
डॉ. भरत पाटील, डॉ.अनिकेत चंदनशिवे, सोमनाथ पवार, चिमाजी बाचकर
महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाच्या रिमझिम सरी तर काही काळ ढगाळ हवामान (Cloudy Climate) अशी स्थिती आहे. बदलत्या हवामानामुळे भाजीपाला पिकांच्या (Vegetable Crop) रोपवाटिकेमध्ये रस शोषणाऱ्या किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Pest On Vegetable Crop) दिसून येत आहे. कीड-रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे पाहून वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.
कांदा ः
- रांगडा कांदा लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करावी.
- पेरणीसाठी फुले समर्थ किंवा बसवंत-७८० या वाणांची निवड करावी.
- रोपवाटिकेत कांदा रोपांवर फुलकिडे व करपा रोगाचा प्रादुर्भाव आल्यास,
नियंत्रणासाठी,
डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) ०.५ मिलि अधिक स्टिकर १ मिलि
प्रति लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.
- अधूनमधून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा
अझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मिलि अधिक स्टिकर
प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- कांद्याची रोपे साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात.
टोमॅटो ः
- रोपवाटिकेत टोमॅटो रोपांवर फुलकिडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्रणासाठी,
डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) ०.५ मिलि किंवा
इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एसएल) ०.३ मिलि
प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
- लागवडीसाठी तयार रोपांची पुनर्लागवड करताना,
मेटॅलॅक्झिल (एम ३१.८ टक्के इ.एस.) ०.६ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम
प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.
- नर्सरीमधून आणलेल्या रोपांची लागवड करताना ट्रे मध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी.
वांगी ः
- रोपवाटिकेतील रोपांवर तुडतुडे, मावा, पांढरी माशी व नागअळी या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
नियंत्रणासाठी,
डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्लू.पी.) ५ मिलि किंवा
प्रति १० लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
- अधूनमधून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन (१०, ००० पीपीएम) २ मिलि अधिक स्टिकर प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.
भेंडी ः
- भेंडी पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आल्यास,
नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्लूजी) ०.७ ग्रॅम किंवा
थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) २ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
- फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेली फळे काढून नष्ट करावीत.
नियंत्रणासाठी,
डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.८ मिलि किंवा
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.६ मिलि
प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
वेलवर्गीय भाजीपाला ः
- ढगाळ हवामानामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
अमिटोक्ट्रॅडीन (२७ टक्के) अधिक डायमेथोमॉर्फ (२०.२७ टक्के एस.सी) ३ ते ४ मिलि किंवा
बेनालॅक्सिल (८ टक्के )अधिक मॅंकोझेब (६५ टक्के डब्लू.पी.) २.५ ग्रॅम
प्रति लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
(टीपः अॅग्रेस्को शिफारस आहे.)
---------------
- डॉ.अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५
(भाजीपाला संशोधन संकुल, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.