Weed Control : खरीप पिकांतील तणनियंत्रण

तणांच्या नियंत्रणासाठी एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.
Weed Management
Weed ManagementAgrowon

खरीप हंगामात पावसाळी व पोषक वातावरणामुळे तणांचा प्रादुर्भाव (Weed Infestation) अधिक होतो. ही तणे पिकांसोबत ओलावा, सूर्यप्रकाश, अन्नघटक व जागा याबाबत स्पर्धा करतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, पिकांचे उत्पादन कमी होते. तण नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळणे शक्य होते. तणांच्या नियंत्रणासाठी (Weed Control) एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक पद्धतीचा (Integrated Weed Management) अवलंब करावा. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे. शेतातील पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवू देऊ नयेत. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावीत. त्यामुळे तणांचा प्रसार रोखला जातो.

डॉ. राजीव साठे

Weed Management
Soybean Cultivation : गादीवाफा, जोडओळ पद्धतीने यशस्वी सोयाबीन लागवड

निवारणात्मक उपाय

मशागतीय पद्धत ः नांगरट, आंतरमशागत योग्य प्रकारे करणे आवश्यक.

कायिक/ यांत्रिक पद्धत ः मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीच्या वापरातून तणे शेतातून काढली जातात. उदा. खुरपणी, कोळपणी, खांदणी, तण उपटणे, छाटणे किंवा जाळणे इ.

जैविक पद्धती ः कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. उदा. गाजर गवताचे नियंत्रणासाठी ‘मेक्सिकन भुंगे’ वापरता येतात. किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा इ. गवते वाढवून अनावश्यक तणांच्या वाढीवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवता येते.

रासायनिक पद्धत ः रासायनिक पद्धतीमध्ये निवडक आणि बिननिवडक तणनाशकांचा शिफारशीप्रमाणे वापर केला जातो. योग्य तणनाशकांच्या वापरामुळे तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

Weed Management
कसे कराल कपाशीतील तण नियंत्रण ?

खरिपातील प्रमुख पिकांतील रासायनिक तणनियंत्रण

भात (रोपवाटिका) ः

(प्रमुख तणे : सावा घास, जिरिया, लव्हाळा इ.)

रोपवाटिका भात पेरल्यानंतर १० ते १२ दिवसांनी तणे उगवल्यानंतर निवडक व आंतरप्रवाही गटातील तणनाशक बायस्पिरीबॅक सोडिअम (१० % एस.ई.) २०० मि.लि. प्रति ३०० लिटर पाणी किंवा ८० लिटर प्रति एकर समप्रमाणात फवारणी करावी.

भात (पुनर्लागवड) ः

(प्रमुख तणे : माका, पानलवंग, गुजगवस, मोठा लव्हाळा, मोठा नागरमोथा, वाघनखी इ.)

निवडक व आंतरप्रवाही तणनाशक बायस्पिरीबॅक सोडिअम (१० % एस.ई.) २०० ते २५० मि.लि. प्रति ३०० लि. पाणी - भात पुनर्लागवडीनंतर १० ते १४ दिवसांनी फवारणी करावी.

पेरसाळ ः (प्रमुख तणे : नागरमोथा, माका, पानलवंग, गुजगवत इ.)

बायस्पिरीबॅक सोडिअम (१०% एस.ई.) २०० ते २५० मि.लि. प्रति ३०० लिटर पाणी किंवा ८० ते १०० मि.लि. प्रति एकर - भात पेरणीनंतर १५ ते २५ दिवसांनी फवारणी.

हॅलोक्साफॉप आर मिथाईल (१०.५ टक्के ई.सी.) ७५० ते ८०० मि.लि. प्रति ५०० ते ६०० लिटर पाणी किंवा ३०० ते ४०० मि.लि. प्रति एकर समप्रमाणात फवारणी करावी.

कापूस ः

(प्रमुख तणे : सावा घास, भगर, कुंद्रा, माका, केना, धोत्रा, हराळी, गोखरू, तांदूळकुंद्रा, आघाडा, चिलघोळ, लोणी गवत इ.)

क्विझालोफॉप इथाईल (५ % ई.सी.) १००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी - पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी.

पॅराक्वाट डायक्लोराइड (२४ % एस.एल.) १२५० ते २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा ५०० ते ८०० मि.लि. प्रति एकर

हे बिननिवडक व स्पर्शजन्य तणनाशक तणे उगवल्यानंतर दोन ओळींमध्ये तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत वापरावे.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ईसी) ७५० मि.लि. प्रति ३७५ ते ५०० लिटर पाणी.

सोयाबीन ः

(प्रमुख तणे : लव्हाळा, केना, क्रब ग्रास, राळा, चिमणचारा, वाघनखी इ.)

बेंटॅझोन (४८० ग्रॅम / लि.) २००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाणी किंवा १०० मि.लि. प्रति एकर - तणे २ ते ३ पानांवर असताना फवारणी करावी.

क्लोरीम्यूरॉन इथाईल (२५ % डब्ल्यू.पी.) ३६ ग्रॅम प्रति ३०० लिटर पाणी अधिक सर्फेक्टंट किंवा १४ ग्रॅम प्रति एकर अधिक सर्फेक्टंट - पेरणीनंतर ३ ते १५ दिवसांनी फवारणी करावी.

फिनोक्साप्रॉप पी इथाईल (९.३ % ई.सी.) १११ मि.लि. प्रति २५० ते ३०० लिटर पाणी किंवा ४४४ मि.लि. प्रति एकर - पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी फवारणी.

इमॅजीथाइपर (१० % एस.एल.) १ लिटर प्रति ५०० ते ६०० लिटर पाणी किंवा ४०० मि.लि. प्रति एकर - तणे २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी.

तूर ः

(प्रमुख तणे : दुधी, केना, उनाडभाजी, दीपमाळ, कुर्डू इ.)

इमॅझीथापर (३५ %) अधिक ईमॅझामॉक्स (३५ % डब्ल्यू.जी.) (संयुक्त तणनाशक) ४० ग्रॅम प्रति एकर - तणे उगवल्यानंतर फवारण्यासाठी निवडक गटातील तणनाशक.

ऊस

(प्रमुख तणे : क्रब ग्रास, हराळी, गाजरगवत, लव्हाळा, केना, शंखपुष्पी, भुईरिंगनी, तांदूळ कुंद्रा, दुधी घोळ, चिलघोळ, पिवळी तीळवन, तांदूळजा, गोखरू, चिमणचारा, माका.)

हॅलोसल्फुरॉन मिथाईल (७५ % डब्ल्यू.जी.) ८० ते ९० ग्रॅम प्रति ३७५ लिटर पाणी किंवा ३६ ग्रॅम प्रति एकर.

अमेट्राइन (८०% डब्ल्यू.डी.जी.) २.५ किलो प्रति ५०० लिटर पाणी किंवा १ किलो प्रति एकर- तणांची पाने २ ते ४ अवस्थेत फवारणी करावी.

मेटसल्फुरॉन मिथाईल (२० % डब्ल्यू.पी.) ३० ग्रॅम प्रति ५०० ते ६०० लिटर पाणी किंवा १२ ग्रॅम प्रति एकर.

तणांचा प्रकार आणि त्याच्या वाढीच्या अवस्था यानुसार फवारणीची मात्रा ठरवावी. तणे ही २ ते ३ पानांची असताना तणनाशके अधिक प्रभावी ठरतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com