शेतकरी पीक नियोजन ः हळद

हिंगोली जिल्ह्यातील माटेगाव (ता.वसमत) येथे आमच्या एकत्रित कुटुंबाची ३२ एकर शेती आहे. त्यात १३ एकरांवर हळद लागवड आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन आणि हरभरा लागवडीचे नियोजन असते.
Turmeric
TurmericAgrowon

शेतकरी ः संजय पिसोरे

गाव ः माटेगाव, ता.वसमत, जि.हिंगोली

एकूण क्षेत्र ः ३२ एकर

हळद क्षेत्र ः १३ एकर

हिंगोली जिल्ह्यातील माटेगाव (ता.वसमत) येथे आमच्या एकत्रित कुटुंबाची ३२ एकर शेती आहे. त्यात १३ एकरांवर हळद लागवड आणि उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन आणि हरभरा लागवडीचे नियोजन असते पूर्वी सरी पद्धतीने कमी क्षेत्रावर लागवड करत होतो. त्यामुळे उत्पादनही कमी मिळायचे. मागील काही वर्षात लागवड पद्धतीत सुधारणा करत गादी वाफा पद्धतीने हळद लागवडीस सुरुवात केली. दरवर्षी साधारण १२ ते १५ एकरवर सेलम वाणाच्या हळदीची लागवड केली जाते. मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्णपणे यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे अनेक कामे सुलभ झाली आहेत.

जमीन मध्यम ते भारी प्रकारची आहे. हळद लागवडीसाठी पीक फेरपालट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हरभरा, तूर पिकांचे उत्पादन घेतलेल्या जमिनीत हळद लागवडीचे नियोजन केले जाते. गावाजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदी काठी विहीर असून तेथील पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो.

मागील महिन्यातील कामकाज ः

- गेल्या हंगामातील हळदीची काढणी मार्च-एप्रिल महिन्यात पूर्ण झाली. मागील हंगामातील निरोगी, सशक्त बेणे पुढील हंगामात लागवडीसाठी वापरले जाते.

- त्यानुसार सव्वाशे क्विंटल बेण्याची यावर्षीच्या लागवडीसाठी प्रतवारी केली.

- प्रतवारीनंतर शेतातील शेडमध्ये बेणे प्रक्रिया करून साठवणुकीसाठी ठेवले.

- बेणे साठवणूक करताना बेण्याचा ढीग करून त्यावर कडुनिंबाचा ओली पाने पसरली. त्यावर शेणामातीचे तीन थर देऊन ढीग लेपून घेतला. बेण्याच्या ढीगामध्ये हवा खेळती राहण्यासाठी पीव्हीसी पाइप बसविले आहेत.

- शेणामातीचा थर दिल्यानंतर ढीग तागाच्या रिकाम्या पोत्यांनी झाकून घेतले. ही पोती दिवसातून दोन वेळा पाण्याने भिजवली जातात. त्यामुळे योग्य तापमान राखण्यास मदत होते.

- मागील महिनाभरात पूर्वमशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. त्यात नांगरट करणे, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करून घेतली.

- पूर्वमशागत पूर्ण झाल्यानंतर डीएपी ५० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १०० किलो, निंबोळी पेंड ५० किलो, पोटॅश २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो मात्रा प्रति एकर प्रमाणात दिली आहे.

आगामी नियोजन ः

- सध्या गादीवाफे तयार करण्याची कामे सुरू आहेत. ट्रॅक्टर चलित यंत्राच्या साह्याने गादी वाफे तयार करत आहे.

- दोन गादी वाफ्यांमध्ये साधारण ५ फूट अंतर आणि उंची सव्वा फूट तर रुंदी दोन फूट अंतर ठेवले जाईल.

- गादी वाफ्यावर हळदीची जोड ओळ पद्धतीने लागवड केली जाते. दोन ओळीतील १३ इंच तर दोन रोपांतील अंतर ६ इंच असते. दोन ओळींमध्ये ठिबक सिंचनाची लॅटरल टाकली जाते.

- ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे साधारण एक जूनला हळद लागवडीचे नियोजन आहे.

- संजय पिसोरे, ९९७५५९६२८२

(शब्दांकन ः माणिक रासवे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com