Crop Protection : तुरीतील शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशीचे नियंत्रण

तूर पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, शेंगावरील ढेकूण शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसतो.
Tur crop Pest Management
Tur crop Pest ManagementAgrowon

डॉ. राहुल वडस्कर, डॉ. विलास तांबे

तूर पिकावर मावा (Aphids), तुडतुडे, फुलकिडे (Thrips), कोळी (Mite), शेंगावरील ढेकूण शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसतो. किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

शेंगा पोखरणारी अळी

(हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा) ः

प्रथम, द्वितीय अवस्थेतील अळीचा फुलांवर व नंतरच्या अवस्थांचा शेंगांवर प्रादुर्भाव आढळून येतो.

अर्धी आत व अर्धी बाहेर राहून अळी शेंगातील दाणे खाते. शेंगांवर अनियमित आकाराचे मोठे छिद्र पडते.

एक अळी २० ते २५ शेंगांचे नुकसान करते.

सर्वेक्षण ः

कळी ते फुलोरा अवस्थेतील पिकाचे आठवड्यातून एकदा एकरी १० ते १२ झाडांचे सर्वेक्षण करावे.

पतंगांच्या सर्वेक्षणासाठी एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

Tur crop Pest Management
Crop Damage: सोयाबीन , कपाशी , तूर या पिकांना सर्वाधिक फटका | ॲग्रोवन

व्यवस्थापन ः

पीक कळी ते फुलोरा अवस्थेत असताना फुलगळ दिसून येते. ही फुलगळ नैसर्गिक, पाण्याचा ताण व प्रतिकूल वातावरणामुळे होण्याची शक्यता असते. मात्र, हेलिकोव्हर्वा अळीच्या प्रादुर्भावामुळे देखील फुलगळ होते. ही अळी कळी आणि फुलांना छिद्र पाडून खाते. त्यामुळे अशी गळून पडलेली फुले काळजीपूर्वक पाहिल्यास प्रादुर्भावाचा अंदाज लावता येतो.

पीक फुलोऱ्यावर आल्यापासून कीड मोठ्या प्रमाणात अंडी घालते. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मादी पतंग अंडी घालण्यासाठी कमी प्रमाणात आकर्षित होतात. अळ्यांची खाण्याची क्रिया मंदावते.

हेक्‍टरी २० ते ५० पक्षि थांबे उभारावेत.

जैविक नियंत्रण (प्रमाण ः प्रति १० लिटर पाणी)

बॅसिलस थुरिंजेन्सिस (५ डब्लू.पी.) २०.८ ग्रॅम किंवा

एचएएनपीव्ही (हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा न्यूक्लिअस पॉलिहेड्रॉसिस व्हायरस)(२.० ए.एस.) ८.३ मिलि

रासायनिक फवारणी

(फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)

थायोडीकार्ब (७५ डब्लू.पी.) १६.७ ग्रॅम किंवा

क्विनॉलफॉस (२० टक्के एएफ) ४१.७ मिलि किंवा

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २३.३ मिलि किंवा

डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी.) ८.३ मिलि किंवा

इथियॉन (५० ई.सी.) २५ मिलि किंवा

बेनफ्युराकार्ब (४० ई.सी.) ४१.७ मिलि किंवा

इन्डोक्‍झाकार्ब (१४.५ एस.सी.) ६.७ मिलि किंवा

इन्डोक्‍झाकार्ब (१५.८ ई.सी.) ५.६ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) ८.३३ मिलि

दुसरी फवारणी ः ( प्रति १० लिटर पाणी)

इमामेक्‍टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ३.७५ ग्रॅम किंवा

लुफेन्युरॉन (५.४ टक्के ईसी) १० मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) २.५ मिलि किंवा

फ्लूबेनडायमाइड (२० डब्लूजी) ४.२ ग्रॅम किंवा

फ्लूबेनडायमाइड (३९.३५ एस.सी.) १.७ मिलि किंवा

स्पिनोसॅड (४५ एस.सी.) २.७ मिलि किंवा

नोव्हॅल्युरॉन (५.२५ टक्के) अधिक इन्डोक्‍झाकार्ब (४.५ टक्के एस.सी.) संयुक्त कीटकनाशक १४.६ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३ एस.सी.) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ झेडसी) संयुक्त कीटकनाशक ३.३ मिलि

Tur crop Pest Management
तूर पीक सल्ला

फवारणीचे नियोजन

पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.

