Vegetable Grafting : भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान

भाजीपाला पिकामध्ये कलम कसे केले जाते याविषय़ी या प्रकल्पाचे प्रमुख यशवंत जगदाळे यांनी दिलेली माहिती पाहुया.
Vegetable Grafting
Vegetable Grafting Agrowon

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र मागील पाच वर्षापासून उच्च डच तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation) पद्धती विषय़ी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते. हे भाजीपाला उत्पादन केंद्र एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो – डच तंत्रज्ञानावर (Indo Duch Technology) आधारीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे अंतर्गत चालवले जाते. या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामधून उत्तम प्रतीची रोग व कीडविरहीत रोपे तयार करून शेतकऱ्यांना पुरविली जातात. रोपे तयार करताना नेदरलँड मधील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. भाजीपाला रोपांमध्ये कलम तंत्रज्ञानाचाही (Vegetable Grafting) वापर केला जातो. भाजीपाला पिकामध्ये कलम कसे केले जाते याविषय़ी या प्रकल्पाचे प्रमुख यशवंत जगदाळे यांनी दिलेली माहिती पाहुया. 

Vegetable Grafting
Vegetable Farming : दूर झाला बेरोजगारीचा अंधार कर्तृत्वाचे उजळवले दीप

भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला रुटस्टॉकसाठी गावठी किवा जंगली रोपाची निवड केली जाते तर सायन म्हणून संकरित वाणाची निवड केली जाते.  हे संकरीत वाण शेतकरी जो लागवड करणार आहे तेच घेतले जाते. रुटस्टॉक आणि सायनची निवड झाली की कलम बांधण्याची पद्धत निवडली जाते. व्यापारी तत्वावर क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम, व पाचर कलम या विविध कलम पद्धतींचा भाजीपाला पिकामध्ये कलमी रोपे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके

भाजीपाला गुणवत्ता केंद्र मागील पाच वर्षांपासून वांगी व ढोबळी मिरची या पिकांमध्ये हे कलमी भाजीपाला पीक उत्पादन तंत्रज्ञान वापरत आहे. आत्तापर्यंत ५० शेतकऱ्यांच्या शेतावर याची प्रात्याक्षिके आयोजित केली गेली आहेत. आत्तापर्यंत भाजीपाला गुणवत्ता केंद्राने ४ लाख पेक्षा अधिक कलमी रोपे विशेष करून वांगी,  ढोबळी मिरची व टोमॅटो रोपे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरविली आहेत.

Vegetable Grafting
Vegetable Farming : वेलवर्गीय भाज्यांना दिली ऊस, मोगऱ्याने साथ

नाबार्ड च्या अर्थसहाय्यातून प्रकल्पाची उभारणी

या कलम तंत्रज्ञानाचे चांगले सकारात्मक परिणाम पाहून पुण्यातील राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड ने या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिले आहे. या अर्थसहाय्यातून सन २०२२-२३ मध्ये  भाजीपाला पिकामध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह भाजीपाला पिकांमध्ये कलम तंत्रज्ञानाचा वापर करुन बारामती, पुरंदर व दौंड येथील १०० शेतकऱ्यांच्या शेतावर प्रकल्प राबविण्यात येत आहे. भाजीपाला पिकातील कलम तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती पुढील भागात पाहुयात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com