हानिकारक वनस्पतींच्या नियंत्रणासाठी फुलकिड्यांचा वापर

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये ब्राझिलियन पेपरट्री या झुडपाची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे वनस्पती आणि सजीवांच्या जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे.
Use of insects to control noxious plants
Use of insects to control noxious plantsAgrowon

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये ब्राझिलियन पेपरट्री (Brazilian Pepper tree) या झुडपाची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे वनस्पती आणि सजीवांच्या जैवविविधतेवर (Bio-Diversity) विपरीत परिणाम होत आहे. या हानिकारक ठरणाऱ्या वनस्पतींच्या जैविक नियंत्रणासाठी ब्राझीलियन पेपरट्री थ्रीप्स ही फुलकिड्यांची प्रजात आश्‍वासक ठरत असल्याचे फ्लोरिडा राज्यामध्ये झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. हे संशोधन ‘फ्लोरिडा एन्टॉमॉलॉजिस्ट’मध्ये (Florida Entomologist) प्रकाशित करण्यात आले आहे.

फुलकिडे हा भाजीपाला आणि फळबागेतील सामान्य कीड आहे. मात्र दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलियन पेपरट्री थ्रीप्स (शा. नाव Pseudophilothrips ichini) ही प्रजात केवळ ब्राझीलियन पेपरट्रीवर वाढते. पाने आणि कोवळे अंकुर फुलकिड्यांकडून खाल्ले जात असल्यामुळे या झाडांच्या वाढीचा वेग, फुलांची संख्या आणि एकूण उत्पादन कमी होते.

Use of insects to control noxious plants
Crop Insurance : पीकविम्याबाबत पालकमंत्र्यांचे पूर्वीचेच तुणतुणे

संयुक्त अमेरिकेच्या कृषी विभागाच्या संशोधन सेवेतील शास्त्रज्ञ आणि फ्लोरिडा विद्यापीठातील अन्न आणि ग्राहक सेवा विभागातील संशोधकांनी एकत्रितरीत्या काही प्रयोग केली. त्यांनी मे २०१९ आणि डिसेंबर २०२१ मध्ये फ्लोरिडा येथील ब्राझीलियन पेपरट्रीचे प्रमाण अधिक असलेल्या सुमारे ५६७ प्रक्षेत्रामध्ये

स्युडोफिलोथ्रिप्स इचिनी (Pseudophilothrips ichini) या फुलकिड्यांचे प्रसारण केले. त्यातील ६० टक्के ठिकाणी या फुलकिड्यांची चांगली वाढ झाली. त्याविषयी माहिती देताना फोर्ड लॉडेर्डेल (फ्लोरिडा) येथील हानिकारक वनस्पती संशोधन प्रयोगशाळेतील कीटकशास्त्रज्ञ ग्रेगोरी व्हीलर यांनी सांगितले, की प्रसारण केल्यानंतर किमान ६० दिवसांनंतरही फुलकिड्यांची प्रौढ या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यरत असल्याचे दिसून आले.

म्हणजे प्रसारण केलेल्या फुलकिड्यांतील सुमारे ६० टक्के या ठिकाणी स्वतंत्रपणे तग धरू शकले. म्हणजेच ही फुलकिड्याची प्रजात ब्राझिलियन पेपरट्री या हानिकारक, त्रासदायक ठरणाऱ्या वनस्पतींच्या नियंत्रणामध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकेल, असे वाटते. अर्थात, याबाबत अधिक अभ्यास केला जात आहे.

ब्राझीलियन पेपरट्री काय आहे?

दक्षिण अमेरिकेतील हे स्थानिक झुडूप असून, सदाहरित प्रकारातील कणखर वनस्पतींमध्ये मोडते. त्याला चमकदार लाल रंगाची बारीक फळे येतात. ही वनस्पती अत्यंत वेगाने वाढणारी आणि पुनरुत्पादन करणारी असल्याने त्यांची गर्दी होते. अशा ठिकाणी अन्य स्थानिक वनस्पतींना वाढण्यास वावच राहत नाही.

त्याच प्रमाणे त्याची फळे ही विषारी असून, कोणताही प्राणी ते खात नाही. चुकून कोणाकडून खाल्ले गेल्यास त्याची विषबाधा होते. या वनस्पतींच्या पराग आणि रसाचे अनेक लोकांना अॅलर्जी होते.

अमेरिकेमध्ये ही वनस्पती अत्यंत वेगाने वाढत चालली असून, तिने कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, हवाई आणि टेक्सास अशा राज्यांमध्ये आपले पाय पसरले आहेत. एकट्या फ्लोरिडामध्ये बहुतांश सर्व मोकळ्या जागांमध्ये तिची वाढ झालेली दिसून येते. या वनस्पतीखालील जमिनीचे क्षेत्र सात लाख एकरपेक्षा अधिक असल्याचे राज्यातील कृषी विभागाचे मत आहे.

या हानिकारक ठरणाऱ्या वनस्पतींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय केले जात असले तरी पर्यावरणपूरक उपायांचा शोध सातत्याने घेतला जात होता. पर्यावरणपूरक उपायांमध्ये या वनस्पतींवरील विविध किडी आणि रोगांचा विचार करण्यात आला होता. त्यात फ्लोरिडामध्ये प्रथमच जैविक नियंत्रक म्हणून या वनस्पतीवरील फुलकिड्यांचा वापर करण्यात आला. सध्या त्यांची कार्यक्षमता आणि वनस्पतींच्या नियंत्रणामधील उपयुक्ततेचा अधिक अभ्यास केला जात असल्याचे व्हीलर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com