Capsicum Cultivation : हरितगृहातील ढोबळी मिरचीची लागवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

हरितगृहात ढोबळी मिरचीची लागवड केल्यास पिकास संरक्षण मिळून जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक फायदा, तसेच उत्तम प्रतीची ढोबळी मिरची मिळविता येते.
Capsicum Cultivation
Capsicum CultivationAgrowon

ढोबळी मिरची (Capsicum) निर्यातक्षम भाजीला सिमला मिरची किंवा भोपळी मिरची या नावाने ओळखलं जातं. यामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. अलीकडच्या काळात फास्टफूडचं (Fastfood) प्रमाण वाढल्यामुळे ढोबळी मिरचीला वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो.

ढोबळी मिरचीचा वापर सॅलड, स्टड किंवा डिशमध्ये सुबक मांडणीसाठी होतो.सॅलडच्या डिशेसमध्ये लाल ढोबळी मिरचीला मोठी मागणी असते. हिरव्या ढोबळी मिरचीपेक्षा दुप्पट ते तिप्पट भाव लाल ढोबळी मिरचीला मिळतो.

महत्त्वाचं म्हणजे हे पीक समशीतोष्ण हवामानात येणारं नाजूक पीक असून,बदलत्या हवामानात कडक ऊन,ढगाळ हवा,धुके,हळुवार व मुसळधार पाऊस,कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास अनुकूल नाही.

म्हणूनच हरितगृहात ढोबळी मिरचीची लागवड केल्यास पिकास संरक्षण मिळून जास्तीत जास्त उत्पादन व आर्थिक फायदा,तसेच उत्तम प्रतीची ढोबळी मिरची मिळविता येते. हरितगृहामुळे आपल्याला निरनिराळ्या रंगाची ढोबळी मिरची शक्य झाले आहे.

फळांच्या रंगाबरोबरच उत्पादन क्षमता,फळांचा आकार, प्रतवारी, झाडाच्या वाढीचा प्रकार आणि मार्केटमधील मागणी आदी घटकांवरसुद्धा ढोबळीच्या जातींची निवड अवलंबून असते.

Capsicum Cultivation
Onion Cultivation : कांदा लागवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सुधारित जाती

हिरव्या,लाल,पिवळा,जांभळा व पांढरा असे मोहक रंग असलेल्या मोठ्या फळांच्या अनेक जाती ढोबळी मिरचीत आढळतात.

हरितगृहात ढोबळी मिरचीची लागवड करण्यासाठी इनडिटर मिनेट जातीची निवड करावी.जेणेकरून झाडाची वाढ, फुले व फळधारणा नियमित होईल.

इंद्रा,कॅलिफोर्निया वंडर,बॉम्बी,ऑरोबेल यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निवडाव्यात.हरितगृहातील लागवडीसाठी ढोबळी मिरचीचे २० ते ३० ग्रॅम बियाणे १० गुंठे क्षेत्रासाठी पुरेसे आहे. 

रोपे तयार करणे

रोपे तयार करण्यासाठी रूट ट्रेनर्सचा वापर करावा. हे शक्य नसल्यास प्लॅस्टिक कप किंवा गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. शेणखत,वाळू,लाल माती व कोकोपीट इत्यादीचे मिश्रण,निर्जंतुकीकरण करून घ्यावं.

हे मिश्रण रूट ट्रेनरमध्ये भरून प्रत्येकी एका सेलमध्ये एक बी टाकावे.हरितगृहामध्ये साधारणत: ३० ते ४० दिवसांत रोपे तयार होतात.रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी विद्राव्य, नत्र,स्फुरद व पलाश यासारखी खते द्यावीत.

Capsicum Cultivation
Fodder Deficit : टंचाई काळात चाऱ्याचं नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

लागवड

ढोबळी मिरचीची लागवड करण्यासाठी १ मीटर रुंद व जमिनीपासून ३० ते ४० सेंमी उंच गादीवाफे बनवावेत. यासाठी चांगली सुपीक पोयट्याची अथवा लाल माती व शेणखत वापरावे.दोन गादीवाफ्यातले अंतर ५० सें.मी. ठेवावं.

लागवडीच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर तयार केलेले गादीवाफे निर्जंतुक करून घ्यावेत. ३० ते ४० दिवसांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावं. हरितगृहामध्ये शक्यतो पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.  

खते

१०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावं.याव्यतिरिक्त ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य खतातून झाडांना पोषण द्यावे.

या पिकाला माती, पाणी तपासणीनुसार आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार खतांच्या मात्रा ठिबक संचातून द्याव्यात.

झाडांना वळण देणे

लागवडीच्या ३ आठवड्यांनंतर झाडांना दोन किंवा चार फांद्यांमध्ये वाढवावं. अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी.

हे दर पंधरा दिवसांनी करावे. झाडांना आधार देण्यासाठी फांद्यांना नायलॉन किंवा प्लॅस्टिक दोरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून ३मी.उंचीवर लावलेल्या लोखंडी तारांना या दोऱ्या बांधाव्या.

रोपे लागवडीतील अंतर हे झाडांना वळण देण्याच्या पद्धतीवर,आधार देण्याच्या पद्धतीवर तसच छाटणी किंवा आकार देण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

तरी सुद्धा १ चौ.मी.क्षेत्रावर ६ ते ७ खोडे हिशोबाने यायला पाहिजेत. बहुतेक ठिकाणी छाटणी करताना एका झाडावर दोन खोडे ठेवण्याची पद्धत आहे.म्हणजे प्रति चौ.मी.मध्ये तीन मध्ये ठेवता येतात.

फळांची विरळणी

दोन मुख्य फांद्या पद्धतीत सर्वसाधारणपणे खोडावरील दुसऱ्या किंवा तिसऱ्या बेचक्यात बाजूच्या फुटव्यापर्यंत फळधारणा लांबवावी.

फळांची चांगली वाढ होण्याकरिता लहान, वाढ न झालेली फळे काढून टाकावी. ४ ते ६ फळे पहिल्या बहारामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात.पहिल्या बहारानंतर विरळणी ही फक्त लहान,रोगट फळांकरिताच करावी. खूप वेळा विरळणी करू नये.

फळांची काढणी

लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांत ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू होते. फळांची काढणी आठवड्यातून एकदा करावी.

फळे तोडणीसाठी तीक्ष्ण चाकूचा वापर करावा. साधारणत: ८ ते १० वेळा फळांची काढणी केली जाते.हरितगृहामध्ये ९० ते १२० टन/हे.ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com