तूर पिकामध्ये एक एकर क्षेत्रासाठी नॅपसॅक पंपाने २०० ते ३०० लिटर पाण्याचा वापर शिफारशीत आहे.

कमी पाण्यात जास्त कीटकनाशकांच्या फवारणीमुळे फुलोऱ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत मात्रेमध्ये कीटकनाशकांचा वापर करावा.

शेंगा पोखरणारी अळी (पिसारी पतंग)

लहान अळी कळ्या, फुलांना छिद्र पाडून खाते. मोठी अळी शेंगावरील साल खरवडून, शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते.

अळी शेंगेच्या बाहेर राहूनच प्रादुर्भाव करते.

व्यवस्थापन ः

हेलिकोव्हर्पा तसेच पिसारी पतंगाच्या अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव कालावधी सारखाच असतो. त्यामुळे या किडीसाठी वेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत नाही.

शेंगमाशी

मध्यम व उशिरा परिपक्व होणाऱ्या तुरीच्या वाणांवर (१८० पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी) येणारी महत्त्वाची कीड आहे.

किडीची अंडी, प्रादुर्भाव करणारी अळी तसेच कोषावस्था शेंगेच्या आत असल्यामुळे प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येत नाही.

पूर्ण विकसित किंवा पक्व होणाऱ्या शेंगापेक्षा कोवळ्या शेंगांमध्ये मादी जास्त अंडी घालते.

विशेषत: वरच्या एक तृतीयांश भागातील शेंगांमध्ये जास्त प्रमाणात अंडी घालते. मोठ्या आकाराच्या शेंगांमध्ये जास्त प्रादुर्भाव आढळतो.

नुकसान

शेंगेच्या आत राहून अळी एका दाण्यावर आपली उपजीविका पूर्ण करते. शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते.

प्रादुर्भावग्रस्त दाण्यांवर बुरशीची वाढ होते. असे बुरशीग्रस्त दाणे खाण्यासाठी किंवा लागवडीसाठी योग्य नसतात.

आर्थिक नुकसान पातळी

पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा.

व्यवस्थापन

(फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)

क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २३.३ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ८.३ मिलि किंवा

डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के ईसी) ८.३ मिलि किंवा

लुफेन्युरॉन (५.४ टक्के ईसी) १० मिलि किंवा

इन्डोक्झाकार्ब (१४.५ टक्के एससी) ६.७ मिलि किंवा

इन्डोक्झाकार्ब (१५.८ टक्के ईसी) ५.६ मिलि किंवा

नोव्हॅल्युरॉन (५.२५ टक्के) अधिक इन्डोक्‍झाकार्ब (४.५ टक्के एस.सी.) संयुक्त कीटकनाशक १४.६ मिलि

टीप ः ही कीड प्रामुख्याने शेंगांमध्ये अंडी घालते. त्यामुळे शेंगा धरण्याच्या अवस्थेत पहिली आणि त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

शेंगावरील ढेकूण

बाल्यावस्था व प्रौढ कोवळ्या शेंगातील रस शोषण करतात.

दाण्यांवर चट्टे उमटून प्रत खराब होते. शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळतात.

प्रादुर्भावग्रस्त बियाणे पेरणी तसेच डाळ करण्यासाठी योग्य नसते.

व्यवस्थापन

या किडीच्या व्यवस्थापनासाठी वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाही. शेंगमाशीचे रासायनिक व्यवस्थापन करीत असतानाच या

किडीचे सुद्धा व्यवस्थापन होते. बरेचदा मित्र कीटक तुरीच्या शेंगावरील ढेकणाचे नैसर्गिकरीत्या

व्यवस्थापन करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com