मेक्सिकन भुंगे फस्त करतील गाजर गवत

मेस्किकन भुंगे म्हणजेच झायगोग्रामा बायकोलरॅटा या मित्रकिटका द्वारे गाजर गवतावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.
Zygogramma bicolorata
Zygogramma bicolorataAgrowon

इकडे तिकडे कुठेही उगवणारे गाजर गवत म्हणजे कॉंग्रेस सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही. या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडवटपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. गाजर गवत निर्मूलनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी रासायनिक नियंत्रण (Chemical Control) तणनाशके (Weediside) महागडी असल्याने परवडत नाहीत आणि गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत. म्हणून जैविक नियंत्रण पध्दतीनुसार मेस्किकन भुंगे म्हणजेच झायगोग्रामा बायकोलरॅटा (Zygogramma bicolorata) या मित्रकिटका द्वारे गाजर गवतावर (Congress Weed) नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. चला तर मग पाहुयात वसंराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेल्या शइफारशीनुसार गाजर गवताचे नियंत्रण कसे करायचे.

Zygogramma bicolorata
जनावरांनी गाजर गवत खाल्ल्यानंतर होणारे दुष्परिणाम

कसे आहे मेक्सिकन भुंग्याचे जीवनचक्र ?
मेक्सिकन भुंग्याचे प्रौढ भुंगे मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे वेगवेगळे अथवा गुच्छ स्वरुपात पानाच्या खालील बाजूवर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. त्यामुळए झाडांची वाढ आणि फुले येण्याचे थांबते. अळी अवस्था दहा ते अकरा दिवसांची असते. तर कोष अवस्था नऊ ते दहा दिवसांची असते. कोष अवस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतून निघून गाजर गवताच्या पानावर उपजीविका करतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत सात ते आठ महिने दडून बसतात. पुढील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतून निघून गाजर गवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. एखाद्या वातावरणात स्थीर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे आणि किती सोडावेत ?
प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडावेत. नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी भरपूर भुंगे असलेल्या गवतावरील पाचशे ते हजार भुंगे पकडून ते दहा-पंधरा सेंटीमीटर उंच प्लास्टिकच्या बाटलीत टोपणाला जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणून टाकावा. भुंगे आणि अळ्या फक्त गाजर गवतच खातात. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्त अवस्थेत जातात.
झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणिमात्राला त्रास होत नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करु नयेत. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करावेत. प्रयोगशाळेत प्लास्टिकच्या सहा बाय नऊ इंच आकाराच्या डब्यात किंवा दहा बाय पंधरा फूटआकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजरगवतावर भुंग्यांचे गुणन करतात.

नियंत्रणाचे इतर उपाय काय आहेत?
१०० लिटर पाण्यात २० किलो खडे मिठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे. तरोटा ही वनस्पती सुध्दा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात. या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com