शेतकरी पीक नियोजन : टोमॅटो

नाशिक महामार्गावरील नारायणगांव (ता.जुन्नर) येथील उपबाजार उन्हाळी टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध प्रयोग करून शेतकऱ्यांनी उन्हाळी टोमॅटो लागवडीचे तंत्र विकसित केले आहे.
Tomato
TomatoAgrowon

शेतकरी ः रामभाऊ वाळुंज

गाव ः खानापूर ता. जुन्नर जि.पुणे.

एकूण क्षेत्र ः १० एकर

टोमॅटो क्षेत्र ः ३ एकर (सध्या १ एकर लागवड)

पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगांव (ता.जुन्नर) येथील उपबाजार उन्हाळी टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध प्रयोग करून शेतकऱ्यांनी उन्हाळी टोमॅटो लागवडीचे तंत्र विकसित केले आहे. जुन्नर, खेड, आंबेगावसह नगर जिल्ह्यातील पारनेर आणि संगमनेर तालुक्यातही उन्हाळी टोमॅटोची मोठी लागवड होते. सध्या येथील शेतकऱ्यांची टोमॅटो लागवडीसाठी लगबग सुरु आहे.

खानापूर (ता.जुन्नर, जि. पुणे) येथे माझी सुमारे १० एकर शेती आहे. त्यापैकी ३ ते ४ एकरांवर टोमॅटो आणि उर्वरित क्षेत्रामध्ये शेवंती, गुलाब आणि ॲपल बोर लागवड असते. माझे दरवर्षी सुमारे ३ ते ४ एकरांवर उन्हाळी टोमॅटोची लागवडीचे नियोजन असते. मी मागील २५ वर्षांपासून टोमॅटो लागवड करत आहे. योग्य व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न असतो. मागील काही वर्षांतील अनुभवानुसार या वर्षी दोन टप्प्यात टोमॅटो लागवडीचे नियोजन केले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात १ एकरावर उन्हाळी टोमॅटो लागवडीचे नियोजन केले आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये बाजारपेठेचा अंदाज घेऊन पुढील लागवडीचे नियोजन केले जाईल.

मागील १५ दिवसांतील कामकाज ः

  • - नुकतीच उन्हाळी कांद्याची काढणी पूर्ण झाली आहे. त्याच शेतामध्ये मल्चिंग पेपरवर टोमॅटो लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी नांगरणी, फणणी आणि रोटर मारून शेत तयार करून घेतले.

  • - त्यानंतर एकरी १५ टन शेणखत शेतामध्ये पसरले.

  • - एक एकरावर लागवडीसाठी सुमारे ७ रोपांची रोपवाटिकेत आगाऊ मागणी केली आहे. एक रोप साधारण १ रुपये ८० पैशांना मिळाले आहे. लागवडीसाठी निरोगी, सशक्त, उत्तम फळधारणा, उत्पादकता, टिकवणक्षमता या मुख्य बाबी विचारात घेऊन वाणाची निवड केली आहे.

  • - टोमॅटो लागवडीसाठी साडेचार फूट रुंद आणि दीड फूट उंचीचे वाफे (बेड) तयार केले. वाफे तयार केल्यानंतर त्यात रासायनिक खतांचे बेसल डोस दिले.

  • - त्यानंतर बेडवर ठिबक सिंचनाच्या लॅटरल पसरून सछिद्र मल्चिंग पेपर अंथरूण घेत आहे.

आगामी नियोजन ः

  • - सध्या बेडवर ठिबक संच आणि मल्चिंग पेपर अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण केले जाईल. त्यानंतर सलग तीन दिवस ठिबक संच सुरू करून बेड पूर्णपणे भिजवून घेतले.

  • - पुढील दोन दिवसांत ठिबकद्वारे विद्राव्य बुरशीनाशकांचा वापर केला जाईल. त्यामुळे शेणखतातील बुरशीमुळे होणारी रोपांची मर टाळली जाईल.

  • - साधारण.....आठवड्यात रोपांची लागवड केली जाईल. दोन रोपांमध्ये साधारण अंतर ठेवले जाईल.

  • - पिकाची पाण्याची गरज आणि तापमानाचा अंदाज घेऊन ठिबक संचाचा कालावधी ठरविला जाईल.

  • - वाढीच्या अवस्थेत ठिबकद्वारे पिकांस विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातील. अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा केल्यामुळे रोपे सशक्त होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

दोन टप्प्यातील लागवडीची कारण ः

मागील वर्षीच्या अनुभवानुसार टोमॅटोला दर चांगले मिळत असल्याने तालुक्यात शेतकरी एकाच वेळी अधिक क्षेत्रावर लागवड करतात. एकाचवेळी लागवड केल्याने बाजारात टोमॅटोची आवक वाढून दर पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या वर्षी दोन टप्प्यात लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात एकरावर लागवड आणि पुढे बाजारपेठेचा अंदाज घेऊन जून महिन्यात आणखी २ एकरावर लागवडीचे नियोजन आहे. बाजारभाव चांगला असेल तरच दोन एकरावर लागवड केली जाईल, अन्यथा झेंडू लागवडीचे नियोजन आहे.

- रामभाऊ वाळुंज, ९८६०८५५३१७

(शब्दांकन ः गणेश कोरे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com