्थान पीक संरक्षण अभियानांतर्गत जनावरांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला कुंपण घालण्यावर होणाऱ्या खर्चावर जास्तीत जास्त ४८ हजार रुपये म्हणजे कमाल ६० टक्के अनुदान दिले जाते.
राजस्थानातील इतर शेतकऱ्यांना कुंपणाच्या किंमतीवर ५० टक्के म्हणजेच ४० हजार रुपये अनुदान दिलं जातं. राजस्थान पीक संरक्षण अभियानांतर्गत २०२२-२३ या वर्षाच्या नव्या कृषी अर्थसंकल्पात येत्या दोन वर्षांत ३५ हजार शेतकऱ्यांना २५ लाख मीटरच्या कुंपणासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राजस्थान पीक संरक्षण अभियानांतर्गत कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे एकाच ठिकाणी दीड हेक्टर शेतीयोग्य जमीन असली पाहिजे. २ ते ३ शेतकरी एकत्रितपणे आपल्या दीड हेक्टर जमिनीच्या कुंपणासाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ४०० रनिंग मीटरपर्यंत कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.